अनंतकाळ जगू शकाल पुस्तकातून पवित्र शास्त्राभ्यास चालवणे
१ अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाचा संदर्भ घेऊन एका स्रीने आश्चर्याने असे म्हटले: “मी वाचलेल्या पुस्तकांमध्ये पवित्र शास्त्रानंतर हे पुस्तक अगदी अचूक, प्रेरित, व प्रवर्तक असे प्रकाशन आहे असे मला आढळले!” आम्ही सर्वजण कबूल करतो की हे पुस्तक लोकांना पवित्र शास्त्र समजाविण्यासाठी व विशेषेकरुन यहोवाचे कार्यशील स्तुती करणारे बनण्यासाठी प्रवर्तक असे सर्वात उत्तम प्रकाशन आहे.
२ हे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशित झाले, तेव्हा भारतात सरासरीने ५,१३६ प्रचारक ३,३१० पवित्र शास्त्राभ्यास चालवित होते. मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये, १२,३०६ प्रचारकांनी १०,९१२ पवित्र शास्त्राभ्यास चालविले. आतापर्यंत, अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाच्या ११५ भाषेत ६ कोटी २० लाख प्रती छापल्या गेल्या. आमच्या जगव्याप्त कार्यावर ह्या पुस्तकाचा किती मोठा प्रभाव आहे!
३ ध्येये ठेवा: ही लक्षवेधक वाढ यहोवाच्या आशीर्वादाचा व त्याच्या लोकांनी पवित्र शास्त्राच्या जीवन वाचविणाऱ्या संदेशाद्वारे नम्र लोकांना मदत करण्याची उत्सुकता दाखविण्याचा परिणाम आहे. (रोम १०:१३-१५; १ तीमथ्य २:४) आम्ही वेळेची निकड व देवाच्या राज्याची घोषणा करण्याच्या गरजेला जाणतो.
४ संस्था आगेकूच करीत असता, आम्ही व्यक्तिगतपणे काय करत आहोत? शिष्य बनविण्याच्या महत्त्वाच्या कामात पूर्ण भाग घेण्याचा आमचा निश्चय आहे का? हे सिध्द करण्यासाठी, आम्ही व्यक्तिगत ध्येये ठेवली पाहिजेत. आस्थेचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला अधिक परिश्रमी होता येईल का? फेब्रुवारी महिन्यात एखादा नवीन पवित्र शास्त्राभ्यास चालू करण्याचे ध्येय का ठेऊ नये?
५ पवित्र शास्राभ्यास कोण चालवू शकतो?: विविध पार्श्वभूमीच्या पुष्कळ प्रचारकांनी अनंतकाळ जगू शकाल पुस्तकातून पवित्र शास्त्राभ्यास चालविण्याचा आनंद घेतला आहे. पुस्तकाच्या साध्या पध्दतीमुळे अभ्यास चालविण्यास सोपे जाते, व नवीन प्रचारकाला देखील ह्या महत्त्वपूर्ण कामात भाग घेण्यास मदत मिळते. तसेच, आपल्यातील बहुतेक जणांनी त्याचा व्यक्तिगत अभ्यास केल्यामुळे, आपण पुस्तकाच्या मजकुरासोबत परिचित झालो आहोत. एक प्रचारक ज्याने अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाचा वापर करण्याआधी कधीच पवित्र शास्त्राभ्यास चालविला नाही त्याने कृतज्ञतेने लिहिले: “माझ्याकडे तीन अभ्यास आहेत व चौथा सुरू होण्याच्या तयारीत आहे. पवित्र शास्त्राभ्यास चालविण्यासाठी एवढे सहज बनविल्यामुळे मला तुमचे आभार मानल्याशिवाय राहावत नाही.”
६ अनंतकाळ जगू शकाल पुस्तकातून पवित्र शास्त्राभ्यास चालविण्यात, युवकजनही सक्रिय भाग घेत आहेत. एक तरुण बांधव शाळेमध्ये बाकावर हे पुस्तक ठेवतो. यामुळे चांगली चर्चा व पुष्कळ अभ्यासांना चालू करण्याचा मार्ग सुलभ झाला. काही युवक घरोघरच्या कार्यात भेटणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांसोबत पवित्र शास्त्राभ्यास करायला अनुमती देण्यास थेटपणे विचारतात. आपली मुले नंदनवनमय पृथ्वीवरील चिरकालिक जीवनाच्या यहोवाच्या अभिवचनांबद्दल बोलण्यास अजून बालक नाहीत.
७ क्षेत्रसेवेमध्ये घरगुती पवित्र शास्त्राभ्यास चालविण्यामुळे मिळणारा मोठा आनंद, कोणी तरुण असो की वृद्ध, सर्वांना मिळू शकतो. यास्तव आपण सर्वजण यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करु या व आपली आशा लोकांना जाहिरपणे घोषित करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेऊ या. आपल्या यहोवा देवाची स्तुती कशी करावी हे इतरांना शिकवण्यास मदत करताना अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाचा वापर करु या.—स्तोत्र १४८:१२, १३.