प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाचा पुन्हा अभ्यास करणे
१ प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाच्या शीर्षक पानावर प्रकटीकरण १:३ उद्धृत केले आहे: “या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य.” बायबलमधील प्रकटीकरण पुस्तकातील आधुनिक काळाच्या भविष्यवाण्यांची पूर्ती होत असल्यामुळे, आज यहोवाच्या लोकांचा आनंद अधिक वाढला आहे. या काळी, म्हणजेच “प्रभूच्या दिवशी” घडणाऱ्या घटनांचा आपल्याला मिळणारा अर्थ प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! यात दिला आहे. (प्रकटी. १:१०) त्याचा अभ्यास केल्याने, आपण महत्त्वपूर्ण जागतिक घटनांबद्दल, विशेषकरून खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य आणि हर्मगिदोनाकडे वाटचाल करणारी राष्ट्र तसेच यहोवाचे त्याच्या लोकांबरोबरचे वागणे यांचा समावेश असणाऱ्या घटनांबद्दल सूक्ष्म-दृष्टी प्राप्त केली आहे.
२ आपल्यापैकी पुष्कळांना, या प्रकाशनाचा अभ्यास, आपण आधी विचारात घेतलेल्या मुद्यांबद्दल आपले मन केवळ ताजेतवानेच करणार नाही, तर यहोवा त्याच्या सर्व शत्रूंवर विजय मिळवील त्या दिवसापर्यंत निरवणाऱ्या चालू घडामोडींबद्दल आपला आध्यात्मिक दृष्टिकोनही तीक्ष्ण करील. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये आपल्याला सामील झालेल्या हजारो लोकांना, प्रकटीकरणाचा कळस या पुस्तकाचा मंडळीच्या पुस्तक अभ्यासात तिसऱ्यांदा विचार करत असल्यामुळे निश्चितच लाभ होईल. प्रकटीकरणाचा कळस याचा यावेळी भारतात अभ्यास करताना, आपण पूर्वीचा आराखडा अनुसरण्याऐवजी ब्रुकलिनचा चालू मूळ आराखडा अनुसरत आहोत. यास्तव, इतक्या दशकांमध्ये पहिल्यांदा आपण जगाच्या बहुतेक भागातील बांधव ज्याचा अभ्यास करत आहेत त्याच साहित्याचा अभ्यास करणार आहोत.
३ चांगली तयारी करण्याची, उपस्थित राहण्याची आणि प्रत्येक आठवडी एका अर्थपूर्ण पद्धतीने सहभाग घेण्याची खात्री करा. प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेल्या भविष्यवाणीच्या प्रकाशात तुम्हाला उलगडणाऱ्या जागतिक घटनांचा अर्थ अधिक स्पष्टपणे कळतो तसे तुम्हाला समृद्धरितीने मोबदला आणि आशीर्वाद मिळेल. निश्चितच, पूर्वीपेक्षा आता अधिक समयोचित असल्यामुळे आपल्याला अशा साहित्याचा गंभीरपणे विचार करावयाची गरज आहे. आपल्या काळासाठी असलेल्या या चित्तथरारक भविष्यवाणीबद्दल वाचतो, ऐकतो आणि मनन करतो तसे आपण या अभिवचन दिलेल्या आनंदाचा उपभोग घेऊ या!