जूनसाठी सेवा सभा
जून ७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६२ (८९)
१० मि:स्थानिक घोषणा. “सुट्टीच्या स्मरणिका” याची संक्षिप्तपणे उजळणी व यावर लक्ष केंद्रित करा. अनौपचारिक साक्षकार्यात उपयोग करण्यासाठी मासिके नेहमी जवळ असण्याच्या महत्त्वाचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि:“सर्वश्रेष्ठ मनुष्याबद्दल शिकण्यासाठी इतरांना मदत करणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. वेळ अनुमती देत असल्यास, क्षेत्रसेवेत हे पुस्तक सादर करताना त्यांना कोणता आनंद मिळाला याचे श्रोत्यांना विवेचन सांगू द्या.
२० मि:“सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा.” श्रोत्यांबरोबर चर्चा. दोन प्रात्यक्षिके दाखवा. पहिल्या प्रात्यक्षिकामध्ये परिच्छेद २ मधील सुचविलेल्या सादरतेचा उपयोग करावा. पत्रिका सादर केल्यानंतर, प्रचारक पुस्तक सादर करतो परंतु घरमालक ते घेण्यास नकार दर्शवितो यास्तव तो दोन मासिके सादर करतो. दुसऱ्या प्रात्यक्षिकामध्ये परिच्छेद ४ मधील प्रस्तावनेचा उपयोग करावा, आणि ह्यावेळेस घरमालक पुस्तक स्वीकारतो. पवित्र शास्त्राचा उपयोग करून पत्रिकेच्या माहितीची थोडक्यात चर्चा केल्यानंतर प्रचारक ते सादर करतो. घरमालकाने सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक स्वीकारले नाही तर प्रचारक चालू महिन्याचे मासिक सादर करू शकतात याची आठवण करून द्या.
गीत २०५ (११८) व समाप्तीची प्रार्थना.
जून १४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९६ (६४)
१० मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा मधून काही निवडक घोषणा. ह्या आठवडी क्षेत्रसेवेत वापरण्यासाठी चालू मासिकातील उचित बोलके मुद्दे सुचवा.
१५ मि:प्रश्नपेटी. वडिलांचे भाषण. बाप्तिस्म्याला उपस्थित राहताना योग्य वर्तणूकीच्या आमच्या जबाबदारीकडे निर्देश करा. जानेवारी १९९२च्या आमची राज्य सेवा यातील प्रश्नपेटी मधून यासंबंधात असलेल्या मुद्यांना समाविष्ट करा.
२० मि:“आज आमच्या क्षेत्र कार्यात पत्रिका इतक्या मौल्यवान का आहेत.” प्रश्नोत्तराने चर्चा. शेवटच्या परिच्छेदानंतर, अनौपचारिक साक्षकार्यात एखादी पत्रिका सादर करणे किती सोपे आहे हे दाखवण्यासाठी एक प्रात्यक्षिक सादर करा.
गीत १२६ (१०) व समाप्तीची प्रार्थना.
जून २१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ३१ (५१)
१० मि:स्थानिक घोषणा. मार्च सेवाकार्य अहवाल प्रस्तुत करा. आणि त्या महिन्यासाठी क्षेत्रकार्य अहवालात स्थानिक मंडळीचा कोणता भाग होता तेही सांगा. जमाखर्च अहवाल व कसलीही देणगी मिळाल्यास त्याबद्दलही सांगा. स्थानिक मंडळीसाठी व संस्थेच्या जागतिक कामाला आर्थिक मदत दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
१५ मि:“सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातून पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद २ नंतर, पुस्तकातून पवित्र शास्त्र अभ्यास कसा चालू करू शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारक पुस्तकाच्या १११ अध्यायाचे पहिले तीन परिच्छेद वाचून आरंभ करतो आणि मग लेखाच्या २ परिच्छेदामधील सुचविलेल्या सादरतेवर चर्चा करतो.
२० मि:रिझनींग पुस्तकाच्या पृ. ८४-८ वर आधारित, क्रिएशनवर भाषण. नेमून दिलेल्या वेळेत बसतील तेवढ्याच मुद्यांचा वापर करण्यासाठी वक्त्याने निवडक असले पाहिजे.
गीत ७९ (८१) व समाप्तीची प्रार्थना.
जून २८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३० (५८)
१० मि:स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. चालू मासिकांमधील काही बोलक्या मुद्यांकडे लक्ष केंद्रित करा ज्यांचा वापर घरोघरच्या सेवाकार्यात किंवा अनौपचारिक साक्षकार्य करताना करू शकता.
२० मि:“क्षेत्र सेवेत नियमित असा.” सेवा पर्यवेक्षक किंवा पात्रता असणाऱ्या कोणत्याही बांधवाचे भाषण. वेळ जसे अनुमती देते तसे ऑर्गनाज्ड टू अकंप्लीश आवर मिनिस्ट्री मधील पृ. १०६-१० पर्यंतच्या माहितीची उजळणी. क्षेत्र सेवेत सर्वांनी भाग घेण्याच्या व न विसरता महिन्याच्या शेवटी क्षेत्रसेवेचा अहवाल देण्याच्या गरजेवर जोर द्या.
१५ मि:स्थानिक गरजा. फिरत्या पर्यवेक्षकांच्या मागील भेटीच्या दरम्यान दर्शविलेल्या मंडळीच्या गरजांच्या मुद्यांची उजळणी करू शकता, किंवा क्षेत्रसेवेच्या अहवालामध्ये मंडळीच्या काही गोष्टींची कमतरता किंवा दृढता यावर भाग प्रस्तुत करू शकता.
गीत ७१ (९६) व समाप्तीची प्रार्थना.