वारंवार उरकलेल्या क्षेत्रात कार्य करणे
१ काही मंडळ्या त्यांच्या क्षेत्रात वारंवार कार्य करत आहेत याचे अहवाल मिळण्यास आम्हाला आनंद होतो. (मत्त. २४:१४; १ तीम. २:३, ४) यामुळे एक वेगळेच आव्हान सामोरे येत असले तरी, अनुभवावरून दिसून येते की, उद्भवणाऱ्या विविध परिस्थितींचा सामना करावयास आपण चांगल्या तयारीत आणि सुसज्ज असलो तर, त्याला यशस्वीरित्या तोंड देता येईल.
२ प्रभावकारी प्रस्तावना याची गुरुकिल्ली आहे: एक किंवा त्याहून अधिक विचारपूर्वक प्रस्तावनांचा उपयोग करण्याच्या तयारीत असणे खूपच महत्त्वपूर्ण आहे. आमच्या वारंवार भेटी देण्याच्या महत्त्वपूर्ण कारणांना स्पष्ट करणारी योग्य विधाने त्यात गोवलेली असावीत.
३ रिझनिंग पुस्तक, वापरण्यासाठी पुष्कळ उचित प्रस्तावनांची उत्तम उदाहरणे पुरवते. पान १५ वर “इन टेरीटरी ऑफन वर्क्ड,” या शिर्षकाखाली तीन प्रस्तावना दिल्या आहेत. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात उपयोग करावयास आवडेल अशांचा सराव करा.
४ काही प्रचारकांना, वारंवार कार्य केलेल्या क्षेत्रात संभाषणाची सुरवात करण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रातील विषयांचा उपयोग करण्यात यश मिळते. ते कसे करता येईल यासाठी रिझनिंग पुस्तक तीन उदाहरणे देते. पान १० वरील “क्राइम/सेफ्टी,” या शिर्षकाखालील दुसरी प्रस्तावना आणि पान १० आणि ११ वरील “करंट इव्हंटस्” या शिर्षकाखालील पहिल्या दोन प्रस्तावना विचारात घ्या.
५ तुम्ही तयारी करता त्या प्रस्तावना: रिझनिंग पुस्तकातील प्रास्ताविक विवेचनांसारखी उचित प्रास्ताविक विवेचने तयार करून ती मोकळेपणाने वापरा. तुमच्या स्वतःच्या शब्दांचा उपयोग करून त्यांना तुमच्या स्वतःच्या स्वाभाविक पद्धतीत मांडा. क्षेत्रात वापरण्याआधी एका अनुभवी प्रचारकासोबत तुम्ही त्यांचा सराव करू शकता.
६ उदाहरणार्थ, तुम्ही असे म्हणू शकता:
▪“तुम्हाला शेवटी भेटलो तेव्हापासून [समाजातील लोकांमध्ये चर्चा होणाऱ्या अलिकडील घटनेचा उल्लेख करा]. आम्हा सर्वांवर त्याचा, या किंवा त्या मार्गी, परिणाम होत असल्यामुळे, आपल्या पुष्कळ शेजाऱ्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कदाचित तुम्ही देखील त्यावर काही विचार केला असेल. [संभाव्य प्रत्युत्तरासाठी वाव देण्यास थोडे थांबा.] या परिस्थितीबाबत काहीतरी केले जाऊ शकते अशी आम्ही निश्चितच आशा करतो. तथापि, चिरकालिक उपायाच्या बाबतीत पाहता, संदेष्ट्या यिर्मयाने अध्याय १० वचन २३ मध्ये जे लिहिले त्याच्यासोबत तुम्ही सहमती दर्शवणार नाही का?” शास्त्रवचन वाचल्यावर, घरमालकाचे त्यावरील मत काढून घ्या आणि मग चर्चा करत असलेल्या विशिष्ट समस्येला यहोवा कशाप्रकारे सोडविल हे दर्शवणाऱ्या एखाद्या शास्त्रवचनाकडे त्याचे लक्ष वळवा.
७ किंवा तुम्ही असे म्हणू शकता:
▪“तुम्ही आज बातम्यांमध्ये [एखाद्या घटनेचा उल्लेख करा] याबद्दल ऐकलेच असेल. याचा आपणा सर्वांवर परिणाम होतो हे तुम्ही कदाचित मान्य कराल. [संभाव्य प्रत्युत्तरासाठी थोडा वेळ थांबा.] आम्ही सरकारांकडून अल्पावधीच्या उपायाची आशा करू शकतो; परंतु ही समस्या कायमची कशाप्रकारे सोडवली जाईल याबद्दल पवित्र शास्त्र दाखवते.” देव काय करील हे स्पष्ट करणाऱ्या एखाद्या शास्त्रवचनाकडे लक्ष वळवा.
८ “तुम्ही वारंवार भेटी का देता?” संभाषणात अशाप्रकारच्या संभाव्य खीळ घालणाऱ्यासाठी, रिझनिंग पुस्तकात “व्हाय डू यू पीपल कॉल सो ऑफन?” या पान २० वरील शिर्षकाखाली उचित प्रत्युत्तरे देण्यात आली आहेत. देवावरील आणि शेजाऱ्यावरील खऱ्या प्रेमामुळे वारंवार भेटी देण्यास आम्ही प्रवृत्त होतो, हे ओळखण्यात इतरांची मदत करण्यास आम्ही प्रत्येक उचित वेळेचा उपयोग केला तर, कोणाकडून विचारपूस केल्यावाचूनही आम्ही उत्तम साक्ष देऊ शकतो. या बाबतीत योहान २१:१५-१७ मधील येशूच्या शब्दांची चर्चा केल्याने ते अतिशय लाभदायक ठरू शकेल.
९ यहोवा आम्हास पुरे झाले असे म्हणेपर्यंत, वारंवार पूर्ण केलेल्या क्षेत्रात कार्य करण्याच्या आव्हानाला आम्ही सामोरे जात राहू या. या निश्चयासह, त्याचे मार्गदर्शन, संरक्षण आणि आशीर्वाद आम्हाला शेवटपर्यंत मिळेल, ही खात्री आम्ही बाळगू शकतो.—मत्त. २८:१९, २०