मेसाठी सेवा सभा
मे ३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २०९ (३९)
१० मि:स्थानिक घोषणा. “माहितीपत्रकाचा वापर करण्याचे ध्यानात ठेवा.” यापेटीतील मुद्दे हाताळा.
२० मि:“जीवन बचावणाऱ्या आमच्या कार्यात यशस्वी सहभाग घेणे.” भाषण आणि प्रात्यक्षिक. संक्षिप्त प्रस्तावनेनंतर, २-५ परिच्छेदावर आधारीत तीन प्रात्यक्षिके सादर करा. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, सादरता स्थानिक क्षेत्रातील वेगवेगळ्या परिस्थितीत कशी साजेशी बनविता येते ते श्रोत्यांना विचारा. समाप्तीला या आठवड्याच्या शेवटी कार्यात पूर्णपणे सहभाग घेण्यास उत्तेजन द्या.
१५ मि:कुटुंबाच्या आध्यात्मिकतेचे महत्त्व. वडीलांद्वारे भाषण. कौटुंबिकरित्या दैनंदिन वचनाचा विचार करण्याच्या गरजेवर चर्चा, वेगवेगळ्या परिस्थितीतही हे कसे केले जाऊ शकते ह्याची आणि कौटुंबिक आराखड्याची रुपरेषा द्या. दिवसातून निदान एकदा तरी सर्व कुटुंब मिळून प्रार्थना करण्याच्या गरजेवर जोर द्या. रात्री झोपण्याआधी हे करता येईल. हे तत्त्व विभाजित कुटुंबात, एक पालकीय कुटुंबात, आणि मुले नसलेल्या कुटुंबातही लागू होते. कौटुंबिक तयारी करण्यामुळे प्रत्येक आठवडी होणाऱ्या मंडळीच्या सभेतून जास्तीत जास्त शिकता येते व इतरांचा विश्वास मजबूत करता येतो.—इब्री. १०:२३-२५.
गीत १०४ (५७) व समाप्तीची प्रार्थना.
मे १० ने सुरु होणारा सप्ताह
गीत २७ (७)
१० मि:स्थानिक घोषणा. मासिक व माहितीपत्रकाद्वारे अलिकडे कार्याचा आनंद लुटलेल्यांचा अनुभव. वर्गणी सादर करणाऱ्यात पुष्कळ प्रचारक आहेत का? याबाबतीत एका अथवा दोघांना त्यांचा अनुभव सांगू द्या. (मंडळीमध्ये वर्गणी हाताळणाऱ्या बांधवाच्या मदतीने याची आधीच योजना करावी.)
१५ मि:“घरोघरच्या कार्यातील आव्हानांना गाठणे.” प्रश्नोत्तरे. अवतरीत असलेली शास्त्रवचने वाचा व लागू करा.
२० मि:आम्ही कोणावर कृपा करावी आणि कोणाला देवाची कृपापसंती मिळाली आहे? वॉचटावर डिसेंबर १, १९९२ या अंकातील लेखाच्या पान ३-६ वरील भागाची श्रोत्यांचा सहभाग असलेले वडीलांद्वारे भाषण. वॉचटावर पंधरवडा आवृत्ती मार्च १, १९९३ चा अंक यामध्ये याच पानावर हा लेख आहे आणि महिन्याला येणाऱ्या आवृत्तीमध्ये हा लेख मे १, १९९३ मध्ये आहे. याला स्थानिकरित्या लागू करा, पण कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी बाळगा. तुमच्या भागातील शास्त्रवचनाला अनुसरून नसणारे काही सर्वसामान्य प्रचलित असणारे पूर्वग्रह असतील, त्यामध्ये ख्रिश्चनांनी कोणत्याही प्रकारे भाग घेऊ नये हे व्यवहारचातुर्याने दाखवून द्या.
गीत १३४ (६२) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे १७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६ (२५)
१० मि:स्थानिक घोषणा, सोबत जमाखर्च अहवाल आणि देणगी मिळाल्याची पोच पावती. स्थानिक मंडळीला तसेच संस्थेच्या जागतिक कार्याला आर्थिक हातभार लावल्याबद्दल मंडळीची प्रशंसा करा.
२० मि:“आस्थेवाईकांना मदत करण्यास आनंदाने परतणे” सभागृहासोबत चर्चा आणि प्रात्यक्षिक. आस्था दिसून आल्यास योग्य अहवाल ठेवण्याच्या गरजेवर जोर द्या. ३-६ परिच्छेदाचा विचार करीत असता दोन प्रात्यक्षिकांची आयोजना करा. हे स्थानिक परिस्थितीशी जुळणारे आणि गरजेला साजेसे असावे.
१५ मि:“बॉर्न अगेन.” रिझनिंग पुस्तकातील, पाने ७६-८०. दोन प्रचारकांद्वारे प्रात्यक्षिक ज्यांना घरोघरच्या कार्यात कोणीतरी अशी व्यक्ती भेटते जी “तुमचा पुर्नजन्म झाला आहे का?” असे विचारते. पान ७९-८०मध्ये जे मार्गदर्शन दिले आहे त्यातील एकाचा अवलंब करुन प्रचारक त्याला प्रतिसाद देतो. त्यानंतर, पान ७८ वरील १-३ परिच्छेदातील शास्त्रवचनातील मुद्यांद्वारे प्रचारक परत भेटीत चर्चा करतो.
गीत ५४ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे २४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४१ (६४)
१० मि:स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त आणि आमची राज्य सेवा मधील निवडक घोषणा. सप्ताहअंती आयोजलेल्या क्षेत्र कार्याची रुपरेषा सांगा.
२० मि:“तरुणांनो—आपले पाऊल कुशलतेने टाका.” प्रश्नोत्तराने साहित्याची हाताळणी करा. परिच्छेद ३ वर तरुण प्रचारक प्रौढ प्रचारकास क्षेत्र सेवेत त्याच्या सोबत काम करण्यास सांगत असल्याचे प्रात्यक्षिक, ज्यात प्रौढ प्रचारक आनंदाने स्वीकारतो आणि सोबत काम करीत असता अगोदरच सादरतेची उजळणी करण्याचे सुचवितो.
१५ मि:स्थानिक गरजा. किंवा वडीलांकरवी “खोटे बोलायला एवढे सोपे का वाटते?” या डिसेंबर १५, १९९२, च्या वॉचटावर लेखातील पान २१-३ वर आधारीत भाषण. प्रादेशिक भाषेत हाच लेख त्याच पानावर मार्च १५, १९९३ या वॉचटावर पंधरवडा अंकाच्या आवृत्तीत आढळतो. प्रादेशिक मासिक आवृत्तीत हा लेख मार्च १, १९९३ पान ३०-२ वर आढळतो.
गीत २२३ (५८) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे ३१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २०७ (११२)
१० मि:स्थानिक घोषणा. जून मध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या ग्रेटेस्ट मॅन या पुस्तकातील बोलके मुद्दे सांगा. आमची राज्य सेवा जून १९९३ मध्ये पाठीमागच्या पानावर दिलेल्या क्षेत्रसेवेच्या सुचनांची प्रचारकांना उजळणी करण्यास उत्तेजन द्या.
१५ मि:“साहित्यांची गुणग्राहकता प्रदर्शित करणे.” प्रश्नोत्तराने साहित्याची हाताळणी करा. मासिक कार्यातील प्रचारकाच्या प्रात्यक्षिकाचा समावेश करा. घरमालक पवित्र शास्त्राची सादरता व मासिकातील वर्णन यात आस्था दाखवितो, तरीही मोफत वितरीत करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतो. प्रचारक प्रेमळपणे हे स्पष्ट करतो की मोफत वाटप करण्यासाठी आमची मासिके प्रचार किंवा जाहिरात करण्याचा उद्देश राखून नाहीत. तर ते शैक्षणिक मासिक आहे ज्यात अमूल्य असा संदेश समाविष्ट आहे. तसेच हे व्यापारी काम नाही, तरीही योग्य अशा वर्गणीला प्रोत्साहीत केले जाते त्या मिळणाऱ्या पैशापासून कोणालाही लाभ होत नाही, त्याऐवजी त्याचा उपयोग पुढच्या शैक्षणिक कामाकरीता, मुख्यतः आणखी साहित्य प्रकाशित करण्यास होतो. त्यानंतर आनंदाने घरमालक प्रत्येकी ३.०० रु. असे मासिक स्वीकारतो.
१० मि:येणाऱ्या महिन्यामध्ये तुम्ही सहाय्यक पायनियर असाल का? गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यातही ज्यांनी कोणी साहाय्यक पायनियरींग केली त्यांची मुलाखत घ्या. तरुण अथवा ज्यांची परिस्थिती मुभा देते त्यांनी त्यांच्या सुट्टीच्या कालावधीचा चांगल्या संधीसाठी उपयोग करण्याचा विचार करावयास उत्तेजन द्या. काहीजणांना क्वचित काम होणारे किंवा एकाकी परिसर पूर्ण करावयास मदत करण्यास शक्य असेल. जे शालेय शिक्षण पूर्ण करण्याच्या मार्गाला असतील अशांना नियमित पायनियरींग करावयास अथवा अशा ध्येयापर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने काम करण्यास उत्तेजन द्या.—२ करिंथ. ९:६ब.
१० मि:देव आमच्या पापांची क्षमा करतो का? दोन वडील मेंढपाळकत्वाच्या भेटीची तयारी करतात. एक बांधव जो पूर्वी केलेल्या पापामुळे अजुनही समस्येत आहे व देव त्याला क्षमा करील का याची चिंता करीत आहे अशा बांधवाला कशी मदत करता येईल याबद्दल ते चर्चा करतात. रिझनिंग पुस्तकातील पान ८१-४ वरिल साहित्याची, आणि इन्साइट पुस्तकाच्या, पहिल्या खंडातील पान ८६१-२ याचीही ते उजळणी करतात. या बांधवाला प्रेमळपणे हाताळण्याच्या गरजेकडे व यहोवाची दयाळूपणाने व स्वेच्छेने क्षमा करण्याची वृत्ती प्रदर्शित करण्याकडे लक्ष देतात. त्या बांधवाच्या बाबतीत व्यक्तीगत प्रयत्नाच्या गरजेवर जोर देण्याचे ठरवितात; कारण कबुली देणे एवढेच पुरेसे नाही. वडील त्याला आध्यात्मिक मदत पुरविल्यानंतर वेळोवेळी पाहणी करतील.
गीत २१४ (८२) आणि समाप्तीची प्रार्थना.