“ईश्वरी शिक्षण” या १९९३च्या प्रांतिय अधिवेशनापासून पूर्णपणे लाभ घ्या
१ “हे यहोवा, तुझा मार्ग मला शिकीव.” (स्तोत्र. ८६:११ पंडिता रमाबाई भाषांतर) देवाच्या प्रत्येक समर्पित सेवकाची ही मनःपूर्वक विनंती असली पाहिजे. शिकून घेणे व आम्ही जे काही शिकतो त्याचे अनुकरण करण्याचे कधीही न थांबवण्याचा आमचा निश्चय आहे. काही वेळा आम्हाला ताळ्यावर आणण्याची आवश्यकता असते, आणि स्तोत्रकर्त्याप्रमाणे, आमचे हृदय एकाग्र करण्यासाठी आम्ही देवाला विनवणी केली पाहिजे जेणेकरून ते विभागणार नाही. “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशनाचा कार्यक्रम, ह्या व्यवस्थीकरणाच्या दबावांमध्ये राहात असताना यहोवाची सेवा विश्वासूपणे करण्यासाठी व्यावहारिक सूचना आणि आम्हाला हवी असलेली सुधारणूक पुरवील.
२ चार दिवसांचे अधिवेशन: हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये १६ सोयीस्कर ठिकाणी सादर केला जाईल. जुलै १५, १९९३ चा द वॉचटावरचा अंक आणि प्रादेशिक भाषांतील मे १, १९९३चा अंक ह्या ठिकाणांची पूर्ण यादी पुरविते. इंग्रजी सोबत हा कार्यक्रम, आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, कोंकणी, मल्याळम, मराठी, तामिळ, आणि तेलगू या भाषांमध्ये त्या त्या ठिकाणी होईल. बहुतेक जागी, हा कार्यक्रम गुरुवारी दुपारी १:२० वाजता चालू होईल व रविवारी दुपारी जवळजवळ ४:१५ वाजता संपेल.
३ आमच्यासाठी काय राखून आहे? जड आध्यात्मिक अन्नाची मेजवानी विविध मार्गाने सादर केली जाईल: भाषणे, प्रात्यक्षिके, मुलाखती, आणि दोन नाटके. ह्या महत्त्वाच्या सूचनांमधील एकही चुकवू नका! यासोबत, ज्या जुन्या ओळखी आहेत त्यांना पुन्हा नवीन बनवण्यास व नव्या लोकांसोबत मैत्री करण्यास आम्ही पुढे पाहत आहोत. विदेशी नेमणूकीत काम करणारे मिशनरी तुमच्या अधिवेशनाला कदाचित उपस्थित राहतील. ह्या विश्वासू बंधू आणि भगिणींची ओळख करून घेण्याच्या संधीचा फायदा घ्या. तुम्ही पालक आहात तर, तुमच्या संभाषणात तुमच्या मुलांना देखील सामील करा. या मिशनऱ्यांचा आनंदी आणि आत्म-बलिदानाचा आत्मा कदाचित तुमच्या तरुण मुलांसाठी पूर्ण वेळच्या सेवेचा विचार करण्यासाठी पाया घालू शकेल.
४ सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणाल का? मलाखी ३:१० मध्ये यहोवाने इस्त्राएलांना अभिवचन दिले की जर ते यहोवाची प्रतीती पाहून सगळा दशमांश भांडारात आणू इच्छितील, तर तो त्यांना आणखीन आवश्यकता भासणार नाही इतक्या आशीर्वादांचा वर्षाव त्यांच्यावर करणार होता.
५ काहींसाठी, यहोवाची प्रतीती पाहणे म्हणजे अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी परवानगी काढणे किंवा सुटीबद्दल विचारण्यासाठी त्यांच्या मालकाकडे होताहोईल तितक्या लवकर जाणे होय. अनेक वेळा असे करण्यासाठी बांधव कचरतात, ते असा विचार करतात की त्यांचा मालक अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी त्यांना परवानगी देणार नाही. तरीही, आध्यात्मिक गोष्टींचा समावेश नसलेल्या प्रकरणात, ते काय करू इच्छितात ते कळविण्यास त्यांना थोडा किंवा काहीच त्रास होत नाही.
६ आम्ही स्वतःला विचारले पाहिजे: जर आमच्या कोणा प्रिय मित्राचा किंवा मैत्रिणीचा दुसऱ्या गावी विवाह होणार आहे, तर आम्ही आमच्या मालकाकडे जाऊन लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सुटीची परवानगी काढणार नाही का? आणि जर तो सुटी देण्यास मागे पुढे पाहत असेल तर आमचे तेथे जाण्याचा काय अर्थ राखून आहे याचे त्याला आम्ही आदराने स्पष्टीकरण देणार नाही का? निश्चितच, मग, लग्न समारंभाला उपस्थित राहण्यापेक्षा यहोवाकडून शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे! अधिवेशनाचा कार्यक्रम आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे, याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तर, अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या मालकाला सुटीबद्दल विचारणे सोपे जाईल.—याकोब १:७, ८.
७ इस्त्राएलात, यहोवाच्या उपासनेच्या ठिकाणाला आर्थिक हातभार देणे दशमांशामध्ये समाविष्ट होते. आमच्या दिवसांमध्ये यहोवाच्या सेवेमध्ये आणि राज्याच्या कामात जो पाठिंबा दिला जातो त्यामध्ये थेटपणे जो वेळ, शक्ती आणि आर्थिक मदतीचा उपयोग केला जातो तो दशमांशाला चित्रित करतो. सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये आम्ही जो वेळ खर्च करतो तसेच आम्ही जेथे एकत्रित होतो त्याची स्वच्छता आणि निगा राखण्यात जे काही करतो ते सर्व दशमांशात समाविष्ट आहे. “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशन आम्हाला यहोवाच्या आध्यात्मिक भांडारात सगळा दशमांश आणण्यास अनेक संधी पुरवील. त्यापैकी काही कोणत्या आहेत?
८ अधिवेशनाच्या कार्यक्रमाला लक्षपूर्वक ऐकल्याने, प्रत्येक राज्य गीतामध्ये आवेशाने गाऊन भाग घेतल्याने, व प्रत्येक प्रार्थना काळजीपूर्वक ऐकल्याने, आम्ही हृदयपूर्वक आमेन म्हणून दशमांश आणू शकतो.
९ सत्यामधील आमची प्रगती, आम्ही कसे ऐकतो यावर काही प्रमाणात अवलंबून आहे. एका मोठ्या सभागृहात किंवा स्टेडियममध्ये, आमच्या सभोवतालचे लोक काय करत आहेत यामुळे आमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, आणि याच कारणास्तव, आम्ही आमच्या विचारांना ताब्यात ठेवले पाहिजे. तुमचे पवित्र शास्त्र, गायनाचे पुस्तक, पेन, वही, आणि त्या आठवडी ज्या टेहळणीबुरुजच्या लेखाचा अभ्यास होणार आहे ते आणून, पूर्णपणे तयारीनिशी अधिवेशनाला उपस्थित राहा. प्रत्येक वक्त्याने वापरलेल्या मुद्याचे आणि शास्त्रवचनाचे टिपण करणे मदतगार ठरेल. टिपण संक्षिप्त ठेवा; खूप टिपण घेतल्याने एकाग्रतेला अडथळा होऊ शकेल. तरूण जणांना देखील लक्षपूर्वक ऐकणारे होण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. कार्यक्रमाला होताहोईल तितक्या लक्षपूर्वक ऐकल्याने मुले देखील त्यांच्या पालकांसोबत दशमांश आणू शकतात.
१० काही पालक घरामध्ये प्रत्येक दिवशी त्यांच्या मुलांना संस्थेच्या पुस्तकातील चित्रांना पाहण्यास किंवा वाचण्यास निवांत वेळेची व्यवस्था करतात. ह्या सुंदर प्रशिक्षणामुळे, मुलांना सभांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये शांत बसण्यासाठी सोपे जाते. ज्या पालकांनी उदाहरणीय मुलांचे संगोपन केले, ते असे म्हणतात की त्यांनी त्यांच्या मुलांना सभांमध्ये खेळणी किंवा चित्र रंगवण्याचे पुस्तक आणण्याची कधीच परवानगी दिली नाही. अगदी लहान मूल देखील हे शिकू शकतो की सभांना येण्याचे कारण, यहोवाची भक्ती करणे हे आहे. सगळा दशमांश भांडारात आणण्याचा अर्थ त्यांच्यासाठी काय आहे हे जे पालक त्यांच्या मुलांना शिकवतात त्यांची खरोखरच प्रशंसा केली जाते!
११ अधिवेशन संघटनेला मदत करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करून आमचा वेळ आणि शक्ती देऊन आम्ही दशमांश भांडारात आणू शकतो. अनेक ठिकाणी अधिवेशनाच्या आधी स्वच्छतेची व्यवस्था अधिवेशन चालू होण्याच्या एक किंवा दोन दिवसापूर्वी केली जाते. तुम्ही जवळपास राहात असाल तर, संपूर्ण कुटुंब मिळून सहभाग घेण्यासाठी व्यवस्था का करू नये? काही बांधवांनी त्यांच्या प्रगतीशील पवित्र शास्त्राभ्यास विद्यार्थ्यांना सोबत आणले जेणेकरून यहोवाच्या भक्तीमध्ये काय गोवले आहे तेही ते त्यांच्या बाप्तिस्म्याआधी ओळखतील. अधिवेशनाची व्यवस्था सुरळीत जाण्याची खात्री होण्यासाठी पुष्कळ कामे आहेत. स्वयंसेवक म्हणून संपूर्ण कुटुंबानेच काम करू नये का?
१२ दशमांश देण्याचा आणखी एक मार्ग आहे, अधिवेशनामध्ये आमची आर्थिक मदत देणे. शुद्ध भक्तीला भौतिक देणगीचा उपयोग कसा करावा याची रूपरेषा देताना, यहोवाने इस्त्राएल राष्ट्रांस अशी आज्ञा दिली: “कोणीही परमेश्वरासमोर [यहोवा न्यू.व.] रिक्त हस्ते येऊ नये. तुझा देव परमेश्वर [यहोवा न्यू.व.] ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.” (अनु. १६:१६, १७) ते लोक थोडे किंवा अधिक देऊ शकत असले तरी, पूर्वीच तयार केलेले त्यांचे अर्पण, यहोवाला संतुष्ट करत होते. अशारीतीने, प्रार्थनापूर्वक विचाराने अनेक बांधव रोख किंवा वस्तुंच्या रूपाने देणगी देतात. तुमच्या लहान मुलांना देणगीच्या पेटीमध्ये दान घालण्यासाठी तुम्ही कधी देता का?
१३ सर्व गोष्टीत आपला तारणारा, देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणा: आमच्या शिष्टाचारामुळे व उत्तम वागणूकीमुळे, आम्ही “सर्व गोष्टीत आपला तारणारा, देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणू शकतो. (तीत २:१०) दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, अधिवेशनातच, आमच्या जीवनात ईश्वरी शिक्षणाचा अवलंब केला जात आहे हे आम्ही दाखवू शकतो.
१४ आमच्या शिष्टाचाराबद्दल काय आहे? एकमेकांबद्दलचा विचार आजच्या जगात फार कमी आहे. परंतु यहोवाचे लोक, ज्यांना शास्त्रवचनीय तत्त्वाने मार्गदर्शित केले जाते, त्यांच्याच हिताचा विचार करत नाहीत तर त्यांच्या सहकाऱ्यांचे देखील पाहतात. (फिलिप्पै २:४) आमच्या आजूबाजूला असणाऱ्यांचा आम्ही विचार करतो. अन्न किंवा प्रकाशने घेण्यासाठी जी रांग लागते तेथे आम्ही ढकलाढकली किंवा धक्काबुक्की करत नाही. वृद्धांचा आम्ही विचार करतो किंवा पालकांसोबत उभी असलेली लहान मुले ज्यांना न पाहिल्यामुळे प्रौढ लोक धक्का देऊ शकतात तर त्यांचा देखील आम्ही विचार करतो. उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही सभ्य आणि शिष्टाचाराने वागतो व जर तेथील सेवा आमच्या अपेक्षानुसार नसल्या तरी आम्ही उद्धट किंवा हक्काने बोलत नाहीत. आणि सेवा केल्याबद्दल योग्य बक्षिशी देण्याच्या रीतीच्या अनुरूप वागण्यास आम्हाला आनंद होतो.
१५ आमच्या ईश्वरी वर्तणूकीचा आमच्या सभोवतालच्या लोकांवर खरोखरी प्रभाव होतो. मागच्या वर्षी, एका अधिवेशन शहरात, एक पोलिस जो २१ वर्षांसाठी पोलिस दलात होता तो असे म्हणाला: “तुमच्या लोकांची शिस्त पाहून मी प्रभावीत झालो आहे. ते उल्लेखनीय आहेत. त्यांना कोणी सांगायच्या आधीच ते कचरा गोळा करतात व ते सुव्यवस्थित आहेत आणि तुमचे अधिवेशन उत्तमप्रकारे संघटीत आहे.” तो पुढे असेही म्हणाला: “तुमचे लोक जेव्हा आम्हाला पाहतात तेव्हा ते स्मित हास्य देतात. ते एक चांगले चिन्ह आहे. आम्ही तेच पाहतो. ते चिन्ह मित्रत्वाचे आहे आणि त्यामध्ये लपवण्यासारखे काही नाही. मुले त्यांच्या पालकांसोबत कसे असतात व त्यांना उत्तम शिस्त दिली आहे हेही आम्ही पाहतो. माझ्यावर विश्वास करा, मी खराच प्रभावीत झालो आहे. येथे काम करणे आनंदाचे आहे.”
१६ काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या शहरात अधिवेशन व्हावे याचे निमंत्रण देण्यासाठी बेथेलमध्ये एक खास फेरी मारली. संस्थेने हे नम्र निमंत्रण स्वीकारले, आणि ते अधिकारी नाराज झाले नाहीत. उपशहर व्यवस्थापक म्हणाले: “आमच्या शहरामध्ये तुमच्या सारख्या प्रतिष्ठित गटाला एकत्र बोलविण्यास आम्हाला फार आनंद होत आहे. तुम्हाला येथे बोलविण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले आहेत . . . याहून आम्हाला दुसरा आनंद झाला नसता.” त्यांच्या उत्तम वर्तणूकीमुळे, प्रत्येक बंधू आणि भगिणी तेथे देण्यात आलेल्या उत्तम साक्षीला कारणीभूत ठरले.
१७ तुमच्या उदाहरणीय वर्तणूकीद्वारे, तुम्ही व्यक्तिगतरीत्या आपला तारणारा, देव ह्याच्या शिक्षणास शोभा आणाल का? तसे करू शकण्याचे येथे अनेक मार्ग आहेत:
वस्त्र आणि केशभूषा: अधिवेशनाला उपस्थित असताना, आम्ही सुटीवर आहोत असे समजू नये. उलटपक्षी, यहोवाकडून शिक्षण प्राप्त करून घेण्यास आम्ही स्वतःला सादर करीत आहोत. ही गोष्ट असल्यामुळे, राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहताना आम्ही ज्याप्रकारे वस्त्र परिधान करतो त्याप्रकारे परिधान करू नये का? (१ तीमथ्य. २:९, १०) यासोबतच, कार्यक्रम संपल्यावरही आम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालतो याकडे देखील आम्ही काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आमच्या राहत्या ठिकाणी गेल्यावर, आम्ही कोणत्याही वयाचे असो, आमचा सभ्य, प्रतिष्ठित अधिवेशानाचा पोषाख बदलून अशा प्रकारचे वस्त्र घालू का ज्यामुळे आम्ही गबाळ्या आणि गलिच्छ जगिक लोकांप्रमाणे दिसू? आपण सभेला घालतो ते वस्त्र आपल्या नवीन पद्धतीचा प्रतिबिंब असण्याऐवजी ते केवळ एक पेहराव आहे असा यामुळे प्रभाव पाडला जात नाही का? आम्ही यहोवाचे नाव धारण करतो याची आठवण ठेवा, व प्रत्येकाने हे पाहिले पाहिजे की सत्याच्या मार्गाविरुद्ध कोणता कायदेशीर आरोप लावला जाणार नाही.
बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना याची आठवण करून दिली पाहिजे की अशा पवित्र प्रसंगी जगिक घोषवाक्य, ठसा, किंवा व्यापारी जाहीरात असलेले टी-शर्ट घालणे अनुचित ठरेल. वडिलांनी याची खात्री करून घ्यावी की बाप्तिस्म्याच्या प्रश्नांची उजळणी आधीच केली आहे आणि प्रत्येक उमेदवाराला योग्य समयी सांगितले जाते की तो बाप्तिस्मा घेण्यास पात्र आहे की नाही. (बाप्तिस्म्यासाठी योग्य, सभ्य पोषाखाविषयीच्या सूचनांसाठी, प्रश्न घेत असताना ती उचित वेळ असेल.)
हॉटेल: तुमची हॉटेलात आल्याची नोंद करतेवेळी आत्म्याची फळे प्रकट करा. हॉटेलची नोकर मंडळी कमी वेळात मोठ्या गटाला हाताळण्यास सुसज्ज नसतील. धीर धरा, समभावना असू द्यावी, व उचित बक्षिशी द्यावी.
हॉटेलच्या मालमत्तेला आदर दाखवून व पुरविलेल्या तरतूदींचा वापर कसा करावा यासंबंधाने असलेल्या नियमांचे पालन करून मुले आपला भाग पार पाडू शकतील. अधिवेशनाच्या काही काळाआधी आपला वेळ खर्च करून पालकांनी मुलांबरोबर याची उजळणी घ्यावी की त्यांच्याकडून कोणत्या प्रकारच्या वागणूकीची अपेक्षा केली जाते व त्यांना याची आठवण करून द्यावी की ख्रिस्ती वागणूकीच्या दर्जांशी जुळवून घेण्याची त्यांची व्यक्तिगत जबाबदारी आहे. असे केल्याने ते पालकांसाठी उपयोगी ठरेल.
ध्वनिमुद्रणाची उपकरणे: व्हिडीओ कॅमेरा वापरण्याची मुभा असली तरी, आपण दुसऱ्यांबद्दल काळजी राखाल हे आम्हाला माहीत आहे. कार्यक्रमाचे चित्रण करताना अधिवेशनाला आलेल्या इतर बांधवांना अडथळा निर्माण करणे प्रेमळपणाचे ठरणार नाही. आपल्या बसलेल्या जागेवरुन जर तुम्ही सूज्ञपणे ध्वनिमुद्रण करू शकला तर तुमचे असे करण्याला मनाई नाही. कृपया हे लक्षात ठेवा की, कोणताही कॅमेरा किंवा ध्वनिमुद्रणाचे उपकरण अधिवेशनाच्या विद्युत किंवा ध्वनिमाध्यमाला जोडायचे नाहीत. तसेच दोन रांगेतील पायवाटेवर किंवा रहदारीच्या जागेत ही उपकरणे ठेवू नयेत.
बैठक: कृपया हे लक्षात ठेवा की जागा केवळ तुमच्या जवळच्या कौटुंबिक सदस्य व जे कोणी तुम्हासोबत प्रवास करतात त्यांच्यासाठी राखल्या जाव्यात. वयस्कर तसेच अपंगासाठी काही अधिवेशनात खास विभाग नेमून देण्यात आलेले असतील. कृपया वयस्करांकडे लक्ष द्या. गतकाळात, काही वयस्कर बांधवांना अडचणीच्या ठिकाणी जागा बघाव्या लागल्या कारण युवकांनी वयस्करांसाठी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट जागा पटकाविल्या होत्या. ज्यांना ॲलर्जी आहे अशांसाठी वेगळ्या खोल्या किंवा वेगळी जागा नेमून देणे शक्य होणार नाही याचा आम्हाला खेद वाटतो.
वैयक्तिक वस्तू: अधिवेशनाला येताना कमीत कमी सामान आणा असे सुचविले जाते. एखादी वस्तु आपल्या बैठकीच्या खाली मावू शकत नसल्यास ती घरीच किंवा कारच्या सामानासाठी असलेल्या जागेत सोडणे बरे. सुरक्षा कारणामुळे पाण्याचे मोठमोठे चंबू आणण्याची परवानगी दिली जात नाही, हेच चंबू जर तुम्ही आपल्या बाजूच्या बैठकीवर ठेवले तर त्यामुळे दुसऱ्याला बसायला जागा मिळणार नाही.
प्रकाशन व जेवणाची व्यवस्था: काहीही वाया जात नाही याकडे लक्ष देऊन, देवाच्या चांगल्या देणगीला कृतज्ञता दाखवण्यास आम्हा सर्वांना आवडेल. (योहान ६:१२) तुम्हाला जितके लागते त्यापेक्षा अधिक घेतले जात नाही याची खात्री करा. पालकांनी अन्न वाया जाऊ नये याबद्दल त्यांच्या मुलांसोबत बोलणी करावी. प्रकाशनांचे वाटप होत असताना कृपया इतरांसाठी प्रेमळ काळजी दाखवा.
१८ इतरांच्या प्रेमळ काळजीसाठी, प्रत्येक दिवशी लवकर येण्याची योजना करा, विशेषतः गुरवारी कारण तेव्हा गाड्या उभ्या करण्यासाठी व बैठकीसाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल.
१९ यहोवाकडून शिक्षण प्राप्त करण्याचा आमचा किती मोठा सुहक्क आहे! ह्या महिन्याच्या “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशनाला पाठिंबा देण्यासाठी वापरण्यात आलेला आमचा वेळ, शक्ती, आणि भौतिक संपत्ती, याचा परिणाम आम्हाला व आमच्या कुटुंबासाठी आध्यात्मिक लाभ असा होईल.