द वॉचटावर व अवेक! यांचा चांगला उपयोग करणे
१ द वॉचटावर आणि अवेक! ही मासिके आज लोकांना वाचण्यासाठी सर्वात मौल्यवान व सर्वात फायदेकारक आहेत. का बरे? कारण त्यामध्ये असलेली आध्यात्मिक सत्ये लोकांच्या जीवनावर त्यांच्या भल्याकरता अनंतकाळ परिणाम करू शकते. तथापि, बहुतेकजण त्यांच्या आध्यात्मिक गरजांबद्दल जागृत नाहीत, किंवा त्यांना भागवण्यासाठी कोठे जावे हे देखील त्यांना माहीत नाही. आध्यात्मिकरीत्या लोकांचे डोळे उघडण्यास मदत करण्यामध्ये प्रेषित पौलाचे अनुकरण करण्याचा आमचा विशेषाधिकार आहे.—मत्त. ५:३; प्रे. कृत्ये. २६:१८.
२ सकारात्मक असा आणि उत्तम तयारी करा: बहुधा तुमच्या क्षेत्रामध्ये सत्याला प्रतिसाद देणारे मेंढरासमान लोक असतील. काहींना मासिके वाचण्यासाठी प्रेमळ उत्तेजनाची आवश्यकता असेल. यास्तव, द वॉचटावर व अवेक! सादर करत असताना सकारात्मक आणि खात्री पटवून देणारे असा. मासिकांचा साठा नेहमी तयार ठेवा आणि त्यांचे, व इतर प्रकाशनांचे देखील वितरण करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्या.
३ मासिकांचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्यास आम्हास काय मदत करील? पहिल्यांदा, आम्ही स्वतः त्याच्या मूल्याची गुणग्राहकता बाळगली पाहिजे. आम्ही सादर करत असलेल्या मासिकांच्या विषयांशी परिचित असले पाहिजे, आणि यामुळे त्यांना सादर करण्यासाठी आमचा आत्मविश्वास व आमची उत्सुकता वाढेल. तुम्ही त्यांना पहिल्यांदा वाचता तेव्हा ही गोष्ट मनात राहू द्या. क्षेत्र कार्यामध्ये ठळकपणे सांगण्यासाठी मुद्यांची निवड करण्यास जागृत राहा. स्वतःला विचारा: ‘हा विषय खासकरून कोणास लागू होईल? एखादी गृहिणी, एखादी तरुण व्यक्ती, किंवा कदाचित एखादा व्यापारी याची गुणग्राहकता बाळगेल का?’ एखाद्या विद्यार्थ्याला, विवाहित व्यक्तिला, पर्यावरणाबद्दलची चिंता असणाऱ्याला, हा मुद्दा कुतूहल निर्माण करणारा असेल का? मासिकांना आम्ही आमच्या व्यक्तिगत ज्ञानाधाराने आणि त्यात प्रसिद्ध होणाऱ्या समयोचित लेखामुळे आम्हाला मिळणारा आनंद यांच्या आधारावर आम्ही इतरांना प्रस्तुती करावी.
४ जुन्या अंकांचा चांगला उपयोग करा: हे लक्षात घ्या की, द वॉचटावर आणि अवेक! त्यांच्या प्रकाशित ताराखांपासून एक किंवा दोन महिन्यांपर्यंत जरी वितरीत झाले नाही तरी ते आपले मोल गमावत नसतात. त्यामध्ये असलेली माहिती वेळ सरुन गेली तरी कमी मोलाची होत नाही, आणि जर ते चांगल्या स्थितीत आहेत तर जुन्या अंकांना सादर करण्यास मागेपुढे करू नका. जुन्या मासिकांना साठवून ठेवणे व त्यांचा कधीच वापर न केल्यामुळे या मौल्यवान साधनांची कमी गुणग्राहकता दाखवल्याप्रमाणेच आहे. प्रत्येक मासिकात सत्य आहे जे आध्यात्मिक जागृकता व भूक तृप्त करण्यास प्रभावकारी आहे. जुन्या अंकांना बाजूला सारणे किंवा विसरून जाण्यापेक्षा, आस्थेवाईक लोकांच्या हातात देण्यासाठी खास प्रयत्न करू नयेत का, किंवा निदान लोक घरात नसतात तेव्हा चटकन लक्षात न येणाऱ्या ठिकाणी ठेऊ नयेत का?
५ अवेक! मासिकाने अनेक लोकांची मदत केली आहे जे प्रथम त्यांच्या आध्यात्मिक गरजांबद्दल जागृत होण्यासाठी आध्यात्मिक मनोवृत्तीचे नव्हते. द वॉचटावर यहोवाच्या लोकांच्या आध्यात्मिक भरवणूकीच्या कार्यक्रमामध्ये महत्त्वपूर्ण साधन आहे. ही मासिके एकमेकांना फार उत्तम प्रकारे पूरक आहेत, व सुवार्तेचा प्रचार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात.
६ मासिकांना सादर करण्यासाठी प्रत्येक संधीचा आम्ही फायदा घेत असता, मेंढरासमान लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या प्रभावीपणावर आम्हाला पूर्ण भरवसा आहे. आम्ही सकारात्मक दृष्टिकोन राखला पाहिजे, चांगली तयारी केली पाहिजे, व क्षेत्र कार्यामध्ये नियमित असले पाहिजे. सुवार्तेचे प्रचारक असल्यामुळे, आपण सर्व नियमितपणे द वॉचटावर आणि अवेक! मासिकांचा चांगला उपयोग करत राहू या.