आस्थेवाईकांना शोधण्याकरता माहितीपत्रकांना सादर करणे
१ माहितीपत्रके प्रभावकारी साधने आहेत. केवळ ३२ पृष्ठांमध्ये, एक माहितीपत्रक शास्त्रवचनीय सत्याला खंबीरपणे सिद्ध करू शकते आणि युक्तीवाद तसेच देवाच्या ज्ञानाच्या विरुद्धतेत असलेल्या शिकवणींना उलथून पाडू शकते.—२ करिंथ. १०:५.
२ यहोवाचे साक्षीदार—जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत, हे माहितीपत्रक वाचल्यावर, एक मनुष्य असे लिहिण्यास प्रवृत्त झाला: “मी अशा प्रकारची संघटना कधीच पाहिली नव्हती. . . .धार्मिक दांभिकतेच्या ह्या युगात, देवाची मर्जी गंभीरपणे लेखणारे लोक सापडणे आश्चर्याची गोष्ट आहे.” आफ्रिकेतील एका वैदूने, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! या माहितीपत्रकाचा अभ्यास केला. याचा त्याच्यावर कोणता परिणाम झाला? त्याने त्याच्या वैदूच्या सर्व चालीरीती सोडून दिल्या व त्याच्या पहिल्या बायकोला ठेऊन दुसऱ्या स्त्रीला सोडून दिले. आणि नंतर त्याच्या बायकोबरोबर कायदेशीर विवाह केला.
३ तुम्ही त्रैक्य मानावे का? हे माहितीपत्रक उत्तम लेखी पुराव्याचे, तर्कयुक्त, आणि सत्याचे प्रभावकारी साधन आहे. त्याबद्दलचे विवेचन देताना, वेस्ट इंडिज, जमेकामधील द संडे ग्लिनरच्या एका धार्मिक लेखकाने असे म्हटले: “हे प्रकाशन . . . साक्षीदारांचे प्रावीण्य दाखवणारे आहे व आता कोणताही त्रैक्यवादी—किंवा व्दैतवादी सुरक्षित नाही. त्रैक्याची शिकवण पवित्र शास्त्रातली नाही हे दाखवण्यासाठी हे पत्रक ऐतिहासिक आणि धर्मशास्त्र उगमाचे उताऱ्यावर उतारे सादर करते. . . . येशू हा देव आहे या दृष्टिकोनाच्या विरुद्धतेत यहोवाच्या साक्षीदारांच्या भाग पाडणाऱ्या व अधिकारयुक्त वादविवादांना सर्वसाधारण सदस्य—किंवा हुशार चर्च सदस्य—कसे उत्तर देऊ शकतो हे पाहणे या धार्मिक लेखकाला अतिशय कठीण वाटते.”
४ त्यांचा उत्तमप्रकारे उपयोग करा: परिणामकारक होण्यास, ही आकर्षित व प्रामाण्ययुक्त साधने त्यांचे वाचन करणाऱ्या लोकांना सादर करावीत. आमच्याकडे विविध विषयांची, विविध माहितीपत्रके असल्यामुळे, आम्ही ज्या व्यक्तिला साक्ष देत आहोत त्याच्यासाठी उचित असणारा विषय सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आमच्या माहितीपत्रकासोबत परिचित असणे व विविध माहितीपत्रके जवळ बाळगल्यामुळे क्षेत्र कार्यात, घरात, किंवा कोठेही त्यांचा उपयोग करण्यास आम्हाला सोपे जाईल.
५ उदाहरणार्थ, जीवनामध्ये समस्यांचा सामना करणाऱ्या एका खिन्न व्यक्तीबरोबर बोलत असताना, किंवा भवितव्याबद्दल कमी आशा व्यक्त करणाऱ्याबरोबर बोलताना, तुम्ही कोणत्या माहितीपत्रकाचा उपयोग कराल? जर कोणीतरी प्रश्न विचारला की, एका प्रेमळ देवाने एवढ्या दु:खाला परवानगी का दिली, तर कोणते माहितीपत्रक त्याचे उत्तर देईल? एखादी व्यक्ती, लोकांचा फायदा करुन देणाऱ्या एका सरकारच्या गरजेविषयी काळजी व्यक्त करत आहे, तर तिच्यासाठी कोणते उचित माहितीपत्रक असेल?
६ कोणते माहितीपत्रक वापरावे हे जाणणे याबरोबरच, त्याच्या विषयांसोबत त्या व्यक्तीच्या इच्छांना तीव्र करण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती अनुमती देत असल्यास, त्यातील मजकूर वाचण्यास त्याची आस्था वाढविण्याद्वारे एखादे विवेचन किंवा चित्र दाखवा. किंवा त्याच्यासोबत तुम्ही एक किंवा दोन परिच्छेद वाचू शकता, नमूद केलेली वचने पाहा, आणि मजकूराची चर्चा करा. अशाप्रकारे अनेक उत्तम पवित्र शास्त्र अभ्यास सुरु केले आहेत.
७ आमची माहितीपत्रके शास्त्रीय उत्तरे पुरवितात व जगात होणाऱ्या अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करणाऱ्यांसाठी आशा देते. (यहेज्केल ९:४ पडताळा.) अशा प्रकाशनांमध्ये असलेल्या संदेशाकडे मेंढरासमान लोक प्रतिसाद देतील. आस्थेवाईकांना शोधत असताना आमच्या क्षेत्र कार्याच्या प्रत्येक पैलूत माहितीपत्रकांचा चांगला उपयोग करणे हा आमचा विशेषाधिकार आहे.