आज आमच्या सेवा कार्यात पत्रिका इतक्या मौल्यवान का आहेत
१ द वॉचटावरच्या जानेवारी १, १९९१च्या पृ. ३० वर एक अनुभव होता ज्याचे शीर्षक “त्याला रुळावर एक पत्रिका सापडली” असे होते. तेथे असे सांगितले आहे की एका रेलरोड मेंटेनन्स सुपरवाइजरला आपल्या पत्रिकांमधील एक पत्रिका रुळाच्या खाली सापडली. त्याने ती लागलीच वाचली आणि त्याच्या जावयाला सांगितले: “आज मला सत्य सापडले!” त्या दोघांनी आणखी प्रकाशने मागवली आणि त्याचा अभ्यास केला. आता, त्यांचे शंभर पेक्षा अधिक नातेवाईक सत्यामध्ये सक्रिय आहेत. एक पत्रिका वाचल्यामुळे कोणता परिणाम होऊ शकतो ते ह्यावरून दिसून येते.
२ संधीचा उपयोग करणे: आमचे बांधव पत्रिका सादर करण्यासाठी संधीचा उपयोग सर्वत्र करीत आहेत. एका साक्षीदार युवतीने पाहिले की तिची शिक्षिका तिच्या सासूच्या मृत्यूच्या कारणाने खूप उदास वाटत होती. त्या युवक बहिणीने तिच्या शिक्षीकेला एक सांत्वनदायक पत्र लिहिले आणि मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? ही पत्रिका देखील पाठवली. शिक्षिकेने आभार प्रदर्शनाची एक चिठ्ठी लिहिली आणि आपल्या तरुण बहिणीसोबत बोलली. आता ही शिक्षिका नियमितपणे ह्या युवतीकडून मासिके स्वीकारते.
३ काही प्रचारक स्मशानभूमीकडे नेणाऱ्या रस्त्यावरील साक्षकार्य करताना त्यांनी लोकांना कबरांना चुना लावताना पाहिले. त्यांना पत्रिका सादर करण्याच्या संधीचा प्रचारकांनी उपयोग केला. दुसरा दिवस सुट्टीचा होता जेव्हा अनेक लोक स्मशानभूमीला भेटी देणार होते, यास्तव, प्रचारकांनी स्मशानभूमीच्या दरवाज्यापाशी उभे राहून पत्रिकांना वाटप करण्याचे ठरविले. पाचशे पत्रिकांचे वितरण केले गेले, ज्यामध्ये केवळ तीन व्यर्क्तिनी त्यांचा स्वीकार केला नाही. पुढच्या वर्षी, प्रचारकांनी पुन्हा एकदा जाऊन एक हजारपेक्षा अधिक पत्रिकांचे वितरण केले, आणि ह्या वेळेस सहा जणांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला. बहुसंख्य व्यर्क्तिनी गाढ गुणग्राहकता व्यक्त केली. एक मनुष्य बाहेर जात असता त्याने पत्रिका वाचली आणि थोड्याच वेळात पुन्हा येऊन ज्या बहिणीने त्याला ती पत्रिका दिली होती तिच्याबरोबर बोलण्यास आला. तो म्हणाला: “माझी इच्छा आहे की आणखी एका व्यक्तिने हा संदेश वाचावा. मला आणखी एक प्रत मिळेल का?”
४ पत्रिका ह्या अगदी सोईस्कर आकाराच्या व आपल्याबरोबर कोठेही नेण्यासाठी सोप्या आहेत. अनोळखी असो किंवा परिचित असो, दुसऱ्यांबरोबर अनौपचारिक चर्चा करत असताना, थोडक्यात बोलण्यासाठी आम्ही झटले पाहिजे ज्यामुळे आमच्याकडे असलेल्या आठ पत्रिकांपैकी एकाची चर्चा करण्याकडे निरविले जाईल. आमच्या शेजाऱ्यांबरोबर बोलताना, खरेदी करताना, किंवा भेटण्यासाठी ठरवून दिलेल्या वेळेत थांबलेले असताना, नातेवाईकांना भेटी देताना, किंवा आणखी इतर परिस्थितींमध्ये तुम्ही ते करू शकता.
५ एवढे परिणामकारक का: पत्रिका रंगीबेरंगी आकर्षक असतात. संक्षिप्त असतात. घरमालक किंवा अनौपचारिक परिस्थितींमध्ये आम्ही भेटत असलेल्यांना लांबलचक माहिती वाचण्यास भाग पाडत नाही व जेरीस आणत नाही. तरीसुद्धा, त्यातील संदेश मनोवेधक व माहितीयुक्त आहे. वाचकाला पत्रिकेमधील विषयाचा दृढ शास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त होतो. शांतीपूर्ण नवीन जगातील जीवन ही पत्रिका मिळाल्यानंतर व त्याची उजळणी केल्यानंतर, एका व्यक्तिने असे म्हटले: “जगाच्या परिस्थितीबद्दलची इतकी उत्तेजक माहिती ह्याआधी मी कोठेच ऐकली नव्हती!”
६ प्रत्येक उचित परिस्थितींमध्ये आम्ही पत्रिकांचा उपयोग करण्यास हवा. घरोघरच्या कार्यामध्ये संभाषण चालू करण्यासाठी अनेक प्रचारकांना मदत मिळाली आहे. आता चालू असलेल्या अनेक अभ्यासांची सुरवात पत्रिकेनेच झाली. आमची राज्य सेवा ह्या अंकाच्या पृष्ठ ४ वर, परिणामकारकरित्या पत्रिकांचा उपयोग कसा करावा यासाठी काही व्यवहारिक सूचना दिल्या आहेत. होय, पत्रिका लहान असल्या तरी आमच्या सेवेसाठी मौल्यवान साधन आहेत.