फेब्रुवारीसाठी सेवा सभा
फेब्रुवारी १ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७१ (५९)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा व प्रकाशनांच्या दरात झालेली वाढ. अलिकडील अंक वापरुन मासिक सादरता दाखवा.
२० मि: “मंडळीतील आमच्या पुस्तक अभ्यास चालकासोबत सहकार्य देणे.” प्रश्नोत्तरे.
१५ मि: “सरळ व प्रभावकारी प्रस्तावना.” श्रोत्याबरोबर चर्चा. परिच्छेद ३ हाताळताना, एक प्रचारक अनंतकाळ जगू शकाल या पुस्तकात घरमालकाची आवड कशी निर्माण करतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. घरमालकाने खरोखरची आस्था दाखवावी. परिच्छेद ५ ची चर्चा करताना, घरमालक आवड दाखवत नाही तेथे प्रचारक हस्तपत्रिकेचा उपयोग कसा करतो याचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत २१५ (११७) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी ८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२६ (१०)
१० मि: स्थानिय घोषणा. चालू मासिकातून बोलक्या मुद्द्यांची चर्चा करा. ह्या सप्ताहअंती सर्वांना क्षेत्रसेवेत भाग घेण्यासाठीं उत्तेजन द्या.
२० मि: “अनंतकाळ जगू शकाल पुस्तकातून पवित्र शास्राभ्यास चालवणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ६ हाताळल्यावर अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक एक तरुण कसे सादर करु शकला व पवित्र शास्र अभ्यास कसा चालू करु शकला याचे प्रात्यक्षिक दाखवा. कोणत्याही युवकांचा स्थानिक अनुभव सांगा जे अभ्यास चालू करु शकले.
१५ मि: “नॉट पेडलरस् ऑफ गॉडस् वर्ड.” अध्यक्षिय पर्यवेक्षक किंवा वडिलांकरवी इंग्रजी अंकाच्या द वॉचटावर डिसेंबर १, १९९२च्या पृ. २६-९ वर आधारीत भाषण. संस्थेच्या जगव्याप्त कामासाठी व स्थानिक मंडळीला बांधवांनी दिलेल्या सहकार्याची त्यांची उबदारपणे प्रशंसा करा. ज्या मंडळ्या मध्ये प्रादेशिक भाषेत सभा घेतल्या जातात तेथे द वॉचटावर चे पंधरवड्या अंकाचे नोव्हेंबर १५, १९९२ आवृत्तीच्या पृ ३० वरील व मासिक अंकाचे डिसेंबर १, १९९२च्या आवृत्तीच्या पृ ३१ वरील “तुम्हास आठवते का” याविषयाची चर्चा करु शकता.
गीत ५३ (२७) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४३ (७६)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. देणगी पाठवल्याबद्दल संस्थेने दाखवलेली कृतज्ञता व्यक्त करा, आणि स्थानिय मंडळीच्या गरजांसाठी निष्ठेने आधार दिल्याबद्दल मंडळीची प्रशंसा करा. सप्ताहच्या अंती क्षेत्र कार्यात भाग घेण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.
२० मि: “जे मी . . . आज्ञापिले ते शिकवा.” श्रोत्यांसोबत प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ४ व ५ हाताळताना, स्थानिय परिस्थितीला अनुकूल असतील अशा वचनांची व प्रकाशनांची इतर उदाहरणे द्या. चांगल्या तयारीचे एक प्रात्यक्षिक दाखवा की कसे तुमच्या प्रास्ताविक चर्चेचे एका हस्तपत्रिकेकडे स्थित्यंतर केले जाऊ शकते. वेळ अनुमती देईल तसे हस्तपत्रिकेच्या एक किंवा दोन परिच्छेदांचा विचार करा. सर्वांना नवीन पवित्र शास्र अभ्यास मिळवण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत राहण्यास प्रोत्साहन द्या.
१५ मि: “ब्लड,” रिझनिंग पुस्तक, पृ ७२-४. प्रात्यक्षिकेची रचना अशी करा की जेथे घरमालक साहित्यातल्या ठळक अक्षरात आलेला प्रश्न विचारतो. प्रचारकाचा प्रतिसाद रिझनिंग पुस्तकावर आधारित असला पाहिजे.
गीत १८१ (१०५) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १५० (८३)
१० मि: स्थानिक घोषणा. “शेजारी असणारे ज्योति वाहक” या लेखाची चर्चा करताना नवीन वितरणांना स्थानिक क्षेत्रात कसे वापरु शकतो याची चर्चा करा.
२० मि: “खंडणीला गुणग्राहकता दाखवणे.” वडिलांकरवी भाषण.
१५ मि:स्थानिय गरजा किंवा इंग्रजी अंकाच्या द वॉचटावर ऑक्टोबर १, १९९२ व जानेवारी १, १९९३च्या द वॉचटावर च्या प्रादेशिक पंधरावड्या अंकामध्ये आलेल्या “लर्न ओबिडियन्स बाय ॲक्सिपटींग डिसिप्लीन” या लेखाच्या माहितीवर आधारीत भाषण. यहोवाच्या सर्व तरुण व वृद्ध सेवकांना शिस्त कशी मिळते, व आज्ञाधारकपणाला सकारात्मकरित्या पाहिल्यावर कोणते फायदे मिळतात त्याची चर्चा करा. ज्या मंडळ्यांमध्ये वापरले जात असणाऱ्या भाषेत द वॉचटावर महिन्याला छापले जाते तेथे “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन” या नोव्हेंबर १, १९९२ आवृत्तीतील लेखाची वापर केला जाऊ शकतो.
गीत २११ (६६) व समाप्तीची प्रार्थना.