वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९३ पृ. २
  • मार्चसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मार्चसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • उपशिर्षक
  • मार्च १ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च ८ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च १५ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च २२ ने सुरु होणारा सप्ताह
  • मार्च २९ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९३
km ३/९३ पृ. २

मार्चसाठी सेवा सभा

मार्च १ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ९ (१९)

१५ मि:स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा व ईश्‍वरशासित वृत्तातील काही ठळक गोष्टी, पृथ्वीवर विविध ठिकाणी असलेल्या त्याच्या सेवकांवर यहोवाचा आशीर्वाद कसा आहे हे स्पष्ट करा. उचित असल्यास स्थानिक मंडळीचा अनुभवाचा समावेश करु शकता.

१५ मि:“‘या!’ असे म्हणत राहा.” प्रश्‍नोत्तराने हाताळावे. परिच्छेद ४, ची चर्चा करताना, उत्तमरितीने तयारी केलेला प्रचारक, अनंतकाळ जगू शकाल पुस्तकातील १८व्या अध्यायातील पृष्ठे १५०-१५३ वरील चित्रे, येशू आणि इतर भाविष्यवाण्यांच्या काही मुद्यांची स्पष्टता करण्याविषयीचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि:“तुमच्या सेवकपणात अष्टपैलू व्हा.” भाषण, श्रोत्याबरोबर काही चर्चा. परिच्छेद ३-५ हाताळताना, दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. परिच्छेद ४, ५ मधील मुद्दा दाखविताना लेखात चर्चा केल्याप्रमाणे एक प्रौढ प्रचारक नवोदित प्रचारकासोबत घरोघरच्या कार्यात कसे एकत्र कार्य करु शकतात ते दाखवा. परिणाम कोणताही असला तरी उपाध्यपणात आनंद कसा मिळवला जाऊ शकतो या गरजेवर जोर द्या.

गीत ११४ (६१) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च ८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १२८ (४)

५ मि:स्थानिय घोषणा. एप्रिल मध्ये आधीच संमती मिळालेल्या सहायक पायनियरांविषयी सांगा. जे पायनियरींग करू इच्छितात अशांनी त्यांचे अर्ज लवकर देण्याचे उत्तेजन द्या.

२० मि:“यहोवाचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला आणखी काही करता येईल का?” परिच्छेद १-१०वर प्रश्‍नोत्तराने चर्चा.

२० मि:आमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला सहायता करणे. केवळ पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याऐवजी पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला अधिक सहायता करणे याची श्रोत्यांसोबत चर्चा करा. (१ थेस्स. २:८) सभांना उपस्थित राहण्याचे तसेच त्यात भाग घेण्याच्या हृदयापासून असलेल्या इच्छेला चेतविण्यासाठी अधिक वेळ द्या. विभागीय संमेलन, खास संमेलनाचा दिवस आणि प्रांतीय अधिवेशनाविषयी स्पष्टता देण्याद्वारे संस्था आणि आंतरराष्ट्रीय बंधुत्त्वाची गुणग्राहकता त्यांच्यात निर्माण करा. अभ्यासाच्या शेवटी, यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत या माहितीपत्रकाची चर्चा करा, यामधून ते काय शिकले याबद्दल त्यांच्याकडील मुद्दे काढून घ्या. प्रगतीशीलपणे ते शिकलेल्या गोष्टी इतरांना कसे सांगू शकतील हे दाखवा. पवित्र शास्त्र विद्यार्थी, आवर मिनिस्ट्री पुस्तकातील पृष्ठे ९८, ९९वर लिखित केलेल्या योग्यता जर पूर्ण करील आणि जाहीर सेवेत सहभाग घेण्याची त्याची इच्छा असली तर त्याला बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनण्यास मदत दिली जाऊ शकते. समर्पण आणि बाप्तिस्म्याच्या इच्छा विकसित करण्यासाठी अभ्यासापूर्वी व नंतर काही वेळ खर्च करणे महत्त्वाचे आहे. अधिवेशनातील बाप्तिस्म्याचे फोटो तसेच वर्तमान पत्रातील लेख विद्यार्थ्याला दाखवले जाऊ शकतात. प्रात्यक्षिक: अनौपचारिक साक्षीकार्यासंबंधाने प्रचारक पवित्र शास्त्राभ्यास करणाऱ्‍या विद्यार्थ्याला मदत देतो. अनंतकाळ जगू शकाल पुस्तकातून क्षेत्र कार्याच्या मुद्याची निवड करुन असे म्हणतो: या मुद्याची चर्चा तुमच्या नातेवाईकासोबत तसेच शेजाऱ्‍यांसोबत करणे चांगले असेल. तुम्ही सांगू शकता की जे तुम्हाला आधी माहीत नव्हते ते आता तुम्ही पवित्र शास्त्रातून शिकला आहात.” बाप्तिस्म्यानंतरही पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांसाठी प्रेमळ काळजी दाखवून मदत करण्याचे प्रचारकांना उत्तेजन द्या.

गीत १२३ (६३) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च १५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७२ (५८)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. देणगीच्या पावतीचा समावेश करा. या रकान्याच्या खाली असलेला “समयोचित संदेश” पडताळा. मार्च २८ला होणाऱ्‍या खास भाषणासाठी आस्थेवाईक लोकांना उपस्थित राहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि:“आस्था दाखविलेल्या सर्वांना मदत करणे.” भाषणाद्वारे श्रोत्यांसोबत चर्चा. वेळ असल्यास दिलेल्या शास्त्रवचनांचा विचार करावा. परिच्छेद ३ मध्ये दिलेल्या सल्ल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. पहिल्यांदाच उपस्थित होत असलेल्यांच्या आस्थेचा पाठलाग करण्यावर जोर द्या.

२० मि:“यहोवाचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला आणखी काही करता येईल का?” परिच्छेद ११ ते २२ ची प्रश्‍नोत्तराने चर्चा करा.

गीत ३२ (१०) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २२ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ६६ (३७)

१० मि:स्थानिक घोषणा. प्रश्‍न पेटी. एप्रिलमध्ये सेवकपणात अधिक सहभाग घेण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि:वयस्करांची काळजी घेणे. चर्चा आणि दोन बांधवांची मुलाखत. “ज्योती वाहक” प्रांतीय अधिवेशनात रविवारी सकाळी “ख्रिस्ती घरात एकमेकांची काळजी वाहणे” या शिर्षकाचा परिसंवाद सादर केला. समाप्तीचा भाग “वयस्करांची काळजी वाहणे” याने वयस्कर लोक कुटुंब आणि मंडळीसाठी कशी मदत करु शकतात हे स्पष्ट केले. (नीती. १६:३१) वयस्करांची काळजी आम्ही कोणत्या मार्गांनी घेऊ शकतो? याबाबत कुटुंबाची प्रमुख जबाबदारी आहे. (१ तीम. ५:३, ४, ८, १६) धीर आणि दया जरूरीची आहे. मोठी मुले तसेच मुलांच्या मुलांनी, पालकांनी, तसेच आजोबा आजीने गतकाळात वर्षांपासून दाखविलेली प्रीती, काम आणि काळजी याबद्दल त्यांची गुणग्राहकता दाखविण्याची संधी आहे. (w८७ ६/१ १३-१८) मंडळीदेखील वयस्करांची काळजी घेऊ शकते. पात्रता असणाऱ्‍या वयस्करांना सरकार जो निधी देते तो मिळवून देण्यामध्ये काही जन त्यांची मदत करू शकतात. भोजनासाठी तसेच एकत्र भेटता तेव्हा त्यांना बोलवून आदरतिथ्य दाखवू शकता. (रोम १२:१३) प्रचारकार्यात त्यांना मदत करू शकता. सभा आणि संमेलनासाठी त्यांच्या वाहतूकीची व्यवस्था करु शकता. त्यांचा बाजारहाट करण्यासाठी आणि घरची काळजी घेण्यासाठी त्यांना मदत करा. (w८७ ६/१ ४-७) वयस्करांना नेहमी आदर द्या. (१ तीम. ५:१, २) चांगले उदाहरण असणाऱ्‍या एक किंवा दोन वयस्करांची मुलाखत घ्या. कुटुंबाने आणि मंडळीने दाखविलेल्या दयाळूपणामुळे त्यांना कसा फायदा झाला ते स्पष्ट करा.

१५ मि:एप्रिलमध्ये पायनियरींग करण्याचे ठरविलेल्या किंवा आधी पायनियरींग केलेल्या तीन किंवा चार प्रचारकांची मुलाखत वडील घेतो. पायनियरींग करण्यासाठी त्यांना कशाने प्रवृत्त केले? एप्रिलसाठी त्यांनी कोणत्या योजना केल्या आहेत? व्यक्‍तिगतपणे सहाय्यक पायनियरिंगची त्यांना मदत कशी झाली? पुढील महिन्यात जे सहाय्यक पायनियरिंग करण्याची योजना करीत आहेत, अर्ज प्राप्त करण्यासाठी व लवकर तो भरुन देण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.

गीत १७२ (९२) व समाप्तीची प्रार्थना.

मार्च २९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १०५ (४६)

१० मि:स्थानिक घोषणा. स्मारकविधीच्या सणासाठी आस्थेवाईक लोकांना, आणि पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांना निमंत्रण देण्याची सर्वांना आठवण करुन द्या. छापील निमंत्रणाचा चांगला वापर करा. निमंत्रणावर वेळ आणि जेथे तो साजरा केला जाईल तेथील पत्ता सुवाच्च अक्षरात भरण्याचे उत्तेजन द्या.

२५ मि:“सार्वकालिक जीवनाची आशा देणारा मृत्युदिन साजरा करणे” अध्यक्षीय पर्यवेक्षकाने प्रश्‍नोत्तराने हाताळावा. “स्मारक विधीच्या तयारीसाठी” पेटीतील साहित्याचा समावेश करा. लेखातील ५ व्या परिच्छेदाचा विचार केल्यावर, प्रचारक पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला स्माकरविधीसाठी निमंत्रण देतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. एप्रिल १-६ दरम्यान निवडलेली पवित्र शास्त्र वचने वाचण्याच्या व्यवस्थेचे आणि वाहतूकीची व्यवस्था करण्याविषयी प्रचारक स्पष्टता देतो.

१० मि:एप्रिल महिन्यात वॉचटावरची वर्गणी सादर करणे. महिन्यात खास बोलके मुद्दे आणि दाखविले जाऊ शकणारे विषय ठळक मांडा. प्रत्येक प्रसंगी मासिकातील विषयाकडे लक्ष आकर्षित करण्यासंबंधी जागृत राहा.

गीत ८७ (४७) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा