सार्वकालिक जीवनाची आशा देणारा मृत्युदिन साजरा करणे
१ जीवनाचा प्रमुख अधिकारी याचा मृत्युदिन आम्ही एप्रिल ६, १९९३ला सूर्यास्तानंतर साजरा करणार आहोत. (प्रे. कृत्ये ३:१५) येशू ख्रिस्ताच्या जीवनाचे आणि मृत्यूचे स्मरण करणे हे फारच उचित आहे. येशूने ओतलेल्या रक्तावर आमच्या सार्वकालिक जीवनाची आशा आधारित आहे.
२ स्मारकविधी, यहोवाच्या उद्देशानुरुप घडलेल्या घटनेत ख्रिस्ताच्या मृत्युची अर्थसूचकता अधोरेखित करतो. त्या उद्देशात, आदामाच्या संततीला सोडवण्यासाठी परिपूर्ण मानवाच्या खंडणी यज्ञार्पण देण्याच्या गरजेचा समावेश होतो, यामुळे अब्जावधींना विश्वास ठेऊन नंदनवन पृथ्वीवर अनंतकाळ जगण्यास शक्य झाले आहे.—योहा. ३:१६.
३ सर्वच सत्याच्या व जीवनाच्या प्रेमिकांनी प्रभूचे सांज भोजन साजरे करण्याच्या येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्यासाठी उत्कंठा बाळगली आहे. (लूक २२:१९) येशूच्या खंडणी यज्ञार्पणाच्या तरतुदीची गुणग्राहकता दाखविण्यासाठी आम्ही व्यक्तिगतरित्या काय करू शकतो? या सणाच्या घटनेला ओळखण्यासाठी सुव्यवस्थितपणा अतिशय महत्त्वाचा आहे. या खास घटनेसाठी तुम्ही कोणती तयारी करीत आहात?
४ आगाऊ तयारी आवश्यकः निश्चितच, कुटुंबातील प्रत्येक सदस्य उपस्थित राहतील अशी आम्ही खात्री बाळगू शकतो. तसेच १९९३च्या कॅलेंडर मधील एप्रिल १-६ तारखेला दिलेल्या पवित्र शास्त्रीय भागांचे वाचन आणि मनन करून आम्ही मानसिक तयारी करु शकतो. एप्रिल ६च्या आधी आम्ही आमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक पवित्र शास्त्राच्या अभ्यासात स्मारकविधीच्या घटनांच्या माहितीचा समावेश करणे उचित आहे. लवकर येण्याची योजना करा तसेच स्मारकविधीचा समारंभ संपल्यावर काही वेळ थांबून राहा जेणेकडून पहिल्यांदाच उपस्थित होणाऱ्या नवोदितांना तुम्हाला भेटता येईल.
५ स्मारकविधीच्या काही आठवडे आधी, तुम्हाला माहीत असलेल्या सर्व आस्थेवाईक लोकांना निमंत्रण द्या. मंडळींना वर्षभरासाठी पाठवलेल्या फॉर्मसमध्ये छापील निमंत्रण पत्रही पाठवली आहेत. हे वापरताना, साजरा करण्याच्या ठिकाणाचा पत्ता तसेच वेळ आस्थेवाईक लोकांना कळविण्याचे लक्षात ठेवा. ज्यांना तुम्ही बोलावू इच्छिता त्यांची यादी तयार करा. जे सर्व उपस्थित राहू इच्छितात त्यांना वाहतुकीची व्यवस्था आहे का? जर नाही, त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? उदाहरणार्थ, तुमच्या कारमध्ये जागा असल्यास, कोणाला वाहतुकीची जरूर असल्यास त्याविषयी वडिलांकडे विचारणा का करु नये?
६ वडिलांना खास आगाऊ तयारी करण्याची गरज आहे कारण वर्षातील हा अतिशय महत्त्वाचा सण आहे आणि अधिक उपस्थितांची अपेक्षा केली जाते. (१ करिं. १४:४०) एप्रिल ६, च्या आठवडा आधी, सण साजरा करण्यासाठी जे बांधव मदत करतील त्यांच्यासोबत वडील खास सभेची व्यवस्था करतील, यात ते, सर्वांनाच बैठक व्यवस्था आणि बोधचिन्हाचे वितरण कसे केले जाईल हे समजल्याची खात्री करतील. सेवक किंवा वाटप करणारा या नात्याने मदत करण्यासाठी तुमची नियुक्ती केली असल्यास, याविषयासंबंधाने वडिलांच्या मार्गदर्शनाचे जवळून अनुकरण करण्याची खात्री बाळगा. पृष्ठ ७ वरील पेटीतील स्मरणिकांना पडताळण्याद्वारे, वडील, सेवक, वाटप करणारे, बोधचिन्हे आणि वक्ता यांची व्यवस्था आधीच केली आहे याची खात्री बाळगू शकतात.
७ आज पृथ्वीवर ख्रिस्ताचे बांधव कमी उरलेले आहेत, आणि भविष्यातील काही काळातच प्रभूच्या सांज भोजनाची पूर्णता होणे जवळ आले आहे. (१ करिं. ११:२५, २६) जोवर ते करण्याचा आमचा विशेषाधिकार आहे, तोवर सार्वकालिक जीवनाची आशा देणारा मृत्युदिन साजरा करीत राहू या.