वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९३ पृ. ४
  • “जे मी . . . आज्ञापिले ते शिकवा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जे मी . . . आज्ञापिले ते शिकवा”
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • लोक अनंतकाळ कसे जगू शकतील हे शिकण्यास त्यांची मदत करण्यासाठी परत जा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • आस्था दाखवलेल्या सर्वांसाठी खरी कळकळ दाखवा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • आस्थेवाईकांना मदत करण्यास आनंदाने परतणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km २/९३ पृ. ४

“जे मी . . . आज्ञापिले ते शिकवा”

१ शिष्य बनविणे यात शिकवणे गोवलेले आहे. एखादा व्यक्‍ति येशूचा शिष्य होण्याआधी, येशूने आज्ञापिलेल्या “सर्व गोष्टी पाळावयास” त्यास शिकवले पाहिजे. (मत्तय २८:१९, २०) हे साध्य करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे गृह पवित्र शास्त्र अभ्यास.

२ प्रत्येक वेळा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करणे एवढे सोपे नाही. पवित्र शास्त्राभ्यास शोधण्यात तुम्हाला कठीण वाटत असेल तर, खचून जाऊ नका. यशस्वीरित्या पवित्र शास्त्राभ्यास चालविण्यासाठी निर्धार असावा लागतो व इतरांना सत्य देण्याची प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.—गलती ६:९.

३ आस्था वाढवणे: तुमच्या पहिल्या चर्चेमुळे सीमीत आस्था उत्पन्‍न झाली असेल. परिस्थितीवर अवलंबून, घरमालकासोबत एखादी हस्तपत्रिका, माहितीपत्रक, किंवा मासिक सोडले जाऊ शकते. याच्यातील एकाचा उपयोग गृह पवित्र शास्त्राभ्यास चालू करण्यासाठी केला जाऊ शकतो. घरमालकाने संदेशाबद्दल आणखी आस्था दाखवली, तर त्याला पुढच्या भेटीत दुसऱ्‍या योग्य प्रकाशनाकडे निरवू शकता.

४ पूर्वतयारी ही यशाची गुरुल्ली आहे. तुमच्या पुन:र्भटीत हस्तपत्रिका, माहितीपत्रक, किंवा मासिक यातील एखादे शास्त्रीय वचन तुम्ही पुन:भेटीला जाण्याआधीच का निवडू नये? अशारितीने तुमच्या चर्चेत प्रकाशनातील विचारांना जुळवू शकता. कदाचित तुम्ही प्रत्यक्षात प्रकाशनातील एक किंवा दोन परिच्छेद थेटपणे वाचू शकता.

५ तुम्ही असे म्हणू शकता:

▪ “आम्ही अशा विलक्षण भविष्यवाणीविषयी इतरांबरोबर बोलत आहोत जिची पूर्णता सध्या होत आहे.” मत्तय २४:३, वाचा, आणि मग “आमच्या समस्या” ह्‍या माहितीपत्रकातील पृ. १३ ते १५ वरील चित्रे व लिहिलेल्या गोष्टी जुळवा. अशीच प्रस्तावना शांतीदायक नवीन जगातील जीवन ह्‍या हस्तपत्रिकेला सादर करताना वापरु शकता.

६ एकदा खरी आस्था स्पष्ट दिसून आली, तर लगेचच तिचा पाठलाग केला पाहिजे. एका आठवड्याआधीच जाण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे शेवटले संभाषण घरमालकाच्या ध्यानात ताजे असेल. प्रत्येक वेळी तुम्ही भेट देता, तेव्हा तुम्ही दिलेल्या प्रकाशनातून काही परिच्छेदांना विचारात घ्या. आणि मग योग्य समयी, अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकाचा परिचय करुन त्याच पद्धतीला चालू ठेवा.

७ येशूने भाकित केलेल्या मोठ्या कापणीमध्ये आज पुष्कळ काम आहे. (मत्तय ९:३७, ३८) प्रामाणिक अंतकरणाच्या लोकांना आम्ही शिकवत असता, आम्हाला येशूचा दृढ विश्‍वास आहे की तो ‘युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित’ आमच्या बरोबर आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा