सर्वश्रेष्ठ मनुष्याबद्दल शिकण्यासाठी इतरांना मदत करणे
१ सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ज्यांनी वाचले आहे त्या अनेक लोकांनी त्यांच्या जीवनावर जो परिणाम झाला आहे त्याबद्दल प्रामाणिकपणे गुणग्राहकता व्यक्त केली आहे. एकाने असे लिहिले: “मी पुस्तकाच्या शेवटाला पोंहचलो त्यावेळेला जणू काय येशूने त्याच्याबरोबर संगती करण्यासाठी, त्याच्याबरोबर जीवन व्यतीत करण्यासाठी, त्याच्या दु:खात, त्याच्या भावनांमध्ये व त्याच्या सेवेच्या प्रत्येक पैलूत सहभाग घेण्यासाठी, निमंत्रण दिले आहे असे मला वाटले. . . . ते पुस्तक वाचणे म्हणजे जणू काय येशूच्या जीवनावर आधारित एखादा चित्रपट पाहिल्याप्रमाणे आहे.”
२ सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक केवळ येशूसोबतच नव्हे तर यहोवाबरोबरही उत्तमरितीने परिचित होण्यासाठी आम्हाला मदत करते. (योहान १४:९) त्या पुस्तकाच्या संदर्भात एका १२ वर्षीय युवकाने असे म्हटले: “मी ते पुस्तक वाचल्याबरोबर यहोवाला आनंदाच्या अश्रुंनी प्रार्थना केली कारण त्यामुळे मला खूप धीर मिळाला. माझ्या हृदयाच्या अगदी आतून मला खात्री झाली की यहोवा आणि येशू आमची काळजी घेत आहेत.” योहान १७:३ मध्ये लिहिल्याप्रमाणे येशू म्हणाला, की सार्वकालिक जीवन म्हणजे यहोवा आणि त्याचा पुत्र ह्याला आम्ही ओळखावे. येशूच्या जीवनाबद्दल ह्या पुस्तकाचा अभ्यास केल्याने यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाचे खास अंतर्ज्ञान आम्हाला मिळते कारण येशू “त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप आहे.”—इब्री. १:३.
३ सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या १ कोटी, ९० लाख प्रती सुमारे ७० भाषांमध्ये छापल्या आहेत. ह्यावरून दिसून येते की हे पुस्तक किती उत्तम प्रकारे स्वीकारले जाते. अनेकांनी हे पुस्तक त्यांना मिळाल्याबरोबर संपूर्ण वाचून काढले आहे. एका आस्थेवाईक माणसाने त्याला मिळाल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच ते वाचून काढले. एका पाळकाने ज्याने हे पुस्तक स्वीकारले असे म्हटले: “मी ते पुस्तक माझ्या हातून खाली ठेऊ शकत नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी माझी पत्नी आणि मी त्यातील काही भाग वाचतो.”
४ अनौपचारिक साक्ष: एका बांधवाने सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक त्याच्या कामाच्या ठिकाणातल्या लोकांना दाखवले. त्याच्याजवळ हे पुस्तक आहे अशी, व त्यामध्ये काय लिहिले आहे याबद्दलचीही माहिती सगळीकडे पसरली. ज्यांना ह्या पुस्तकाची एक प्रत हवी अशांची एक यादी त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांनी तयार केली. त्याने ४६१ पुस्तकांचे वितरण केले! ज्यांना ते पुस्तक मिळाले त्यातील पाच जण अभ्यास करत आहेत. एका भगिणीने, विमानातून प्रवास करत असताना सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक एका पाळकाला सादर केले जो एका नव्या चर्च मधील अधिकाऱ्याच्या धर्माधिकार दिक्षेला उपस्थित राहण्यासाठी चालला होता. तो पाळक वॅटिकन मध्ये सुमारे ४० वर्षांपासून होता. हे पुस्तक इतरांना सादर करण्यासाठी सर्वांनी प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा.
५ युवकजण त्याची गुणग्राहकता बाळगतात: युवकजण ह्या पुस्तकामध्ये खूप आस्था दाखवीत आहेत. एका नऊ वर्षीय युवकाने लिहिले: “माझे आवडते प्रकाशन सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक आहे, कारण त्यातून मी पुष्कळ काही शिकतो.” आम्ही प्रचार कार्यात जेव्हा युवकांना भेटतो त्यावेळेस त्यांच्या पालकांनी अनुमती दिली तर, त्यांना हे पुस्तक दाखवण्यासाठी वेळ खर्च करावा, व त्याच्यातील ठळक माहिती आणि चित्रांची उजळणी करावी. युवकांना आम्ही ही पुस्तके सादर करू शकतो. येशूला जाणण्याची संधी त्यांना दिल्यावर, युवकजण त्याची माहिती सांगू शकतील. येशू हा सर्वांना जवळ करणारा व्यक्ति होता.—मत्त. १९:१४, १५.
६ सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक वाचल्याने लोकांच्या जीवनात बदल होऊ शकतो. होता होईल तितक्या लोकांबरोबर त्याच्या माहितीची ओळख करून देण्याचा प्रयत्न करा. “त्याच्याबद्दल माहिती शिकून घेऊन लाभ मिळवून घ्या” ह्या पोटमथळ्याखालच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या शेवटल्या पानावर दिलेल्या माहितीचा वापर करा. हे पुस्तक वाचल्यामुळे त्याचा कोणता फायदा होईल हे केंद्रित करण्यासाठी ती माहिती लोकांना मदत करेल. तुमच्या क्षेत्रातील अनेकजण हे पुस्तक वाचल्यानंतर अशाप्रकारचे उद्गार काढतील जसे एका व्यक्तीने पुस्तक वाचल्यानंतर काढले: “मी वाचलेल्या सर्व पुस्तकांमध्ये हे सर्वात उत्तम पुस्तक आहे! त्याने माझे जीवन बदलून टाकले आहे.”