लिव्ह फॉरएव्हर पुस्तकाद्वारे खऱ्या ज्ञानाची घोषणा करा
१ सुंदर अशा पृथ्वीव्याप्त नंदनवनातील परिपूर्णतेचे चिरकालिक जीवन! ही यहोवाकडील केवढी थोर देणगी! देवाच्या प्रेमाने आम्हाला ही आशा आमच्या क्षेत्रातील लोकांना सांगण्यासाठी उत्तेजित केले पाहिजे. हे आम्ही यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् या पुस्तकाद्वारे करावे. हे पुस्तक दहा भारतीय भाषात आमच्या क्षेत्रकार्यासाठी उपलब्ध आहे.
२ पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकालिकपणे जिवंत राहण्याच्या विषयाची चर्चा करण्यास व ते पुस्तक सादर करण्याच्या तयारीत असण्यासाठी प्रथम आम्हाला पुस्तकातील माहितीसोबत पूर्णरुपाने परिचित असले पाहिजे. संभाषणाच्या विषयासोबत वापरण्याजोगे उत्तम बोलके मुद्दे तुम्हापाशी असू शकतील. आमच्या क्षेत्रकार्यात कोणत्या प्रकारचे लोक राहतात ते जाणून घेतल्यामुळे त्यांची, यहोवाने सार्वकालिक जीवनाबद्दल दिलेल्या अभिवचनाबद्दल आस्था जागृत करण्यासाठी कोणते अध्याय किंवा विशिष्ठ मुद्दे वापरावेत ते आपल्याला कळून येईल. घरमालकाला सत्याबद्दलची आस्था खेचून धरणारी चित्रे लक्षात ठेवा. तुमच्या क्षेत्रात पुस्तकाची सादर करताना ते ध्यानात असू द्या.
३ अभ्यासाचे उत्तम पुस्तक: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक हे उल्लेखनीय पवित्र शास्त्र अभ्यासाचे मार्गदर्शक असून तेच भावी काळच्या एकत्रीकरणासाठी आपला मोठा कार्यभाग पार पाडू शकेल असे मानण्यास आम्ही का आत्मविश्वास धरु शकतो? “देव सत्य होवो” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत नेते या पवित्र शास्त्र अभ्यास मार्गदर्शक पुस्तकांच्या यशस्वीतेसंबंधाने जे काही कळले त्याच्याच अनुषंगाने या पुस्तकाची रचना केलेली आहे. यास्तव, या पुस्तकात तीच मूलभूत शास्त्रवचनीय माहिती देण्यात आली असून सोबत जुन्या पुस्तकात वापरलेली तीच सुंदर शैक्षणिक पद्धत वापरली आहे.
४ विविध पवित्र शास्त्रीय तत्त्वे अधिक स्पष्ट व सूक्ष्मदर्शकरित्या कशी विवेचीत केली जाऊ शकतात यावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. प्रभावी अशी शाब्दिक व दृश्य रुपाची उदाहरणे गोळा करण्यात तसेच अधिक शोधक प्रश्न तयार करण्यात वेळ देण्यात आला. विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले पाहिजे हे ध्येय सातत्याने ठेवण्यात आले. एक प्रचारक लिहितोः “या पुस्तकातील सुंदर सादरता व मुबलक चित्र याखेरीज शास्त्रवचने, प्रश्न आणि व्यक्तीगत पवित्रा यांचा जो प्रभावशाली वापर करण्यात आला आहे तो मला खूप आवडला. या सर्व गोष्टी विद्यार्थ्याला त्याचे यहोवासोबत असणारे नातेसंबंध पाहण्यासाठी योजिल्या आहेत. स्पष्टरित्या दाखवण्यात आलेला फरक लोकांना निर्णय घेण्यात, होय, आपला विश्वास, वागणूक, प्रवृत्ती व धर्म यात बदल करण्यास साहाय्यक ठरला पाहिजे.”
५ विविध विषयावरील साहित्य: पवित्र शास्त्रीय सत्य, सुधारीत व प्रभावकारी पद्धतीने सादर करण्यासोबत हे पुस्तक आमच्या पूर्वीच्या अभ्यास मार्गदर्शक साहित्यापेक्षा विविध विषय प्रस्तुत करते. विद्यार्थ्याच्या लाभासाठी उपयुक्त असणारी अशी नव्या लोकांना महत्त्वपूर्ण वाटणारी माहिती समाविष्ट केलेली आहे. उदाहरणार्थ, अलिकडील काळातील आचारसहिता पुष्कळांसाठी सत्यामध्ये प्रगति करण्यासाठी मोठे अडखळण होत आहे. या कारणास्तव या गोष्टीला योग्यपणे हाताळले आहे. कोणत्या चुकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याबद्दलच्या थेट सूचनाच नव्हे तर कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याबद्दल उत्तेजन देण्यात आले आहे.
६ घरोघरचे कार्य करताना, रस्त्यावरील साक्षीकार्य तसेच पुनर्भेटी घेताना प्रत्येक प्रचारकाने आपणाजवळ लिव्ह फॉरएव्हर पुस्तकाच्या निदान दोन तरी प्रती ठेवाव्यात अशी शिफारस केली जाते. त्याच्याशिवाय क्षेत्रकार्यात जाऊ नका! पुस्तक सादर करताना तुमची सरळ मनोवृत्ती, त्यातील विषय दाखविणे आणि ते सादर करणे या गोष्टी पुष्कळ नवे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यास मार्ग उघडा करतील.
७ या शेवटल्या दिवसात राज्याचे सत्य घोषित करण्याबद्दल यहोवाने दिलेल्या हक्काची पूर्णता करीत असताना आपण जानेवारीमध्ये उत्साहाने लिव्ह फॉरएव्हर पुस्तक सादर करू या.