आस्था चेतविणाऱ्या प्रस्तावना
१ आम्हाला क्षेत्रात भेटणाऱ्या सर्व लोकांबद्दल आपण नेहमीच उबदार व व्यक्तिगत आस्था दाखवावी. आपण त्यांना एखाद्या विषयाबद्दल त्यांचा प्रस्ताव विचारतो तेव्हा त्यांच्या दृष्टिकोणाबद्दल आपल्याला आदर आहे हे दाखवीत असतो. आपण केलेल्या विषयाची प्रस्तुति आणि विचारलेला प्रश्न त्यांना कदाचित विचार करायला लावील आणि मग त्यांना, देव व त्याने मानवजातीबद्दल राखलेल्या उद्देशाबद्दल अधिक शिकण्याची जिज्ञासा उत्पन्न होईल.
२ ऑक्टोबरमध्ये आपण निर्मिती या सत्याकडे लोकांचे लक्ष, लाईफ—हाव डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? हे पुस्तक सादर करुन, आकर्षित करणार आहोत. या प्रकाशनाची उजळणी व्यक्तिगतपणे करण्यासाठी वेळ द्या, आणि ठळकरित्या दाखवता येतील असे विशिष्ट मुद्दे निवडा. क्रिएशन पुस्तकातील माहितीची चर्चा करताना ते उघडून घरमालकाच्या हातात द्या. विशिष्ठ विषय व चित्रे दाखवा. या अत्यंत मोहक प्रकाशनाचे मोल उत्साहाने सादर करा.
३ अगदी उबदारपणे स्वतःची ओळख दिल्यावर, तुम्ही म्हणू शकालः
▪ “सध्याच्या आधुनिक, वैज्ञानिक जगात, देव आहे व त्याने आम्हाला व आपण राहतो त्या या सुंदर पृथ्वीला निर्माण केले आहे असा विश्वास धरणे व्यवहार्य वाटते का? [प्रतिसादास वाव द्या.] आपण जेव्हा या पृथ्वीची व्याप्ति आणि आश्चर्ये तसेच हे अफाट विश्व बघतो, तेव्हा आम्हाला त्याची व्यवस्था व रचना बघून मोठी छाप पडते. यामुळे कोणी निर्माणकर्ता आहे याची साक्ष मिळत नाही का? याबद्दल पवित्र शास्त्राचा बुद्धिवाद लक्षात घ्या. [इब्री ३:४ वाचा.] प्रत्येक इमारतीचा कोणी ना कोणी रचनाकार व बांधणारा असतो हे व्यवहार्य आहे. [आता क्रिएशन पुस्तक बाहेर काढा आणि पृष्ठ ११४ वरील चित्र दाखवा.] आमचे हे विश्व भयप्रेरित आहे! तुम्हाला वाटते का की, हे असेच आकस्मिकपणे अस्तित्वात आले?” मग १२२ पृष्ठ काढून घड्याळाच्या चित्राखालील मथळा वाचा. पृष्ठ १२७ वरील चित्र व शास्त्रवचनांचाही उपयोग करता येईल. याबद्दल आणखी साहाय्यक मुद्दे रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठे ८४-८ वर आढळू शकतील.
४ किंवा, तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “या पृथ्वीवर मानवजातीला खरी शांती व सौख्यता मिळवावयाची आहे तर काय जरुरीचे आहे असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादास वाव द्या.] पवित्र शास्त्र म्हणते की, आपण देवाचे भय बाळगलेच पाहिजे आणि तो स्वर्ग व पृथ्वीचा निर्माता आहे असे मान्य केले पाहिजे.” प्रकटीकरण १४:७ वाचा, व मग, क्रिएशन पुस्तकाचे १४० व १४१ पान उघडा आणि २४ व २५ परिच्छेद वाचा जेथे, ही पृथ्वी मानवी वसाहतीसाठी तयार करण्यात आली होती हे विवेचीत करण्यात आले आहे. घरमालकाने अधिक आस्था दाखवली तर अध्याय १९ काढा आणि लवकरच पृथ्वीव्याप्त नंदनवन खरेपणाने कसे साकार होणार याबद्दल स्पष्टता करा.
५ घरमालकाने निर्माणकर्त्याबद्दल संशय व्यक्त केल्यास तुम्ही म्हणू शकताः
▪ “तुमच्यासारखे बऱ्याच लोकांना वाटते हे साहजिक आहे आणि जगात सध्याला जो त्रास होत आहे ते बघता खासपणे समजण्याजोगे आहे. देव आहेच, तर मग तो अशा त्रासाला का परवानगी देणार? तुम्हाला याबद्दल काही व्यवहार्य कारणाचा विचार येतो का?” जो प्रतिसाद मिळेल त्यानुसार, तुम्ही क्रिएशन पुस्तकाचा १६ वा अध्याय पुढील चर्चेसाठी वापरू शकता. किंवा घरमालक जर नाममात्र आस्थेने लक्ष देत आहे तर सप्टेंबर १५, १९९२ च्या द वॉचटावर मासिकातील “व्हाय डू गुड पीपल सफर?” या लेखातील विशिष्ट एक किंवा दोन मुद्दे ठळकपणे दाखवा. या प्रश्नाबद्दल अधिक साहाय्यक माहिती रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठे ३९९-४०० वर मिळू शकते. वेळप्रसंगी व्हाय यु कॅन ट्रस्ट द बायबल ही हस्तपत्रिका सोडणे योग्य वाटेल.
६ राज्याच्या संदेशाबद्दलच केवळ आस्था जागृत करणे हे नव्हे तर पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला, आमच्या थोर निर्माणकर्त्याचा आदर करणारे आणि निर्मितीबद्दलचे सत्य विवेचीत करणारे हे सुंदर चित्रांनी भरपूर असलेले पुस्तक प्राप्त झाले आहे म्हणून किती आनंद वाटावा बरे! या कारणास्तव, आम्हाला ऑक्टोबरमध्ये भेटणाऱ्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांची आस्था चेतविण्यासाठी आपण या प्रकाशनाचा चांगला वापर करू या.