घोषणा
▪ साहित्य सादरता
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांना आणि लहान आकाराचे २०.०० रुपयांना.
मार्च: क्वेश्चन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क (जे इंग्रजी, मल्याळम आणि तामिळ मध्ये उपलब्ध आहे) २०.०० रुपयांना. जेथे हे उपलब्ध नाही तेथे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४०.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे २०.०० रुपयांना). याशिवाय, १९२-पानी जुन्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ६.०० रुपयांना देता येऊ शकते.
एप्रिल व मे: द वॉचटावरची एका वर्षाची वर्गणी ६०.०० रुपयांना. सहा महिन्यांच्या वर्गण्या आणि मासिक आवृत्तींच्या एका वर्षाच्या वर्गण्या ३० रुपयांना आहेत. (मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील (S-14) लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर पाठवावी.
▪ सचिवांनी आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. काहींना तासांच्या गरजेला पूर्ण करण्यात काही त्रास असेल तर, वडिलांनी मदतीसाठी व्यवस्था करावी. सूचनेसाठी ऑक्टोबर १, १९९३ व ऑक्टोबर १, १९९२ च्या संस्थेच्या पत्रांची (S-201) उजळणी करावी. तसेच, ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवा पुरवणीचे परिच्छेद १२-२० पाहा.
▪ स्मारक विधी, शनिवार मार्च २६, १९९४ रोजी साजरा केला जाईल. भाषण लवकर सुरू होत असले तरी, स्मारक विधीच्या भाकर आणि द्राक्षारसाचे फिरवणे सूर्यास्ताआधी होऊ नये. तुमच्या भागात सूर्यास्त कधी होतो याबद्दल स्थानिक उगमाकडून तपासून घ्या. त्या तारखेला, क्षेत्र सेवेशिवाय इतर कोणत्याही सभा घेण्यात येऊ नयेत. तुमच्या मंडळीच्या सभा शनिवारीच असतील तर, राज्य सभागृह उपलब्ध असल्यास सप्ताहाच्या दुसऱ्या एखाद्या दिवशी ती घेऊ शकता.
▪ मार्च आणि एप्रिल मध्ये साहाय्यक पायनियरींग करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या योजना आताच कराव्यात आणि लवकरच त्यांचे अर्ज द्यावेत. यामुळे वडिलांना क्षेत्र सेवेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यास आणि पुरेसे साहित्य मिळवण्यास मदत होईल. एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियरींग सेवा करण्याचा खास प्रयत्न करण्यासाठी आम्ही सर्व प्रचारकांना उत्तेजन देतो.
▪ पवित्र शास्त्राचे संशोधन करण्यासाठी अधिक सोयीस्कर व्हावे म्हणून आम्ही लवकरच इंग्रजीमध्ये न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरेन्सेस आणि इन्साईट ऑन द स्क्रिपचर्स चे दोन्ही खंड संगणक डिस्केटस्च्या संचात उपलब्ध करून देणार आहोत. तो संच ५ १/४-इंच १.२ मेगाबाईट किंवा ३-१/२ इंच १.४४-मेगाबाईट डिस्केटस्वर उपलब्ध असेल. त्यासाठी, डॉस चालवणारा, किमान ५१२ किलोबाईटची रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि १८ मेगाबाईटची मोकळी जागा असलेल्या हार्ड डिस्कच्या आयबीएम पीसी-कंपॅटीबल संगणकाची गरज आहे. या कायमस्वरूपी साठा करून ठेवण्याजोग्या वस्तू नाहीत, परंतु आम्ही एक-वेळेची मागणी करू की जेणेकरून, ही साधने इच्छिणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या मंडळीच्या सचिवांना त्यांची मागणी लागलीच द्यावी. किती संचांसाठी आणि कोणत्या प्रकारच्या (आकार) डिस्केटस्साठी सचिवांना मागणी मिळाली आहे ते आम्हास मार्च १, १९९४ आधी एका कोऱ्या कागदावर लिहून पाठवावी—मार्च १ नंतर पाठवलेल्यांची, मागणी करण्यास आम्हाला जमणार नाही. आम्हाला या प्राथमिक मागण्या मिळताच, किती संचांची आवश्यकता आहे आणि त्यांची काय किंमत असेल ते आम्ही पाहू. त्यानंतर, प्रत्येक संचाची किंमत काय असेल व त्याची निश्चित मागणी कधी पाठवावी याबद्दल आम्ही आमची राज्य सेवा यात घोषणा करू.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
इंग्रजी: जेहोवाज विट्नेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉडस् किंग्डम. हे ७५०-पानी नवे पुस्तक जे ‘ईश्वरी शिक्षण’ प्रांतीय अधिवेशनात प्रकाशित झाले, ते प्रचारकांना आणि जनसामान्यांना १२०.०० रुपयांना व पायनियरांना ९०.०० रुपयांना आहे. बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी आणि तेलगू: जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? हे ३२-पानी नवे माहितीपत्रक देखील मागील वर्षाच्या अधिवेशनात प्रकाशित झाले होते, आणि ते प्रचारकांना आणि जनसामान्यांना ४.०० रुपयांना व पायनियरांना ३.०० रुपयांना आहे. फ्रेंच: ए पीसफुल वर्ल्ड—वील इट कम? (ट्रॅक्ट नं १७; विशेषकरून यहुद्यांसाठी); जेहोवाज विट्नेसेस—व्हॉट डू दे बिलीव्ह? (ट्रॅक्ट नं १८; विशेषकरून यहुद्यांसाठी). हिंदी: चर्चेसाठी पवित्र शास्त्र विषय.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
मल्याळम: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, नंदनवन आणविणारे सरकार; मराठी: जीवनात आणखी पुष्कळसे आहे!