मासिकांचा उपयोग करून इतरांचा फायदा करा
द वॉचटावर आणि अवेक!चे नवे अंक मिळाल्याबद्दल आम्ही किती आनंदी आहोत. होता होईल तितक्या लवकर त्यांना वाचण्याच्या संधीची आम्ही प्रेमाने काळजी घेतो जेणेकरून त्यात सादर केलेल्या माहितीचा आम्हाला लाभ होऊ शकतो. जी माहिती आम्हाला व्यक्तीगतपणे फायदेकारक आहे ती पाहण्यासोबत, ही कल्पना चांगली ठरेल की अशाही मुद्यांना पाहू शकतो ज्यांचा उपयोग आम्हाला इतरांना मासिके सादर करताना करता येईल. त्यातील अशा भागावर आम्ही खूण करून ठेवू शकतो जो खासकरून आमच्या मंडळीच्या क्षेत्रामध्ये जास्त लागू होतो किंवा आम्हाला बोलक्या मुद्यांची आठवण करून देण्यासाठी व स्थानिकरीत्या मासिकांना सादर कसे करता येऊ शकते याबद्दलचे काही टिपण मासिकाच्या समासात लिहू शकतो.
२ आमच्या मासिकांना चिरकालचे मूल्य आहे. आम्ही चालू मासिकांना सादर करण्याचे प्रमुख लक्ष ठेवत असलो तरी, जुन्या मासिकांना फेकून देण्याची काही गरज नाही, कारण त्यातील माहिती जुनी होत नाही. मागील अंक तुमच्या क्षेत्रसेवेच्या बॅगेत ठेवा जेणेकरून साक्षकार्य करताना ती तुम्हाला उपलब्ध होतील. घरमालकाची एखादी विशिष्ट गरज कळते तेव्हा हे उपयोगी ठरते. जुने मासिक दिल्यानंतर, त्या मासिकाची आम्ही घेत असलेली देणगी सांगणे उचित ठरेल.