नोव्हेंबरसाठी सेवा सभा
नोव्हेंबर ९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९२ (५१)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा व ईश्वरशासित वृत्ताचे काही ठळक मुद्दे. चालू मासिकातून काही मुख्य लेखांची उजळणी करा; शास्त्रीय चर्चेनंतर त्यांना कसे सादर कराल ह्यासाठी एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा. नोव्हेंबरच्या सौम्य हवामानाचा लाभ घेऊन सर्वांना क्षेत्रकार्यात त्यांचा सहभाग अधिक करण्यास उत्तेजन द्या.
१५ मि: “मासिकांचा चांगला उपयोग करा.” प्रश्न उत्तराने चर्चा. परिच्छेद ६ हाताळताना, मासिक मार्ग कसा चालू कराल यावर काही प्रस्ताव सुचवा: सरळ व सोप्यारीतीने प्रस्तावना करा; चांगले हाऊस-टू-हाऊस रेकॉर्ड ठेवा; पुढे येणाऱ्या नवीन लेखांची माहिती देऊन भावी अंकासाठी आस्था निर्माण करा; ज्यांचे उत्तर लेखातच सापडतील असे प्रश्न विचारा; प्रत्येक दोन आठवड्यांनी पुन्हा जाण्यास विसरू नका.—आ.रा.सेवा ८/८४ पृ ८.
२० मि: “आपल्या समस्या या माहितीपत्रकाचा पूर्णपणे उपयोग करणे” ऑगस्ट महिन्याची आमची राज्य सेवा पृष्ठ ४ वरील “आपल्या समस्या या माहितीपत्रकातून अभ्यास सुरू करणे” यावर आधारीत वडिलांचे भाषण. फलदायी पुनर्भेट कशी करू शकाल व पवित्र शास्त्र अभ्यासासाठी पाया कसा घालाल ते दाखवा. परिच्छेद २ व ३ हाताळल्यावर ह्या माहितीपत्रकाच्या सहाय्याने घरमालकाला पवित्र शास्त्र अभ्यास करण्यासाठी कसे उत्तेजन द्याल यासाठी काही प्रात्यक्षिके दाखवा. ज्याला पवित्र शास्त्राच्या ज्ञानाची काहीच पार्श्वभूमि नाही अशा व्यक्तीची पुनर्भेट घेत आहात अशी दृश्याची मांडणी करा.
गीत ६३ (३२) व समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७७ (४१)
१० मि: स्थानिक घोषणा. महिन्याचा जमाखर्च अहवाल वाचा; २ करिंथ ९:६, ७वर आधारीत प्रशंसा करा. आधीच तयार असलेल्या प्रचारकांना त्यांनी नोव्हेंबर मध्ये मासिके किंवा वर्गण्या सादर करताना चांगला अनुभव आला असेल तर तो सांगण्यास आमंत्रित करा.
१५ मि: “चालना देणारी प्रस्तावना विकसित करणे.” नोव्हेंबर महिन्याच्या मासिकातील लेखांचा उपयोग करून सादरता कशी तयार करावी या चर्चेवर एक भाषण द्या. दोन किंवा तीन योग्य प्रचारकांना निवडून नमूद केलेल्या प्रस्तावना सादर करण्याच्या प्रात्यक्षिकांची योजना करा; ह्यात एक सादरता एका तरुण प्रचारकाची असावी.
२० मि: “आस्थेवाईक लोकांसाठी काळजी दाखवणे.” सभागृहासोबत चर्चा करा. परिच्छेद २ हाताळताना, वॉचटावर जुलै १, १९८१, पृष्ठ ४-६, मधील काही निवडक मुद्दे सांगा, की आम्ही दुसऱ्यांबद्दल काळजी दाखवून येशूचे अनुकरण कसे करू शकतो. हाऊस-टू-हाऊस रेकॉर्ड कसे भरावे व आस्था निर्माण करण्यासाठी त्याचा कसा उपयोग करावा याचे स्पष्टीकरण द्या. त्याबद्दल एक प्रात्यक्षिक दाखवा. योग्य प्रचारकाने त्यानुसार केल्यावर, सभागृहाला विचारा की, आपल्या क्षेत्रात पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्याचा हाच एक प्रभावी मार्ग का आहे.
गीत ८८ (४२) व समाप्तिची प्रार्थना.
नोव्हेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६४ (७३)
५ मि: स्थानिक घोषणा. डिसेंबर किंवा जानेवारीत जेव्हा सुट्टीचा अधिक वेळ असतो तेव्हा सहाय्यक पायनियरींग करता येऊ शकते याविषयी विचार करण्याचे सर्वांना उत्तजन द्या.
२० मि: “यहोवाची सेवा हृदयापासून करण्यासाठी मुलांना मदत करा.” सभागृहासोबत चर्चा. त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पालकांनी स्वत:चे उदाहरण समोर ठेवून मुलांना सेवाकार्यात व्यक्तिगतरीत्या तालीम देण्याच्या गरजेवर जोर द्या. एक किंवा दोन पालकांना त्यांनी काय केल्याने चांगले परिणाम झाले ते सांगण्यास त्यांची मुलाखत घ्या. एका पालकाला त्याच्या मुलाला किंवा मुलीला घरोघरच्या कार्यातील पवित्र शास्त्र चर्चेची तयारी करण्यास कशी मदत दिली ह्यावर एक प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगा. एक तरुण व्यक्तिला दिलेल्या प्रस्तावनेनुसार एकाचे प्रात्यक्षिक दाखवून समाप्ती करा.
१० मि: प्रश्न पेटी. सभागृहासोबत चर्चा. मुलांना बाप्तिस्मा न पावलेल्या प्रचारकाची मान्यता मिळण्यासाठी त्यांना त्यांचे आचरण सुव्यवस्थित पध्दतीत व क्षेत्रकार्यात भाग घेण्याची एक प्रामाणिक इच्छा असावी हे का महत्वाचे आहे यावर जोर द्या.
१० मि: तरूण प्रचारकांचे विचार. काही तरुण प्रचारकांना बोलवून विचारा की ते बाप्तिस्मा न पावलेले प्रचारक कसे बनू शकले व त्यांना क्षेत्रकार्यात भाग घेण्यास व अधिक भाग घेण्यास का आवडते. ज्यांची मुलाखत घेण्यात येते त्यांनी कुणीतरी त्यांना शिकविल्याप्रमाणे नव्हे तर त्यांची सकारात्मक इच्छा प्रगट करावी.
गीत २२१ (७८) व समाप्तिची प्रार्थना.
नोव्हेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४६ (२०)
५ मि: स्थानिक घोषणा. वर्गणी कशी भरावी ते थोडक्यात वर्णन करून सांगा, व ह्या भरलेल्या वर्गण्या ज्या बांधवाकडे दिल्या जातात त्या बांधवाची सर्वांना ओळख करून द्या.
१५ मि: रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ ५८-६४च्या “बायबल” यावर भाषण. बायबलच्या तत्त्वांचे व्यक्तिगत जीवनात अनुकरण केल्याने येणाऱ्या फायद्याचे ठळक मुद्दे सांगा.
१५ मि: डिसेंबर महिन्यात द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हिड् हे पुस्तक सादर करा. भाषण व प्रात्यक्षिक. रिजनिंग पुस्तकातील पृष्ठ २०९ व २१० वरील ‘येशू ख्रिस्त’ या मथळ्याखालील माहितीची उजळणी करा. व ह्या माहितीचा उपयोग करून, घरमालकाची प्रकाशनासाठी आस्था कशी निर्माण करू शकाल यासाठी एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: “आमच्या मुलांमध्ये ख्रिस्ती व्यक्तिमत्व उभारणे.” जुलै १, १९९१च्या वॉचटावर मधील ह्या लेखावर वडिलांचे भाषण. (हाच लेख मे १९९२च्या प्रादेशिक भाषेतील वॉचटावर मध्ये आला आहे.) शक्यतो, हा भाग त्या बांधवाला देऊ शकता की ज्यांना मुले आहेत, व ज्यांचे कुटुंब उदाहरणीय आहे.
गीत १११ (१००) व समाप्तीची प्रार्थना.