तरुणांनो—आपले पाऊल कुशलतेने टाका
१ आमचा पिता, यहोवा, तरुण लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये वैयक्तिक आस्था बाळगून आहे. त्याच्या प्रेमळ आज्ञा पाळण्याद्वारे, तरुणजन केवळ त्याचे मनच आनंदित करीत नाहीत तर त्यांच्या जीवाला देखील तजेला मिळवतात. (नीति. २७:११; मत्त. ११:२८-३०) यहोवाला त्यांच्या पावलांना कुशल मार्ग दाखविण्यास ते अनुमती देतात.—नीति. १६:९.
२ देव व मानव या दोहोंकडून मान्यता मिळविलेला तरुण असे आपल्या तारुण्याचे उदाहरण येशू ख्रिस्ताने घालून दिले. (लूक २:५२) आजच्या तरुणांनीही असेच असण्यासाठी खास प्रयत्न करावेत. तरुण व्यक्तीच्या मार्गाला कुशल मार्गदर्शन आहे हे त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींच्या पाठलागावरुन दिसून आले पाहिजे. येशू १२ वर्षांचा असताना, यहोवाबद्दल इतरांशी बोलण्याच्या त्याच्या इच्छेमुळे ओळखला जाऊ लागला. (लूक २:४६, ४७) आज तरुणजनांनीही त्यांचा विश्वास इतरांना स्पष्ट करण्याची अशीच इच्छा दाखविली आहे.—w९० ७⁄१ पृ. २९-३०; w८७ १२⁄१ पृ. २१.
३ तुम्ही तरुणजन आता आणि खासकरून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या महिन्यात “आपल्या द्रव्याने . . . परमेश्वराचा [यहोवा, न्यू.व.] सन्मान” करावयास काय करणार? (नीति. ३:९) तुम्ही नेहमी जितके तास सुवार्तेचा प्रचार व शिक्षण देण्याकरता घालवता त्यात वाढ करून, कदाचित सहाय्यक पायनियरींग का करीत नाही? सेवेतील सहभाग वाढविण्यामुळे आपोआपच वाढणारा आनंद व इतर फायद्यांमुळे तुम्हालाच कदाचित आश्चर्य वाटेल. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रचारकांसोबत जास्त प्रमाणात क्षेत्रसेवेत कार्य करण्याची संधी मिळेल. आताच या सप्ताहाच्या शेवटी तुमच्यासोबत काम करण्यास एका किंवा दोघा अनुभवी प्रचारकास आमंत्रण देऊ शकता.
४ पालक आपल्या मुलांसोबत मिळून सेवा कार्य करण्याबरोबर एकत्र बसून सराव करण्यासाठी खूप उत्तेजन व मदत देऊ शकतात. मंडळीतील इतर प्रौढ व्यक्तीही तरुणांना त्यांच्यासोबत घरोघरच्या कार्यात व परत भेटीस आणि पवित्र शास्त्र अभ्यासास येण्यासाठी विचारण्यात पुढाकार घेऊ शकतात. अशा आध्यात्मिकतेत बळकट असणाऱ्यांसोबत जवळचे संबंध ठेवल्यामुळे तरुणांना उभारी येते आणि “प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न” करण्यास त्यांना मदत होते.—इब्री. ६:१.
५ प्रत्येक ख्रिश्चनाला त्याची शिकण्याची क्षमता सुधारण्याची गरज आहे. यात तरुणांना वगळण्यात आलेले नाही. ईश्वरशासित सेवा प्रशालेत तुम्हाला जी नेमणूक सादर करण्याची संधी दिली जाते त्यांची तुम्ही, युवकहो, संपूर्ण तयारी करता का? वाचन आणि व्यक्तीगत अभ्यास तसेच मनन याकरता तुम्ही नियमित आराखडा केला आहे का? जे साहित्य तुम्ही विचारात घेता त्याचा व्यक्तीगत अवलंब तत्परतेने करता का? साहित्याची पूर्ण समज मिळण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी तुम्ही सभेची चांगली तयारी करता का? सभेमध्ये जे सहाय्यकारी मुद्दे सांगितले जातात त्याची नोंद तुम्ही घेता का आणि आमची राज्य सेवा यामधील सूचनांचा वापर करण्याचा प्रयत्न करता का?
६ राज्यसभागृहाची स्वच्छता करण्यात भाग घेणे आणि वयस्कर व अशक्त बंधूभगिणींचे लहानसहान घरगुती काम करण्यास किंवा इतर व्यावहारिक मार्गाने मदत करण्याची संधी घालवून देऊ नका. राज्यसभा गृहाची काळजी बाळगण्यास लागणाऱ्या आणि संस्थेच्या जागतिक कामासाठी लागणाऱ्या खर्चासाठी तुम्ही स्वतः नियमितरित्या देणगी देण्याचे कधीही टाळू नका.
७ जर आम्ही “तुझ्या [यहोवा, न्यू.व.] वचनानुसार राखलो” आणि आपल्या पावलांना मार्गदर्शन देण्याची त्याला अनुमती दिली, तर तो आम्हाला आनंद देईल आणि सेवा करण्याची संधी वाढवील.—स्तोत्र. ११९:९.