आस्थेवाईक लोकांसाठी काळजी दाखवणे
१ सर्वांपेक्षा जास्त, यहोवा सर्व लोकांची काळजी घेण्यामध्ये उदार आहे. त्याने फक्त भौतिक गोष्टीच मुबलकपणे नव्हेत तर आम्हास हव्या असणाऱ्या आध्यात्मिक गोष्टीही आपल्या आनंदासाठी भरपूर दिल्या आहेत. तो आपली इतकी काळजी वाहतो की आपल्या हृदयात काय आहे तेही पारखतो.—स्तोत्र १३९:२३.
२ येशू पृथ्वीवर असताना, त्याने देखील, लोकांच्या बाबतीत सहानुभूती दाखवून त्याच्या पित्याचे अनुकरण केले. एका माणसाने येशूला काय म्हटले ते आठवते का, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहा? येशूने म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (मत्तय ८:१-३) जेव्हा येशूने एका विधवेचे दु:ख पाहिले तेव्हा त्याने काय केले? तो तिला मदत करावयास थांबला. (लूक ७:११-१५) तुम्ही सुध्दा आस्थेवाईक लोकांसाठी अशी काळजी दाखवण्यात अधिक जागृत राहाल का?
३ आपला पिता यहोवा, व त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या अनुकरणार्थ, आम्ही देखील दुसऱ्यांठायी वैयक्तिक काळजी दाखवली पाहिजे. आपण असे, एक अचूक हाऊस-टू-हाऊस रेकॉर्ड ठेवून करतो. ह्यामध्ये घरमालकाचे नाव, बिनचूक पत्ता व पहिल्या भेटीत ज्या विषयावर चर्चा केली होती ते लिहिणे जरुरीचे आहे. मग पुनर्भेट करण्याआधी चांगली तयारी करा. आदल्या भेटीत आम्ही जर घरमालकासोबत कोणते मासिक सोडले असेल तर पुनर्भेटीच्या वेळेस त्या मासिकातील एक विषय चर्चेसाठी निवडू शकता. हे कसे करू शकतो याकडे जरा लक्ष द्या.
४ जर तुम्ही नोव्हेंबर १, १९९२ चा टेहळणी बुरुज अंक दिला असेल व पान ६ वरील “चिरकालीक जीवनाचे देवाचे दान” ह्या विषयावर लक्ष केंद्रित केले असेल तर तुम्ही प्रकटीकरण २१:४ व योहान १७:३ ह्या दोन वचनांची योग्य तयारी करून तुमच्या पुनर्भेटीत वापरु शकता.
उदाहरणार्थ, प्रकटीकरण २१:४ वाचल्यावर तुम्ही असे म्हणू शकाल:
▪ “आम्ही सार्वकालिक जीवन कसे मिळवू शकू? [उत्तरासाठी थांबा.] पान ७ वरील चित्रात दाखवल्यानुसार जगात सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल येशू काय म्हणतो, त्याकडे जरा लक्ष द्या.” मग योहान १७:३ वाचा, व शांतीदायक नवीन जगातील अनंतकालिक जीवन मिळविण्यासाठी, देवाचे व येशू ख्रिस्ताचे दोघांचे ज्ञान घेतले पाहिजे हे ठळकपणे सांगा. जर तुम्हाला त्या व्यक्तिठायी आस्था आहे असे दिसते तर शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेतून अभ्यास चालू करण्याचा प्रयत्न करा.
५ नोव्हेंबर ८, १९९२च्या अवेक! मासिकातील, “जागतिक लोकसंख्या—भविष्याबद्दल काय?” यातील काही निवडक मुद्यांवर चर्चा करून तुम्ही चांगला प्रतिसाद मिळवू शकाल. पुनर्भेट करतेवेळी तुमची चर्चा स्तोत्र ७२:१२, १६ ह्या वचनांवर आधारीत असू शकते.
तुम्ही विचारू शकाल:
▪ “आजच्या जगातील स्पष्टपणे दिसणाऱ्या अन्नटंचाईला कोणता उपाय आहे असा तुम्ही विश्वास करता?” त्यांच्या उत्तरास मान्यता दाखवा व म्हणा: “यहोवा या नजीकच्या भविष्यात जगातील समस्यांचे निवारण करणार आहे, असे अभिवचन दिले आहे हे खरेच चित्तवेधक आहे.” [स्तोत्र ७२:१२, १६ वाचा.] पवित्र शास्त्र अशा काळाबद्दल सांगते की जेव्हा अन्नसाठा व मनुष्याच्या सर्व गरजांची पूर्ण व्यवस्था असेल, व कोणीही अन्नटंचाईमुळे किंवा आजच्या वाढत्या महागाईमुळे त्रासला जाणार नाही.” मग, शांतीदायक नवीन जगातील जीवन, या हस्तपत्रिकेतून काही भविष्यातील आशिर्वादांवर चर्चा करा व अभ्यास चालू करण्याचा प्रयत्न करा.
६ घरमालकाकडे, आधीच आमचे एखादे प्रकाशन आहे तर काय? त्याचाच उपयोग करून पवित्र शास्त्र अभ्यास का चालू करू नये? जर ते अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक आहे तर, त्यातील अनुक्रमणिकेकडे वळा व घरमालकाला त्यातील एक विषय चर्चेसाठी निवडण्यास सांगा. अशा रीतीने एक किंवा दोन परिछेदावर विचार करून अभ्यास चालू करा.
७ आस्थेवाईक लोकांबद्दल काळजी दाखवून पुनर्भेटीसाठी योग्य तयारी केल्याने आपण यहोवा देवाचे व येशूचे अनुकरण करणारे आहोत, व होता होईल तितक्यांना वाचवण्याची आपली इच्छा आहे असे दर्शवतो.—२ पेत्र. ३:९.