वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९३ पृ. १
  • “या!” असे म्हणत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “या!” असे म्हणत राहा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    आमची राज्य सेवा—२००६
  • यहोवाच्या सेवेत आनंद मिळवणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाचा पुन्हा अभ्यास करणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • प्रतिसाद देणाऱ्‍या सादरता
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ३/९३ पृ. १

“या!” असे म्हणत राहा

१ येशूच्या खंडणी यज्ञापर्णाद्वारे यहोवाने केवढी अद्‌भुत योजना बनविली आहे! लोकांना आनंदी बनविण्यासाठी यात आम्हाला जरुरीचा आधार मिळतो. (योहान ३:१६) तथापि सांगावयास दुःख वाटते, की, फारच कमी लोक ह्‍या सत्यावर विश्‍वास ठेवतात व त्यास धरुन राहतात. तरीही, मानवजातीच्या प्रेमळ काळजीसाठी, यहोवाने ही सुवार्ता लोकांना समजण्यासाठी सर्वत्र उपलब्ध करुन ठेवण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताकरवी, आनंद प्राप्त करण्याची व सार्वकालिक जीवनाच्या आशेची सुसंधी त्याने सर्वांसाठी ठेवली आहे.—योहान १७:३.

२ मानवजातीला पाप आणि मरणापासून मुक्‍त करणाऱ्‍याची समज हजारों वर्ष ज्ञात नव्हती. येशू येऊन व “सुवार्तेच्या द्वारा जीवन व अविनाशिता ही प्रकाशित” होईपर्यंत हे “पवित्र गूज” होते. (रोम १६:२५; २ तीम. १:१०) पहिल्या शतकात येशूच्या अनुयायांनी ह्‍या सुवार्तेची घोषणा केली; आता या आधुनिक समयात जगत असणाऱ्‍या आम्हा सर्वांना त्याच सुवार्तेची घोषणा करण्याचा मोठा विशेषाधिकार आहे. आम्ही जेव्हा राज्याचा संदेश घोषित करतो, तेव्हा आम्ही यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि येशूचे बांधव जे लोकांना जीवनी मार्गांनी चालण्याचे, व “या!. . .आणि जीवनी पाणी फुकट” घेण्याचे निमंत्रण देत आहेत त्यांच्यासोबत आम्ही सहभागी होत असतो.—प्रकटी. २२:१७.

३ अर्थातच, सर्वच जन सुवार्ता ऐकणार नाहीत. फारच कमी याकडे लक्ष देतात. जीवन देणाऱ्‍या सत्यापासून फायदा घेण्यासाठी देवाचे सेवक निमंत्रण देतात तेव्हा काही उद्धटपणे त्यांचा अव्हेर करतात. असे असतानाही, यहोवाकडील शक्‍तीमुळे आम्ही हे काम निरंतर करीत असतो. आम्हाला हे माहीत आहे की सत्य बोलण्याची आमची स्वेच्छा व ऐकणाऱ्‍यांसाठी केलेल्या मदतीमुळे यहोवा आनंदी होत असतो व त्यामुळे आम्हावर त्याचे आशीर्वाद येत असतात.

४ मार्च मधील, आमच्या सेवकपणात आम्ही, सत्य शोधकांना यंग पिपल आस्क पुस्तक वाचण्याचे व आज स्वच्छ जीवन जगण्यासाठी त्यात दिलेल्या व्यवहारी सल्ल्याचे अनुकरण करण्यासाठी तसेच शेवटच्या अध्यायात भविष्यासाठी दिलेल्या आशेविषयी शिकण्याचे उत्तेजन देणार आहोत. किंवा आम्ही त्यांना अनंतकाळ जगू शकाल दाखवू व त्यांच्याबरोबर नियमित पवित्र शास्त्राभ्यास करण्यासाठी याचा वापर करण्याचे निमंत्रण देऊ शकतो. ह्‍या निमंत्रणाचा स्वीकार केल्याने अनेक आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील. शेवटी, पवित्र शास्त्र त्यांच्या आणि आमच्या—भवितव्याविषयी अधिक काही सांगते. यहोवाच्या आता समर्पित असलेल्या सेवकांना, अनंतकाळ जगू शकाल पुस्तकात पवित्र शास्त्रातील तत्त्वांचे स्पष्टीकरण वाचल्यावर पहिल्यांदा त्यांना सत्याविषयी आस्था निर्माण झाली होती. त्या पुस्तकाचा आम्ही स्वतः व्यक्‍तिगतरितीने सखोल अभ्यास केल्यावर, सत्यासाठी भुकेले असलेल्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांसाठी याचे किती महत्त्व आहे याची गुणग्राहकता बाळगू शकतो. आमच्या सेवकपणात अशाप्रकारचे लोक भेटतील, तेव्हा अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकातून त्याच्या आम्ही एक किंवा दोन मूल्याची ठळक माहिती देऊ शकतो. इतर गोष्टीत, या २०व्या शतकात पूर्ण होत असलेल्या पवित्र शास्त्रीय भविष्यवाणीची स्पष्ट समज, जसे की या पुस्तकातील १८ व्या अध्यायात येशूने दिलेल्याची स्पष्टता केली आहे ते दाखवा.

५ एप्रिल ६ ला ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी आम्ही साजरा करण्याची तयारी करीत असताना, मानवजातीसाठी यहोवाच्या प्रेमळ तरतूदीविषयी बोलणे आमच्याकरता अधिक उचित आहे. लोक मग ऐको अगर न ऐकोत, आम्ही उत्साहाने कोणालाहीः “या!. . .आणि जीवनाचे पाणी फुकट घेण्या”चे निमंत्रण देऊन देवाने दिलेली जबाबदारी निरंतर करीत राहू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा