आस्थेवाईकांना मदत करण्यास आनंदाने परतणे
१ घरोघरच्या कार्यात भाग घेणाऱ्या प्रत्येकांची आस्थेवाईक लोकांना मदत करण्याची इच्छा असते. अशी मदत दिल्याने, आनंद व समाधानाचा आम्हास अनुभव येतो. (स्तोत्रसंहिता १२६:५, ६ पडताळा.) यासाठी आम्ही तयारीत असण्याची गरज आहे.
२ आमच्या घरोघरच्या कार्य अहवालावर संपूर्ण माहिती ठेवण्यापासून तयारीची सुरुवात होते. यामध्ये वॉचटावर किंवा अवेक! याचा कोणता अंक घरमालकाला दिला आहे तसेच वर्गणी मिळालेली आहे की नाही याचाही समावेश असेल. आधीच्या भेटीत कोणत्या गोष्टीची चर्चा केली तसेच घरमालकाची प्रतिक्रिया काय होती याचीही नोंद असावी. तुम्ही परत जाल तेव्हा संभाषण कशा प्रकारे सुरु करणार याचीही नोंद करावयास हवी.
३ उदाहरणार्थ, जर तुम्ही प्रथम प्रभूच्या प्रार्थनेचा उल्लेख केला असेल व “सरकार” हे माहितीपत्रक सादर केले असेल, तर तुम्ही थोडक्यात असे म्हणू शकताः
▪“माझ्या पूर्वीच्या भेटीत, आपण देवाची इच्छा या पृथ्वीवर कशी पूर्ण होणार आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात शांतीचा अनुवभ कसा होईल याची चर्चा केली होती. मी दिलेल्या माहितीपत्रकातील पान २९ वर मानवजातीसाठी देवाचे राज्य इतर कोणते आशीर्वाद आणणार आहे याबद्दल जे सांगते त्याकडे कृपया लक्ष द्या.”
४ जर ती व्यक्ती हिंदू असेल, तर असे म्हणू शकताः
▪“मी पहिल्यांदा आलो तेव्हा, आपण दानीएल २:४४ मधील भविष्यवाणी आणि ती केव्हा पूर्ण होईल याबद्दल चर्चा केली.” ते वचन पुन्हा एकदा वाचा आणि आपल्या समस्या त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? या माहितीपत्रकातील पान १२ ते १७ चा संदर्भ घेऊन तुमची आधीची सादरता जेथे थांबली होती तेथून संभाषण पुढे चालू ठेवा. हा बदल केव्हा होईल याच्या कालमर्यादेसंबंधी पवित्र शास्त्र कोणत्याही प्रकारे शंकेला जागा ठेवत नाही या वस्तुस्थितीकडे घरमालकाचे लक्ष वेधवा. व्यावहारिक असल्यास, त्याला त्याचे माहितीपत्रक आणून साहित्याचा एकत्र विचार करण्यास आमंत्रण द्या.
५ घरमालक सधन किंवा इतर बाबतींमध्ये तृप्त आहे असे दिसत असल्यास, त्याला दिलेल्या मासिकातील उत्तेजनदायी चित्र अथवा माहितीवर त्याचा अभिप्राय तुम्ही विचारु शकता. किंवा जर त्याने केवळ पत्रिका घेतली असेल तर परत शांतीदायी नवीन जगातील जीवन या पत्रिकेचा संदर्भ घेऊन पान ३ आणि ४ मध्ये काय सांगितले आहे ते वाचू शकता. घरमालकास विचारा की त्याला नंदनवनमय अशा सुंदर पृथ्वीवर राहावयाची इच्छा आहे का. पान ६ वरील पोटमथळा ‘हे तुम्हासाठी कसे शक्य आहे’ या साहित्याची त्याच्यासोबत चर्चा करा.
६ याच मार्गाचा उपयोग वॉचटावर किंवा अवेक! या मासिकातील लेखाची चर्चा करताना देखील करू शकता, तुमच्या आधीच्या भेटीतील दिलेल्या लेखाचे ठळक मुद्दे सांगा आणि त्याच लेखातील अथवा तुमच्याजवळ असलेल्या दुसऱ्या लेखातील एखाद्या मनोरंजक मुद्याचा उल्लेख करा. शक्य असेल तर, शास्त्रवचन एकत्र वाचा आणि घरमालकाचे अभिप्राय विचारा.
७ कदाचित पहिल्यांदा तुम्ही त्याला भेट दिली तेव्हा घरमालक वर्गणी स्विकारण्यास कबूल झाला नसेल पण तुम्ही पुर्नभेटीसाठी जाता तेव्हा मासिकाचा पुढचा अंक दाखवू शकता, यामुळे त्यातील नवीन व मनोरंजक लेख त्याला दाखवू शकता आणि वर्गणी सादर करु शकता.
८ तुमचे ध्येय पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचे आहे हे ध्यानात ठेवा. सर्वसाधारणपणे त्या थरापर्यंत आस्था उत्पादन होण्याकरता अनेक भेटींची गरज आहे. शक्य आहे तितक्या लवकर परत जाण्याने घरमालकाबद्दल तुमच्यात असणारी वैयक्तिक आस्था दाखवा.
९ आम्ही गाजवीत असलेली सुवार्ता ही अतिशय आनंदाचे कारण आहे. (लूक २:१०) आमच्या प्रयत्नांना आस्थेवाईक व्यक्ती प्रतिसाद देतात, तेव्हा ते खात्रीने आनंदाचे कारण असते. (फिलिप्पै. ४:१) क्षेत्रामध्ये भेटणाऱ्या आस्थेवाईकांना मदत करण्यास परत जाण्याद्वारे अशा आनंदाची आपण कापणी करु.