राज्य उद्घोषक संपूर्ण पृथ्वीवर सक्रिय
“पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रे. कृत्ये १:८.
१. येशूचे शिष्य आमच्या दिवसात कोणता संदेश घोषित करतील असे त्याने सांगितले?
यहोवाने त्याच्या पुत्राला ज्या कामासाठी पाठवले त्याचे वर्णन करताना येशूने म्हटले: “मला . . . देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे.” (लूक ४:४३) त्याचप्रमाणे, तो राजकीय अधिकाराने परतल्यावर त्याचे शिष्य जे काम पृथ्वीवर करतील त्याबद्दल सांगत असता, येशूने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.
२. (अ) राज्य संदेशाला जगभर प्रसिद्धी देणे इतके महत्त्वाचे का आहे? (ब) आम्ही प्रत्येकाने कोणता प्रश्न स्वतःस विचारला पाहिजे?
२ देवाच्या राज्याची सुवार्ता एवढी महत्त्वाची का आहे? राज्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीची गरज का आहे? कारण ते मशीही राज्य यहोवाच्या सार्वत्रिक सार्वभौम सत्तेचे समर्थन करील. (१ करिंथकर १५:२४-२८) यहोवा त्याच्याद्वारे, सध्याच्या दुष्ट सैतानी व्यवस्थिकरणाचा न्याय करील आणि पृथ्वीच्या सर्व कुटुंबांना आशीर्वादीत करण्याच्या त्याच्या अभिवचनाची तो पूर्तता करील. (उत्पत्ती २२:१७, १८; दानीएल २:४४) राज्यासंबंधीची साक्ष देण्यामुळे, यहोवाने अशांना शोधून काढले. ज्यांचा त्याच्या पुत्रासोबत सहवारिस होण्यासाठी नंतर अभिषेक केला. राज्याच्या घोषणेद्वारे, आज विभाजनाचे काम देखील पार पाडले जात आहे. (मत्तय २५:३१-३३) यहोवाच्या उद्देशांकडे सर्व राष्ट्राच्या लोकांनी लक्ष द्यावे असे तो इच्छितो. त्याच्या राज्याची प्रजा म्हणून जीवन निवडण्याची संधी त्यांना मिळावी असे देखील तो इच्छितो. (योहान ३:१६; प्रे. कृत्ये १३:४७) या राज्याची घोषणा करण्यात तुमचा पूर्ण सहभाग आहे का?
विदेशांच्या काळाच्या समाप्तीची अपेक्षा
३. (अ) पवित्र शास्त्र अभ्यासाच्या समूहांना संघटित करण्यासाठी, बंधू सी. टी. रसेल यांनी त्यांच्या सुरवातीच्या यात्रेत उचितपणे कोणता विषय प्रस्तुत केला? (ब) आरंभीच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना, देवाच्या राज्याने त्यांच्या जीवनात कोणते स्थान राखावे याबद्दल काय समजले?
३ मागे १८८० मध्ये, वॉचटावर मासिकाचे पहिले संपादक, चार्ल्स टेज रसेल यांनी पवित्र शास्त्र अभ्यासासाठी गट तयार व्हावेत म्हणून उत्तेजन देण्याकरता अमेरिकेच्या ईशान्य भागातून यात्रा केली. उचितपणे, ते “देवाच्या राज्याशी संबंधीत असलेल्या गोष्टी” ह्या विषयावर बोलले. सुरवातीच्या वॉचटावर अंकामध्ये दाखवल्याप्रमाणे पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांनी (तेव्हा परिचित असलेले यहोवाचे साक्षीदार) देवाच्या राज्यात भाग असण्याच्या योग्यतेचे आहेत असे त्यांना शाबीत करावयाचे असल्यास, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग त्याच्या सेवेत आनंदाने करून राज्य आस्थेला प्रथम स्थान दिले पाहिजे. जीवनातील इतर गोष्टीला दुय्यम जागी ठेवण्यास हवे होते. (मत्तय १३:४४-४६) त्यांच्या जबाबदारीत, इतरांना देवाच्या राज्याची घोषणा करण्याचाही समावेश होता. (यशया ६१:१, २) ते त्यांनी, विदेशांच्या काळाच्या समाप्ती १९१४ मध्ये होण्यापूर्वी किती प्रमाणात केले?
४. पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांच्या लहान गटाने १९१४ पूर्वी, पवित्र शास्त्र साहित्याचे वितरण केवढ्या प्रमाणात केले?
४ पवित्र शास्त्र विद्यार्थी, १८७० री पासून ते १९१४ पर्यंत तुलनात्मक दृष्टिने पाहता संख्येने फारच कमी होते. १९१४ पर्यंत सक्रियतेने जाहीर साक्ष देण्यात केवळ ५,१०० जण भाग घेत होते. पण ती किती अलौकिक साक्ष होती! चटावर पहिल्यांदा प्रकाशित करण्याच्या दोन वर्षांनंतर, म्हणजेच १८८१ मध्ये विचारशील ख्रिश्चनांसाठी खाद्य (इंग्रजी) या प्रकाशनाचे वितरण करण्यास त्यांनी हाती घेतले. काही महिन्यातच, त्यांनी १२,००,००० प्रतींचे वितरण केले. काही वर्षांतच करोडो पत्रिकांचे पुष्कळ भाषांमध्ये वितरण करण्यात येत होते.
५. कॉलपॉर्चर कोण होते, व त्यांनी कोणता आत्मा प्रदर्शित केला?
५ तसेच १८८१ मध्ये सुरवात करुन, काहींनी त्यांची सेवा कॉलपॉर्चर (पायनियर) सुवार्तिक या नात्याने सुरू केली. हे, आजच्या पायनियरांची (पूर्ण वेळेचे सुवार्तिक) वाटाड्ये होते. काही कॉलपॉर्चरनी ते राहत असलेल्या देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागात पायी चालत किंवा सायकलने प्रवास करुन वैयक्तिक रीतीने साक्ष दिली. इतरजण परदेशी क्षेत्रांमध्ये गेले आणि फिनलंड, बारबाडोस व बर्मासारख्या (जे आता म्यानमार आहे) देशांमध्ये सुवार्ता नेणाऱ्यांपैकी ते पहिले होते. त्यांनी येशू आणि त्याच्या प्रेषितांसारखा मिशनरी आवेश प्रदर्शित केला.—लूक ४:४३; रोमकर १५:२३-२५.
६. (अ) पवित्र शास्त्रीय सत्याचा प्रसार करण्यासाठी बंधू रसेल यांनी किती विस्तृत प्रमाणात प्रवास केला? (ब) विदेशांच्या काळाच्या समाप्तीपूर्वी परदेशातील क्षेत्रात सुवार्तेच्या प्रचाराचे कार्य वाढवण्यासाठी आणखी काय केले गेले?
६ सत्याला पसरवण्यासाठी बंधू रसेल यांनी स्वतः दूरदूरपर्यंत प्रवास केला. ते कॅनडाला अनेकदा गेले; पनामा, जमायका व क्यूबा भाषेत बोलले; युरोपात त्यांनी डझनवारी दौरे केले व सुवार्तिक दौऱ्याने सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा मारली. त्यांनी राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराची सुरवात करण्यास व परदेशीय राष्ट्रात जाऊन पुढाकार घेण्यास इतर लोकांनाही पाठवले. अडॉल्फ वेबर यांना १८९० च्या मध्य काळात युरोपात पाठवले व त्यांची सेवा स्वित्झरलंड पासून फ्रान्स, इटली, जर्मनी आणि बेल्जियम पर्यंत पसरली. इ. जे. कोवर्ड यांना करिबियन क्षेत्रात पाठवण्यात आले. रॉबर्ट हॉलुस्टर यांना १९१२ मध्ये पूर्वेकडील देशात नेमण्यात आले. तेथे, दहा भाषांमध्ये खास पत्रिका तयार करण्यात आल्या, आणि भारत, चीन, जपान व कोरियामध्ये देशीय वितरकांकडून त्यांच्या लक्षावधी प्रती वाटण्यात आल्या. तुम्ही त्याकाळी असता तर, तुमच्या तसेच बाहेरील सुवार्ता समाजात घोषित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतःकरणाने प्रेरित केले नसते का?
७. (अ) साक्षकार्यात वाढ करण्यासाठी कशाप्रकारे वृत्तपत्रांचा वापर केला केला? (ब) “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” काय होते, आणि एकाच वर्षात किती लोकांनी ते पाहिले?
७ विदेश्यांच्या काळाची समाप्ती जवळ येत गेली, तसे बंधू रसेल यांची प्रवचने प्रकाशित करण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला जात होता. त्यांचा प्रमुख जोर १९१४ या वर्षावर नसून त्या ऐवजी, देवाच्या उद्देशावर व त्याच्या पूर्णतेच्या हमीवर होता. जवळ जवळ एकाचवेळी २,००० वृत्तपत्रे, जे नियमितपणे या प्रवचनांना प्रकाशित करत होते, १,५०,००,००० वाचकांपर्यंत पोंहचत होते. मग, १९१४ या वर्षाचा आरंभ झाला तसा, संस्थेने “फाटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हे चलचित्र जाहीरपणे दाखवण्यास सुरवात केली. प्रत्येकी दोन तासांच्या चार कार्यक्रमांमध्ये, निर्मिती पासून ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीपर्यंतच्या पवित्र शास्त्रीय सत्यांना सादर केले. एका वर्षातच, उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये ९० लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी ते पाहिले होते.
८. पवित्र शास्त्र विद्यार्थी सुवार्तेसह १९१४ पर्यंत किती देशात पोहोचले?
८ उपलब्ध अहवालांप्रमाणे, १९१४ च्या उत्तरार्धाला या सुवार्तिकांच्या आवेशी गटाने देव राज्याची घोषणा, ६८ देशांमध्ये पोंहचवली होती.a परंतु ती केवळ एक सुरवात होती!
स्थापन झालेल्या राज्याची आवेशाने घोषणा करणे
९. सीडर पॉईंट ओहायो अधिवेशनांत, कशाप्रकारे राज्य साक्षकार्यास खास उत्तेजन दिले गेले?
९ पवित्र शास्त्र विद्यार्थी १९१९ मध्ये सीडर पॉईंट, ओहायो येथे एकत्र आल्यावर, त्यावेळचे वॉचटावर संस्थेचे असलेले अध्यक्ष बंधू जे. एफ रदरफोर्ड यांनी घोषित केले: “आमचे विशेष कार्य, मशीहाच्या येणाऱ्या वैभवी राज्याची घोषणा करणे हे होते व आहे.” सीडर पॉईंट ओहायो येथे १९२२ मध्ये झालेल्या दुसऱ्या अधिवेशनात, बंधू रदरफोर्ड यांनी, १९१४ मध्ये, विदेशांच्या काळाच्या समाप्तीस, ‘वैभवी राजाने स्वतः अधिक सामर्थ्य मिळवले असून राज्य करण्यास आरंभ’ केल्याच्या वस्तुस्थितीला ठळकपणे मांडले. पुढे, त्यांनी तो विषय श्रोत्यांपुढे असे म्हणत मांडला: “वैभवी राजाने राज्य सुरू केले आहे यावर तुमचा विश्वास आहे का? अहो, सर्वसमर्थ देवाचे पुत्रहो, मग क्षेत्रात परत चला! . . . संदेशाची चहूकडे घोषणा करा. यहोवा हा देव आणि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे व प्रभूचा प्रभू आहे हे जगाला माहीत झाले पाहिजे. हा सर्वात मोठा दिवस आहे. पाहा, राजा राज्य करीत आहे! तुम्ही त्याचे जाहीर प्रतिनिधी आहात.”
१०, ११. राज्य सत्याद्वारे लोकांप्रत पोंहचण्यासाठी, रेडिओ, ध्वनीक्षेपणांची व्यवस्था असणाऱ्या मोटारी, व घोषणाफलकांचा किती प्रभावशाली रीतीने वापर करण्यात आला?
१० सीडर पॉईंट येथील अधिवेशने होऊन आता ७० पेक्षाही अधिक वर्षे उलटली आहेत, यहोवाने जवळजवळ ८० वर्षांपासून त्याच्या पुत्राच्या मशीही शासनाद्वारे त्याची सार्वभौमता प्रदर्शित करण्यास सुरवात केली आहे. देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांना कोठवर खरेपणाने हे काम पूर्ण केले आहे? वैयक्तिकपणे त्यात तुमचा किती हिस्सा आहे?
११ राज्य संदेशाचा विस्तीर्ण प्रसार करण्यासाठी, १९२० शीच्या पूर्वार्धात रेडिओ एक साधन उपलब्ध झाले. १९३० मध्ये, राज्य हीच जगाची आशा आहे, असे दर्शवणाऱ्या अधिवेशनाच्या भाषणांना जगभरात पसरलेल्या, रेडिओ नेटवर्क किंवा प्रसार माध्यम मालिका आणि दूरसंचार यांच्याद्वारे नेण्यात आले. ध्वनिमुद्रित केलेल्या पवित्र शास्त्रीय भाषणांना सार्वजनिक ठिकाणी ऐकवण्यासाठी ध्वनीक्षेपणांची व्यवस्था असणाऱ्या मोटारींचा वापर करण्यात आला. मग, १९३६ मध्ये ग्लासगो, स्कॉटलंडमध्ये आपले बांधव जाहीर भाषणांची घोषणा करण्यासाठी घोषणाफलक अंगावर अडकवून व्यापारी प्रदेशांतून मिरवणूक काढू लागले. आमच्या सदस्यांची संख्या कमी असताना त्यावेळी पुष्कळ लोकांना साक्ष देण्यासाठी हे सर्व प्रभावकारी मार्ग होते.
१२. शास्त्रवचने दाखवतात त्यानुसार, साक्ष देण्यासाठी वैयक्तिकरित्या आम्हा प्रत्येकाजवळ कोणता एक प्रभावशाली मार्ग आहे?
१२ अर्थात, शास्त्रवचने हे स्पष्ट करतात की ख्रिस्ती या नात्याने आम्हावर वैयक्तिकरित्या साक्ष देण्याची जबाबदारी आहे. आमच्यासाठी वृत्तपत्राच्या लेखांना व रेडिओ प्रक्षेपणांना ते काम करण्यास आम्ही देऊ शकत नाही. हजारो निष्ठावान ख्रिश्चनांनी—पुरूष, स्त्रिया आणि युवकांनी—ती जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या परिणामास्तव, घरोघरचे प्रचारकार्य यहोवाच्या साक्षीदारांचे एक ओळखचिन्ह झाले आहे.—प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०.
सर्व पृथ्वीभर पोंहचणे
१३, १४. (अ) काही साक्षीदार त्यांची सेवा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या शहरात, इतकेच नव्हे तर इतर देशांमध्ये स्थलांतर का करतात? (ब) सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी, एखाद्याच्या जन्मस्थळातील लोकांच्या प्रेमळ काळजीने कशी मदत केली?
१३ सर्व पृथ्वीभर राज्याच्या या संदेशाचा प्रचार केला पाहिजे हे माहीत असल्यामुळे, काही यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या समाजाच्या क्षेत्राबाहेर पोंहचण्यासाठी वैयक्तिकरित्या ते काय करू शकतील यावर गंभीरतेने विचार केला.
१४ पुष्कळ लोक त्यांच्या मायदेशापासून दूर गेल्यावर सत्य शिकले आहेत. जरी त्यांनी भौतिक लाभांसाठी स्वदेशाचा त्याग केला होता तरी, त्यांना त्याहून अधिक मौल्यवान असे काही मिळाले आहे, आणि म्हणून काही त्यांच्या जन्मस्थळी सत्य सांगण्यासाठी परतणे भाग पडल्यासारखे वाटले आहे. अशाप्रकारे, या शतकाच्या सुरवातीला स्कॅनडीनाव्हिया, ग्रीस, इटली, पूर्व युरोपातील देशांमध्ये आणि पुष्कळ इतर भागात सुवार्तेच्या प्रचाराचा विस्तार झाला. आता देखील १९९० च्या दशकामध्ये, राज्याच्या संदेशाचा त्याचरीतीने विस्तार होत आहे.
१५. यशया ६:८ मध्ये स्पष्ट केलेल्या मनोवृत्तीप्रमाणेच १९२० व १९३० शी मध्ये असणाऱ्या काहींच्या मनोवृत्तीमुळे काय साध्य झाले?
१५ देवाच्या वचनाचा सल्ला त्यांच्या जीवनात लागू केल्यामुळे, इतरांनी परक्या देशांमध्ये सेवेसाठी स्वतःला उपलब्ध केले. डब्ल्यू. आर. ब्राऊन (अनेकदा त्यांना “बायबल ब्राऊन” म्हणून ओळखले जाई) हे त्यांच्यातील एक आहेत. १९२३ मध्ये, सुवार्तिकाचे कार्य वाढवण्यासाठी ते त्रिनिदाद मधून पश्चिम आफ्रिकेत स्थलांतरीत झाले. १९३० च्या दरम्यान, राज्याच्या संदेशाला आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर नेणाऱ्यांपैकी, फ्रँक व ग्रे स्मिथ, रॉबर्ट निसबेट, आणि डेवीड नॉमन हे होते. इतरांनी दक्षिण अमेरिकेतील क्षेत्र वाढविण्यास मदत केली. १९२० च्या पूर्वार्धात जॉर्ज यंग, या एका कॅनेडियनने अर्जेंटिना, ब्राझील, बोलिव्हिया, चिली, आणि पेरू येथील कार्याला हातभार लावला. च्वान मुनईज ज्यांनी स्पेनमध्ये सेवा केली होती, त्यानंतर अर्जेटिना, चिली, पराग्वे आणि उरूग्वेमध्ये सेवा केली. त्या सर्वांनी, यशया ६:८ मध्ये व्यक्त केलेला आत्मा: “हा मी आहे! मला पाठीव,” प्रदर्शित केला.
१६. साक्षकार्य, युद्धाच्या आधीच्या वर्षांत, जास्त लोकवस्ती असलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त आणखी कोठे चालू होते?
१६ सुवार्तेचा प्रचार दूरवर असलेल्या क्षेत्रातही पोहचत होता. साक्षीदारांनी भरलेल्या नावांनी न्यूफाउंडलंडच्या सर्व कोळ्यांच्या वसाहतींना, ध्रुवप्रदेशाच्या नॉर्वेकडील किनाऱ्याला, पॅसिफिकच्या बेटांना आणि आग्नेयेकडील आशियाच्या बंदरांना भेटी दिल्या.
१७. (अ) साक्षकार्य, १९३५ पर्यंत किती देशांपर्यंत पोंहचले? (ब) त्यावेळेपर्यंत कार्य का संपले नाही?
१७ १९३५ च्या वर्षापर्यंत, यहोवाचे साक्षीदार ११५ देशांमध्ये प्रचार करण्यात व्यग्र होते, आणि साक्षकार्याच्या मोहिमांद्वारे किंवा पोस्टाने पाठविलेल्या साहित्यांद्वारे आश्चर्यकारकपणे त्यांनी आणखी ३४ रा गाठली होती. तरीदेखील, कार्य काही संपले नव्हते. त्या वर्षी, यहोवाने नव्या जगात बचावून जाण्यासाठी ‘मोठ्या लोकसमुदायाला’ एकत्र करण्याविषयीच्या त्याच्या उद्देशाकडे त्यांचे डोळे उघडले. (प्रकटीकरण ७:९, १०, १४) तरीही साक्ष देण्याचे अधिक कार्य अजून करावयाचे होते!
१८. राज्याची घोषणा करण्याच्या कार्यात, गिलियड प्रशाला व सेवा प्रशिक्षण प्रशालेने कोणत्या भूमिका पूर्ण केल्या?
१८ दुसऱ्या जागतिक महायुद्धाने पृथ्वीला झाकून टाकले होते, आणि तेव्हा, शेकडो राष्ट्रांमधील यहोवाच्या साक्षीदारांवर तसेच त्यांच्या साहित्यावर बंदी होती तरीही, आंतरराष्ट्रीय राज्य प्रचाराच्या कार्यात मोठे कार्य करण्यासाठी भावी मिशनऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेची सुरवात झाली. आजपर्यंत, गिलियडमधून प्रशिक्षण प्राप्त केलेल्यांनी २०० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये सेवा केली आहे. केवळ साहित्य देऊन निघून जाण्यापेक्षा अधिक कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी पवित्र शास्त्र अभ्यास चालवले, मंडळ्यांची स्थापना केली, व ईश्वरशासित जबाबदाऱ्यांना पेलण्यासाठी लोकांना प्रशिक्षित केले. अलिकडेच, सेवा प्रशिक्षण प्रशालेतून प्रशिक्षण प्राप्त केलेल्या वडील व सेवा सेवकांनीसुद्धा या कार्याच्या बाबतीत ही महत्त्वपूर्ण गरज भागविण्यासाठी सहा खंडात कार्य केले. सतत वाढीसाठी मजबूत पाया घातला आहे.—पडताळा २ तीमथ्य २:२.
१९. यहोवाच्या साक्षीदारांनी अधिक गरज असलेल्या क्षेत्रात कार्य करण्याच्या आमंत्रणाला किती प्रमाणात प्रतिसाद दिला?
१९ इतरजण, साक्ष न दिलेल्या क्षेत्रांत काम करण्यात मदत देऊ शकतील का? जगभरात घेतल्या गेलेल्या १९५७ च्या अधिवेशनांमध्ये, यहोवाच्या प्रौढ साक्षीदारांना—वैयक्तिकांना आणि कुटुंबांना—अधिक गरज असणाऱ्या भागांमध्ये जाऊन तेथे राहण्याबद्दल व सेवा सुरू करण्याबद्दल विचार करण्याचे उत्तेजन दिले होते. ते आमंत्रण, देवाने पौलाला दिलेल्या आमंत्रणासारखेच होते, त्याने एका माणसाला “इकडे मासेदोनियांत येऊन आम्हाला साहाय्य कर” अशी विनंती करताना दृष्टांतात पाहिले होते. (प्रे. कृत्ये १६:९, १०) काहींनी १९५० शी च्या दरम्यान, तर इतरांनी नंतर स्थलांतर केले. आयर्लंड आणि कोलंबिया येथे जवळजवळ हजार साक्षीदार गेले; इतर देशांमध्ये शेकडो जण गेले. हजारो जण त्यांच्याच देशातल्या अधिक गरज असणाऱ्या भागात गेले.—स्तोत्रसंहिता ११०:३.
२०. (अ) मत्तय २४:१४ मधील येशूच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेच्या अनुषंगाने १९३५ पासून काय साध्य केले आहे? (ब) मागील काही वर्षांमध्ये, कार्यात कशाप्रकारे वेग आला आहे?
२० यहोवाच्या त्याच्या लोकांवरील आशीर्वादामुळे, राज्य प्रचाराचे कार्य विलक्षण गतीने सतत पुढे जात आहे. १९३५ पासून प्रचारकांच्या संख्येत ऐंशीपटीने वाढ झाली, आणि पायनियरांच्या संख्येचे प्रमाण प्रचारकांच्या संख्येपेक्षा मोठ्या संख्येने म्हणजे, ६० टक्क्यांनी अधिक वाढले. गृह पवित्र शास्त्र अभ्यासाच्या योग्यतेची सुरवात १९३० शी मध्ये करण्यात आली. आता प्रत्येक महिन्याला संचालित करत असलेल्या अभ्यासांची सरासरी जवळजवळ ४५ लाखांपेक्षाही अधिक आहे. राज्याची घोषणा करण्याच्या कार्यात १९३५ पासून १५ अब्जांपेक्षा अधिक तास खर्च केले आहेत. सुवार्तेचा नियमित प्रचार आता २३१ देशांमध्ये होत आहे. पूर्व युरोप तसेच आफ्रिकेत सुवार्तेचा प्रचार मुक्तपणे जसा सुरू झाला तसे, लोकांपुढे राज्याच्या संदेशाला ठळकपणे मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशनांचा प्रभावीपणाने उपयोग करण्यात आला. यहोवाने यशया ६०:२२ मध्ये बऱ्याच काळाआधी अभिवचन दिल्याप्रमाणे, तो ‘योग्य समयी कामाची गती वाढवितो [NW].’ त्यामध्ये भाग घेण्याचा आपल्यासाठी किती मोठा विशेषाधिकार आहे!
शक्य असलेल्या प्रत्येकांकडे सुवार्तेसह पोंहचणे
२१, २२. आम्ही कोठेही सेवा करत असलो तरी, प्रभावी साक्षीदार असण्यासाठी वैयक्तिकरित्या काय करु शकतो?
२१ आमच्या प्रभूने हे कार्य संपल्याचे अद्यापि सांगितलेले नाही. हजारो जण अजूनही खऱ्या उपासनेची बाजू घेत आहेत. यास्तव, प्रश्न असा उभा राहतो की, यहोवाच्या धीराने या कार्यासाठी अनुमती दिल्यामुळे प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी आम्ही वेळेचा सदुपयोग करतो का?—२ पेत्र ३:१५.
२२ प्रत्येक जण क्वचित उरकलेल्या क्षेत्रात स्थलांतर करु शकत नाही. परंतु तुम्हाला असलेल्या संधीचा तुम्ही पुरेपूर उपयोग करीत आहात का? तुम्ही सहकर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना व सहविद्यार्थ्यांना साक्ष देता का? तुमच्या क्षेत्रातील बदलणाऱ्या परिस्थितीनुरूप तुम्ही स्वतःला जुळवून घेतले आहे का? कामाच्या बदलणाऱ्या प्रकाराच्या परिणामामुळे, दिवसा फारच तुरळक लोक घरी असतात. त्यामुळे अशा लोकांची भेट संध्याकाळी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आराखड्यात बदल केला आहे का? आमंत्रित न केलेल्या पाहुण्यांसाठी इमारतींमध्ये प्रवेशास मनाई असल्यास, तुम्ही दूरसंचार साक्षकार्य किंवा पत्राद्वारे साक्ष देत आहात का? दाखवलेल्या आस्थेचा तसेच गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवण्याचे सादर करण्याचा तुम्ही अविरत पिच्छा पुरवत आहात का? तुम्ही तुमची सेवा संपूर्णपणे पूर्ण करत आहात का?—पडताळा प्रे. कृत्ये २०:२१; २ तीमथ्य ४:५.
२३. यहोवाच्या सेवेत आम्ही काय करत आहोत याचे तो निरीक्षण करतो तेव्हा, आमच्या बाबतीत काय दिसले पाहिजे?
२३ या महत्त्वाच्या काळात, यहोवाच्या महान विशेषाधिकाराची खरी गुणग्राहकता बाळगण्याद्वारे आपण सर्व जण आपली सेवा अशा रीतीने पूर्ण करू या, व याद्वारे आम्ही त्याचे साक्षीदार असल्याचे त्याला स्पष्टपणे दाखवून देऊ या. यहोवा या भ्रष्ट व्यवस्थिकरणावर न्यायदंड बजावत असल्याचे तसेच, येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षीय वैभवी शासनाला प्रत्यक्ष पाहण्याचा आमचा विशेषाधिकार असो!
[तळटीपा]
a १९९० च्या सुरवातीला ज्याप्रकारे पृथ्वीला विभाजीत केले होते त्याप्रमाणे मोजणी केल्यानुसार.
उजळणीत
▫ राज्याच्या संदेशाचा प्रचार करणे इतके महत्त्वाचे का आहे?
▫ १९१४ पर्यंत सुवार्तेचा प्रचार कोठवर झाला होता?
▫ राज्याच्या प्रस्थापनेपासून किती विस्तृत प्रमाणात साक्ष दिली गेली?
▫ सेवेतील आमच्या स्वतःच्या सहभागाला अधिक फलदायक काय बनवू शकते?
[१६, १७ पानांवरील चौकट]
यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचे उद्घोषक
संपूर्ण जगभर १९९३-९४ च्या दरम्यान झालेल्या शेकडो अधिवेशनांमध्ये, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक (इंग्रजी) हे नाव असलेल्या एका नव्या पुस्तकाची घोषणा केली गेली. ते, यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिक माहितीयुक्त व व्यापक इतिहासाने भरलेले आहे. ते ७५२ पृष्ठांचे पुस्तक असून, ९६ विविध देशातील हजारो सुंदर चित्रांनी सचित्र आहे. ते १९९३ चे वर्ष संपेपर्यंत, २५ भाषेत प्रकाशित झाले आहे व अधिक भाषेत भाषांतरीत केले जात आहे.
कोणती गोष्ट या पुस्तकाला समयोचित बनवते? अलिकडील वर्षांमध्ये संपूर्ण जगभरात लाखो लोक यहोवाचे साक्षीदार झाले आहेत. ते ज्या संघटनेसोबत सहवास राखून आहेत तिच्या इतिहासाबद्दल त्यांना विश्वसनीय माहिती असली पाहिजे. शिवाय, त्यांचा प्रचार, व उपासना करण्याच्या पद्धतीला जगभरातील राष्ट्रीय व जातीय गटांनी ओळखले आहे. तसेच, प्रत्येक आर्थिक आणि शैक्षणिक पातळीतील तरुण व वृद्ध लोक त्याचा स्वीकार करत आहेत. परिणामास्तव, घडत असलेल्या गोष्टींचे निरीक्षण करणाऱ्या अनेकांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दलचे अनेक प्रश्न आहेत त्यांच्या विश्वासाबद्दलचेच नव्हे तर, त्याचा आरंभ कसा झाला, त्यांचा इतिहास, त्यांची संघटना, आणि त्यांचा हेतू काय आहे यासारखे प्रश्न त्यांच्या समोर येतात. इतरांनी त्यांच्याविषयी लिहिले असले तरी ते सर्वदाच निःपक्षपातीपणाचे नाही. परंतु, यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक दिवसातील इतिहासाबद्दल साक्षीदारांशिवाय इतर कोणालाही इतके चांगले माहीत नाही. या पुस्तकाच्या संपादकांनी त्या इतिहासाला वस्तुनिष्ठ व प्रामाणिक पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. असे केल्यामुळे, त्यांनी मत्तय २४:१४ मध्ये नमूद केलेल्या ख्रिस्ताच्या उपस्थितीतील चिन्हाच्या अर्थपूर्ण पैलूच्या पूर्णतेचा तारखेनिशी पुरावा देखील सादर केला आहे. तेथे पूर्वभाकीत केलेल्या कार्यात पूर्ण समाविष्ट असलेलेच अशी सविस्तर माहिती पुरवू शकतात.
या पुस्तकाला सात मुख्य विभागात विभागले आहे:
विभाग १: हा भाग यहोवाच्या साक्षीदारांच्या ऐतिहासिक मूळाचाच कसून शोध करतो. त्यामध्ये त्यांच्या १८७० ते १९९२ पर्यंतच्या आधुनिक दिवसाच्या इतिहासाचा संक्षिप्त पण माहितीयुक्त सारांश समाविष्ट आहे.
विभाग २: येथे त्यांच्या विश्वासाच्या प्रगमनशील विकासाचे समालोचन दर्शवले आहे, जे यहोवाच्या साक्षीदारांना इतर धार्मिक गटांपासून वेगळे ठेवते.
विभाग ३: पुस्तकाचा हा भाग, त्यांच्या संघटनेच्या रचनेच्या विकासाचे परीक्षण करतो. तो, त्यांच्या मंडळीच्या सभा, व अधिवेशने, तसेच राज्यसभागृहे, प्रशस्त संमेलन गृहे आणि पवित्र शास्त्र प्रकाशनांना लागणाऱ्या सुविधांची बांधणी ते ज्याप्रकारे करतात याबद्दलची चित्तवेधक वस्तुस्थिती स्पष्ट करतो. देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या आवेशाला तसेच संकटाच्या काळात एकमेकांची काळजी घेण्याच्या प्रीतीला हा भाग प्रदर्शित करतो.
विभाग ४: येथे तुम्हाला, संपूर्ण जगभरातील प्रमुख देशात तसेच दूरवरच्या द्वीपावर देवाच्या राज्याची घोषणा कशाप्रकारे पोंहचली याबद्दलची अत्यंत मोहक अशी सविस्तर माहिती सापडेल. सन १९१४ मध्ये ४३ देशात, तर १९९२ पर्यंत २२९ देशात प्रचारकार्य करण्याविषयी जरा कल्पना करा! या जगव्याप्त कामात सहभाग घेतलेल्यांचे अनुभव खरोखर हर्षदायक आहेत.
विभाग ५: राज्याची घोषणा करण्याच्या या सर्व कार्याला पूर्ण करण्यासाठी, पवित्र शास्त्र तसेच पवित्र शास्त्र साहित्याचे दोनशेहून अधिक भाषेत प्रकाशित करण्यास आंतरराष्ट्रीय सुविधांच्या विकासाची गरज लागली आहे. येथे तुम्ही त्यांच्या कार्याचा तो पैलू शिकू शकता.
विभाग ६: साक्षीदारांनी परीक्षांचा देखील सामना केला—काहींना मानवी अपूर्णतेमुळे, इतरांना खोट्या बांधवांमुळे, तर त्यापेक्षा अधिक म्हणजे काहींना थेट छळामुळे सामना करावा लागला. देवाच्या वचनाने, हे असे होईल याबद्दलचा आधीच इशारा दिला होता. (लूक १७:१; २ तीमथ्य ३:१२; १ पेत्र ४:१२; २ पेत्र २:१, २) पुस्तकाचा हा भाग, प्रत्यक्ष काय घडले व यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासाने त्यांना विजयी होण्यास कशी मदत केली त्याविषयीचे सजीव वर्णन करतो.
विभाग ७: यहोवाच्या साक्षीदारांना, ते ज्या संघटनेचे आहेत, त्या संघटनेचे नेतृत्त्व खरोखर देव करत आहे अशी दृढ खात्री का आहे याविषयीचा विचार, समारोपात हे पुस्तक करते. तसेच हे पुस्तक, त्यांनी संघटनात्मकरित्या तसेच वैयक्तिकरित्या जागृत राहण्याची का गरज आहे याबद्दल देखील चर्चा करते.
वरील गोष्टींसोबत, रचना केलेल्या या आकर्षक खंडात, सुंदर व भरपूर माहितीने भरलेल्या ५० पृष्ठांच्या रंगीत चित्रांच्या विभागात, यहोवाचे साक्षीदार वापरत असलेली जगभरातील मुख्यालये तसेच शाखा सुविधा दाखविलेल्या आहेत.
तुम्ही या आकर्षक प्रकाशनाची प्रत प्राप्त केलेली नसल्यास, ती प्राप्त करण्याद्वारे व तिचे वाचन करण्याद्वारे तुम्हाला नक्कीच लाभ मिळू शकेल.
याचे वाचन केलेल्या काहींची विवेचने
या पुस्तकाचे आधीच वाचन केलेल्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? येथे काही दिलेल्या आहेत:
“मी, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषक या आकर्षक व सजीव लिखाणाचे वाचन नुकतेच पूर्ण केले आहे. ज्या संघटनेने सत्याला निष्ठावानपणे व नम्रपणे कवटाळले आहे, केवळ तीच अशी माहिती इतक्या मोकळ्यापणाने, धैर्याने व संवेदनाशीलतेने लिहू शकली.”
“या पुस्तकाचा प्रामाणिकपणा व निष्कपटपणा यामुळे त्याचे वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकासारखे वाटते.”
“किती जिज्ञासा चेतवणारे हे नवे प्रकाशन आहे! . . . ते ऐतिहासिकतेचा उत्कृष्ट नमुना आहे.”
या पुस्तकाचे अर्धे वाचन करुन झाल्यावर, एका मनुष्याने लिहिले: “मला धाक बसला, आश्चर्याने गुंग झालो, व जवळजवळ गहिवरुन आले होते. . . . माझ्या सर्व आयुष्यात, भावनात्मकरित्या हेलावणारा, भावनात्मक प्रभाव इतर कोणत्याही प्रकाशनात नव्हता.”
“आनंदी भावना मला, हे पुस्तक संघटनेत येणाऱ्या तरुणांचा तसेच नवोदित लोकांचा विश्वास कसे दृढ करील याचा प्रत्येक वेळी विचार करण्यास अनुमती देतात.”
“मी सर्वदा सत्याची गुणग्राहकता बाळगली आहे, परंतु या पुस्तकाच्या वाचनाने माझे डोळे उघडले व या सर्वांमागे यहोवाचा पवित्र आत्मा पूर्वीपेक्षा अधिक आहे हे ओळखण्यास माझी मदत केली आहे.”
[१८ पानांवरील चित्रं]
साक्षीदारांची संख्या अल्प असतानाही राज्य संदेश अनेक लोकांप्रत पोहोचला