वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९२ पृ. ७
  • आस्था पुन्हा प्रज्वलित केली जाऊ शकते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आस्था पुन्हा प्रज्वलित केली जाऊ शकते का?
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्तय ५:३.
    “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्तय ५:३.
  • साहाय्य करण्यास सदा सिद्ध असा
    आमची राज्य सेवा—२००६
  • पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यासाठी प्रगती करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km १०/९२ पृ. ७

आस्था पुन्हा प्रज्वलित केली जाऊ शकते का?

१ “आध्यात्मिक गरजांची जाण राखणारे ते धन्य.” (मत्तय ५:३) येशूचे ते डोंगरावरील प्रवचनातील शब्द खोल अर्थाने भरलेले आहेत. आपले जीवन आनंदी व उद्देशपूर्ण बनवण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीची केवढी गरज आहे हे मानवजातीतील पुष्कळांना माहीत नाही. ज्यांना ही जाणीव पूर्वी होती पण त्यांनी ती गमावली असे काहीजण आहेत. आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत असे काही घडले की, ज्यामुळे ते थंड बनले. त्यांच्यासाठी जे खरेच लाभदायक होते अशापासून त्यांनी आपली पाठ फिरवली. याकरता, प्रश्‍न आहे की अशांची आस्था पुन्हा प्रज्वलित केली जाऊ शकते का? काहींसाठी ते होऊ शकते हे खरेच आनंदाचे आहे.

२ तुम्हाला अशा कोणाची माहिती असेल ज्याने फार पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर पवित्र शास्त्राचा अभ्यास केला होता, तो कदाचित त्यावेळी बालकही असावा, पण नंतर त्याने देवाच्या लोकांचा सहवास सोडून दिला. पण त्याच्या मनात त्यावेळी काही पवित्र शास्त्र शिक्षण व धार्मिक तत्त्वांनी घर केले असावे व ते तो अद्याप देखील स्मरत असेल. जगाची परिस्थिती वाईट होत असता आणि जीवनातील स्थिती देखील बदलत असता माणसाला पूर्वीच्या गोष्टींचे स्मरण घडते व तो देवाकडे वळून अधिक पवित्र शास्त्रीय ज्ञान घेण्याची त्याची तयारी होते. अशा लोकांना पवित्र शास्त्र अभ्यास सादर करण्याच्या निमित्ताने भेट देणे हे खरेच प्रतिफळदायक ठरू शकते.

३ प्रभूच्या सांजभोजन विधीला उपस्थित राहणाऱ्‍यांची भेट घेण्याचा खास प्रयत्न अधूनमधून केला गेला पाहिजे. तुम्ही त्यांच्या आध्यात्मिक कल्याणाबाबत खरेच चिंताग्रस्त आहात आणि त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करू इच्छिता हे त्यांना कळू द्या. “ज्योती वाहक” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या लोकांना मदत देण्याचे खास प्रयत्न होण्यास हवेत. जेथे पूर्वी अभ्यास चालत होता, पण प्रगति न झाल्यामुळे बंद करण्यात आला अशा ठिकाणी दुसऱ्‍या कोणा प्रचारकाला भेट घेण्यास पाठविणे हिताचे ठरू शकेल.

४ अर्थात, ज्या लोकांसोबत आम्ही अभ्यास करतो त्यांनी यहोवाची भक्‍ती गंभीरपणे घ्यावी आणि त्यांच्या पवित्र शास्त्र अभ्यासात उत्साह दाखवावा याची अपेक्षा आहे. पण आमच्या बाबतीत, आम्ही पुरेशी मदत देत आहोत, आणि पौलाने जसे इतरांबद्दल म्हटले होते की, “मी तुमच्या रक्‍ताविषयी निर्दोष आहे,” तसे आम्हालाही वाटत आहे याची पुरेशी खात्री राहिली पाहिजे.—प्रे. कृत्ये २०:२६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा