चालना देणारी प्रस्तावना विकसित करणे
१ वाचकांच्या मनात व अंतःकरणात सत्याचे बीज पेरण्यासाठी वॉचटावर व अवेक! दोन्ही फार उपयुक्त आहेत. त्यामुळे लोकांच्या घरी ही मासिके पोंहचण्यासाठी आम्ही प्रभावशाली मार्ग विकसित केला पाहिजे ज्यामुळे त्यातील आध्यात्मिक मूल्यांचा त्यांना फायदा होऊ शकतो.
२ आमची मासिके स्वीकारण्यास व वाचण्यास घरमालकांना कशी चालना देऊ शकतो? आम्ही त्यांची कशी ओळख करुन देतो त्यावर हे आधारीत आहे. प्रभावशाली प्रस्तावना तयार करण्यासाठी रिझनिंग पुस्तकातील ९-१५ पृष्ठावर अति उत्कृष्ठ प्रस्तावना मिळतात.
३ नोव्हेंबर १चे वॉचटावर मासिक सादर करताना, रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ १४ वरील “ओल्ड एज/डेथ” ह्या शिर्षकाखालील पहिल्याच प्रस्तावनेचा उपयोग करू शकता.
स्वत:ची ओळख करून दिल्यावर, तुम्ही असे म्हणू शकाल:
▪“तुम्हाला निवड करण्यास सांगितल्यास, जग ज्या अनेक समस्यांचा सामना करीत आहे त्यापैकी कोणती अगोदर सोडविणे तुम्हाला पाहण्यास आवडेल?” घरमालकाचे मत ऐका, व त्याची वाटणारी काळजी समजून घ्या, व यानंतर तुम्ही कदाचित असे म्हणू शकाल: “ह्या समस्यांवर पवित्र शास्त्र काय तोडगा देते त्याकडे लक्ष द्या. [वाचा यशया ९:६, ७.] मग मनुष्यजातीच्या सर्व समस्यांवर तोडगा, एक धार्मिक, न्यायी शास्ता, जो चिरकाल राज्य करील त्यावर अवलंबित आहे. पवित्र शास्त्र याचेही अभिवचन पुरविते की देव वृध्दपकाळ व मृत्यु दूर करील व ह्या पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाळ जगण्याची संधी पुरवील.” त्यानंतर वॉचटावर मासिकाचे पृष्ठ ६ उघडून “चिरकालीक जीवनाचे देवाचे दान” हे उपशिर्षक दाखवा.
४ रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ १३ वरील, “लाईफ/हॅपीनेस” या शिर्षकाखालील इतर दोन प्रस्तावनांचा उपयोग करून नोव्हेंबर १ चा अंक प्रस्तुत करु शकता. तुम्ही ह्या विचारांना व प्रश्नांना स्वत:च्या शब्दात सांगू शकता किंवा रिझनिंग पुस्तकात सांगितल्याप्रमाणे पुन्हा सांगू शकता. त्या व्यक्तिचा प्रतिसाद मान्य केल्यावर, वॉचटावरच्या ७ पानावरील माहितीची सहभागी करा. नंतर यशया ६५:२१-२३ वचन वाचल्यावर, सार्वकालिक जीवनाचे आशिर्वाद सर्वांसाठी आहेत ते दाखवा.
५ जर तुम्ही नोव्हेंबर ८च्या अवेक! मधील “लोकसंख्येची स्फोटकता” याचा वापर करीत असाल तर, “लाइफ/हॅपीनेस” या शिर्षकाखालील तिसरी प्रस्तावना तुम्ही वापरु शकता. स्तोत्र १:१, २ची, सांगड घातल्यावर अवेक!च्या २० पानावरील “यहोवाचे इश्वरशासीत शासन काय करील” या चौकोनाकडे त्यांचे लक्ष तुम्ही आकर्षित करू शकता.
६ तुम्हला कदाचित, आमच्याजवळ आमची धार्मिक पुस्तके आहेत असे म्हणणाऱ्या घरमालकाची भेट होऊ शकेल. तुम्ही सांगू शकता की आमच्याजवळ देखील आमच्या उपयोगासाठी (आमची राज्य सेवा यासारखी) प्रकाशने आहेत; तथापि, यहोवाचे साक्षीदार नसलेले लाखो लोक आमची नियतकालिके वाचतात.
७ पौल १ करिंथ ३:६ मध्ये म्हणाला: “मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले.” आस्थेवाईकांच्या हृदयात सत्याचे बीज यहोवाने वाढवावे असे जर आम्हाला वाटते, तर चालना देणाऱ्या प्रस्तावनांचा उपयोग करून आम्ही हे बीज प्रभावशाली रितीने लावण्याकडे लक्ष दिले पाहिजे.