मंडळीतील आमच्या पुस्तक अभ्यास चालकासोबत सहकार्य देणे
१ मंडळीचा पुस्तक अभ्यास आम्हाला सुवार्ताचा सेवक बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. पवित्र शास्राचा व संस्थेच्या एखाद्या प्रकाशनाचा अभ्यास करण्यासाठी उबदार कौटुंबिक, वातावरण राहावे म्हणून हे गट मुद्दाम लहान ठेवण्यात आले आहे. क्षेत्रसेवेत प्रभावी सेवक होण्यासाठी प्रशिक्षण मिळावे म्हणून आम्हाला हे छोटे गट उत्कृष्ठ परिस्थिती देतात. पुस्तक अभ्यासाच्या व्यवस्थेद्वारे प्रत्येक व्यक्तिला वैयक्तिक उत्तेजन व लक्ष तात्काळ उपलब्ध करते. तर मग आम्ही चालकाला सहकार्य कसे देऊ शकतो व ह्या उत्तम तरतुदीचा कसा फायदा मिळवू शकतो?
२ क्षेत्र सेवेत उत्साहपूर्ण भाग: पुस्तक अभ्यास चालकाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे की गटातील प्रत्येक सदस्याला क्षेत्रसेवेत उत्साहाने भाग घेण्यासाठी मदत करणे. याबाबतीत, आवर मिनिस्ट्री पुस्तकाचे पृ. ४४ आम्हाला आठवण करून देते की: “क्षेत्र सेवेसाठी तो दाखवीत असलेला नियमीतपणा, उत्साह व आवेश प्रचारकांमध्ये प्रवर्तीत होत असतो.” काही वेळा चालक आपल्याच कुटुंबाच्या सदस्यांबरोबर क्षेत्रसेवेत काम करील, परंतु जशी परिस्थिती अनुमती देईल तसे त्याला क्षेत्र सेवेच्या विभिन्न विभागात इतरांसोबत काम करावयास आवडेल. क्षेत्रसेवेच्या सभेला तुम्ही नियमितरित्या पाठींबा देऊ शकता का? असे केल्याने तुमचा पुस्तक अभ्यास चालक व दुसरे प्रचारक तुमच्या बद्दल कदर दाखवतील.
३ क्षेत्रसेवेच्या सभा सर्वांना सोयीस्कर होतील अशा ठिकाणी भरली जाते की जेणेकडून सर्वजण क्षेत्रसेवेत उत्साहाने भाग घेऊ शकतील. स्थानीय परिस्थितीला अनुलक्षून, प्रत्येक गटाला क्षेत्रसेवा लवकर चालू करण्यास आवडेल. पुष्कळ प्रचारक व पायनियर्सना सप्ताहअंती दुपार उलटून जाईपर्यंत क्षेत्रसेवा चांगली केल्याने यश मिळाले आहे.
४ सेवेच्या काही क्षेत्रात तुम्हाला काही मदत हवी का? कदाचित तुमचे पुस्तक अभ्यास चालक तुमच्या गटातील एका अनुभवी प्रचारकाला तुम्हा सोबत काम करण्यासाठी योजना करतील. महिन्याच्या शेवटी, तुमच्या क्षेत्रसेवेचा अहवाल लगेचच देण्याची खात्री ठेवा. ह्या क्षेत्रातही तुमचे पुस्तक अभ्यास चालक व सचिव तुमच्या सहकार्याची कदर करतील.—पडताळा लूक १६:१०.
५ सेवा पर्यवेक्षक गटाला जेव्हा भेट देतात: सेवा पर्यवेक्षक प्रत्येक महिन्यात एका पुस्तक अभ्यासाला नेहमी भेट देऊन क्षेत्र सेवेचे कार्य अधिक व अर्थपूर्ण होण्यासाठी उत्तेजन देतात. पुस्तक अभ्यासाच्या शेवटी त्यांच्या १५ मिनिटांच्या भाषणाकडे नीट लक्ष द्या, ज्यामुळे गटाला प्रचारकार्याच्या विविध वैशिष्ट्यांना सुधरविण्यासाठी विशिष्ट मदत मिळू शकेल. सेवा पर्यवेक्षक पुस्तक अभ्यासाच्या विविध सदस्यांबरोबर सप्ताह अंती काम करण्यासाठी उत्सुक असतील. ह्या खास तरतुदीचा फायदा घेण्यासाठी तत्पर असा जेणेकरुन त्यांच्या अनुभवाचा व सेवेतील त्यांच्या क्षमतेचा तुम्हास फायदा होईल.
६ “आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषत: विश्वासबंधूचे बरे” करीत असता सहकार्य देण्याचे व कमअनुभवी लोकांना मदत करण्याचे आपले वैयक्तिक उदाहरण मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचे वातावरण उबदारपणाचे, मित्रत्त्वाचे ठेऊ शकतो.—गलती ६:१०.