नवोदितांना प्रगती करण्यासाठी मदत करा
१ ख्रिस्ताच्या मरणाचा स्मारक दिन साजरा करण्यासाठी एप्रिल १७, १९९२ रोजी संपूर्ण जगभरात जवळजवळ १ कोटी, १५ लाख लोक जमले होते. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीच्या संगतीत असणाऱ्या एकूण प्रचारकांहून ही संख्या अडीच पटीने जास्त होती. “यहोवाच्या पर्वतावर” लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत आहेत हे किती संतोषविणारे आहे! (मीखा ४:२) आता सध्या खऱ्या भक्तित मोठ्या प्रमाणात आस्था दाखविणारे काही सत्तर लाख लोक आहेत व ते अजून यहोवाचे जाहीरपणे स्तुती करणारे झाले नाहीत. खरोखरी, “पीक फार आहे” हे येशूचे शब्द याआधी इतके अर्थभरित नव्हते!—मत्तय ९:३७, ३८.
२ क्षेत्र कार्यात भाग घेण्यालायक सर्वांना मदत करण्यासाठी एप्रिल महिन्यात आपण खास प्रयत्न करु या. मंडळीचा पुस्तक अभ्यास चालक इतर योग्य प्रचारक व पायनियर यांच्या मदतीद्वारे मुख्य भूमिका पार पाडेल. आमचा तिहेरी हेतू म्हणजे (१) खास जाहिर भाषणाला व ह्या वर्षाच्या स्मारक दिनाला उपस्थित असलेल्या नवोदितांसोबत गृह पवित्र शास्त्राभ्यासाची व्यवस्था करणे; (२) जे अद्याप अभ्यास करीत आहेत अशांना बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्यास उत्तेजन देणे; व (३) क्षेत्र कार्यात आमचा व्यक्तिगत भाग वाढविणे.
३ आमच्या कोणत्याही सभांना उपस्थित असलेल्या नव्या व्यर्क्तिचे स्वागत करण्यात व त्यांच्याबरोबर परिचित होण्याचा खास प्रयत्न आमच्यातील प्रत्येकाने केला पाहिजे. आस्थेवाईक लोकांनी एखादा गृह पवित्र शास्त्राभ्यास चालू करावा असे उत्तेजन देण्यासाठी आम्ही काय करु शकतो?
४ भारतात १९९२च्या सेवा वर्षात, प्रत्येक महिन्याला सरासरीने ९,५९४ पवित्र शास्त्राभ्यास चालविले होते. विद्यार्थ्यांसोबत परिचित होण्यासाठी प्रचारक, पुस्तक अभ्यास चालकाला त्याच्या बरोबर पवित्र शास्त्र अभ्यासाला येण्याचे निमंत्रण देऊ शकतो. (km ४/८१ पृ. ४) यातील काही पवित्र शास्त्र विद्यार्थी आता सभांना नियमित उपस्थित राहत असतील व क्षेत्र कार्यात भाग घेण्यास लायक बनले असतील. नवोदित जण नियमितरित्या अनौपचारीक साक्षीकार्य करतात का? बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्यासाठी आवर मिनिस्ट्री पृष्ठ ९७-९ वरील दिलेल्या योग्यतेच्या पात्रतेचे ते होत आहेत का? तसे असल्यास, बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्याची मान्यता मिळाल्यावर घरोघरच्या क्षेत्र कार्यात ते भाग घेण्यासाठी कशी सुरुवात करतील याचे विवेचन तुम्ही त्यांना देऊ शकता.
५ आमच्या ख्रिश्चन सहवासात एकमेकांना उत्तेजन देण्याकडे दुर्लक्ष करु नका. (इब्री १०:२४, २५) जर कोणी त्यांच्या सेवाकार्यात मंद झाले असतील, तर पुस्तक अभ्यास चालकाने त्यांना मदत व उत्तेजन देण्याची निश्चित व्यवस्था करण्यास हवी. क्षेत्रकार्यात आमच्यासोबत येण्याचे उबदार निमंत्रण हेच काय ते जरुरीचे आहे.
६ एप्रिल महिन्याला क्षेत्रकार्याचा विशेष महिना करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पुस्तक अभ्यास गटातील त्याच्या प्रत्येक सदस्याला सेवेत पूर्ण भाग घेण्यासाठी मदत करताना पुस्तक अभ्यास चालकाच्या उत्साही नेतृत्त्वामुळे फरक होत असतो. अधिक क्षेत्रसेवा सभांची योजना करु शकता. वृद्ध लोकांकडे विशेष लक्ष तसेच युवकांना व्यवहार्यमार्गाने मदत दिली जाऊ शकते. एप्रिल महिन्यात संपूर्ण परिवार क्षेत्रसेवेत भाग घेत आहे याकडे पालकांनी लक्ष द्यावे. ह्या कापणीच्या काळात आम्ही आमचे सर्वात उत्तम ते यहोवाला दिले तर त्याच्याकडून येणारे महान आशीर्वाद आमचे असतील.