प्रश्न पेटी
▪बाप्तिस्मा न झालेले प्रचारक या अर्थी मान्यता मिळविण्यापूर्वी ख्रिस्ती पालकांच्या तरूण मुलांनी केवढ्या प्रमाणात क्षेत्रसेवेत सहभाग घेतलेला असावा?
ख्रिस्ती पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलांनी प्रौढतेप्रत प्रगती करावी व यहोवाचे समर्पित सेवक बनावे. (१ शमुवेल. २:१८, २६; लूक २:४०) अगदी लहान वयातच, ख्रिस्ती कुटुंबातील मुलांनी पवित्र शास्त्रावर आधारीत त्यांच्या विश्वासाचे कारण दिले पाहिजे. बालपणापासून क्षेत्रसेवेत त्यांच्या पालकांसोबत असल्यामुळे मुलांची आध्यात्मिक वाढ लवकर घडून येते. परंतु तरूणांना क्षेत्रसेवेचा आनंद घ्यावयाचा असेल तर हे फार महत्वाचे आहे की, त्यांना हृदयापासून प्रेरणा झाली पाहिजे, बाप्तिस्मा न झालेले प्रचारक बनण्याची इच्छा असली पाहिजे व राज्य प्रचार कार्यात नियमित भाग घेतला पाहिजे. पालकांकडून काळजीपूर्वक प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. (१ तीम. ४:६; २ तीम. २:१५) पालकांची सहमती असेल तर इतर लायक प्रचारक मदत करू शकतील.—आवर मिनिस्ट्री, पृष्ठ ९९-१०० पहा.
असे चांगले आचरण असणाऱ्या मुलांनी त्यांच्या ख्रिस्ती पालकांसोबत घरोघरच्या कार्यात गेल्यामुळे, सेवेत कसा भाग घ्यावा हे ते शिकतात. परंतु जोपर्यंत ते ठराविक पात्रता व कुशलता स्वत:हून विकसित करीत नाहीत तोपर्यंत त्यांना बाप्तिस्मा न पावलेले प्रचारक म्हणून मान्यता मिळत नाही. ख्रिस्ती पालक मुलासोबत कार्य करताना मूल केवढ्या प्रमाणात साक्षीकार्यात भाग घेऊ शकते हे ते ठरवू शकतात. ज्या मुलांना बाप्तिस्मा न पावलेले प्रचारक अशी मान्यता नाही त्यांनी स्वत:हून भेटी घेऊ नयेत किंवा इतर मुलांसोबत क्षेत्रकार्यात जाऊ नये. पालक क्षेत्रसेवेसाठी त्यांच्या मुलांना तयार करु शकतात. व इतर विविध कार्यात त्यांना सहभाग घेण्यास परवानगी देऊ शकतात जसे की, शास्त्रवचन वाचणे, हस्तपत्रिका किंवा मासिक सादर करणे, किंवा एखाद्या प्रकाशनातून घरमालकास दाखवणे. मूल जसजसे मोठे होईल, तसतसे तो चर्चेमध्ये जास्त प्रमाणात सहभाग घेऊ शकतो.
चांगल्या प्रशिक्षणामुळे, तरूणजन त्यांच्या पालकांकडील मार्गदर्शनास प्रतिसाद देऊन व स्वत:चे आचरण सुव्यवस्थीत पध्दतीने ठेवल्यामुळे सेवेच्या गांभिर्याची गुणग्राहकता जाणण्यास शिकतात. ज्यांना अजून बाप्तिस्मा न झालेले प्रचारक या अर्थी मान्यता मिळालेली नाही अशा मुलांना, दुसरे त्यांची काळजी घेतील अशी अपेक्षा धरून क्षेत्रसेवेच्या सभेला पालकांनी सोडून जाऊ नये. काळजीवाहक पालक मुलांच्या कार्यावर देखरेख ठेवणे ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे असे ओळखतील. तथापि इतर जबाबदार प्रचारक, क्षेत्रसेवेत यहोवाची सेवा करण्याची जी खरी आस्था दाखवीत आहेत अशा मंडळीतील तरूणांना प्रशिक्षण देण्यास कदाचित स्वच्छेने मदत देऊ इच्छितील.