वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९२ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९२
km १०/९२ पृ. ७

घोषणा

▪ प्रकाशन देणगीः

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना.) जेथे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ वापरा.

नोव्हेंबर: अवेक! किंवा/आणि वॉचटावर वार्षिक वर्गणी. पंधरवडा मासिकांसाठी एका पूर्ण वर्षाची वर्गणी ६० रुपये आणि सहा महिन्याची वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तीसाठी वार्षिक वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबल आणि पुस्तक द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? (प्रादेशिक सादरता: जुनी पुस्तके खास दरात.)

जानेवारी १९९३: द ग्रेटेस्ट मॅन किंमत ४० रुपये. जेथे हे उपलब्ध नाही तेथे बायबल स्टोरिज्‌ किंवा लिव्ह फॉरएव्हर पुस्तक द्यावे.

फेब्रुवारी: १९२ पृष्ठांची खास सादरतेची जुनी पुस्तके प्रत्येकी ६ रुपयांना.

▪ विभागीय देखरेख्यांच्या भेटीत वडील आणि/किंवा उपाध्य सेवकांच्या नियुक्‍तीच्या वा कमी करण्याच्या नव्या शिफारसी करण्यात आल्या नसल्यास संस्था एस-२बी हा फॉर्म यापुढे मंडळीला परत पाठवणार नाही. अलिकडचा मंडळीत असणारा एस-२बी हा फॉर्म अद्ययावत असल्याचे मानले जाईल आणि जेव्हा नव्या शिफारसी किंवा कमी करण्याचे असेल तेव्हाच संस्था ह्‍या एस-२बी फॉर्मवर पाठीमागे वॉचटावरचा रबर स्टँप मारुन पाठवील.

▪ सप्टेंबर १, १९९२ पासून काही नवे विभाग भारतामध्ये सुरु करण्यात आले आहेत. केरळमध्ये सातवा विभाग आणि आंध्र प्रदेश व कर्नाटक येथे दुसरा विभाग सुरु करण्यात आला. अशाप्रकारे देशात आता एकंदर वीस विभाग आहेत व यापैकी पाच विभागांना “ए” व “बी” वर्ग आहेत. एकवीस विभागीय देखरेखे साधारण ३७५ मंडळ्या व नोंद असणाऱ्‍या ७५ गटांना वर्षभरातून दोनदा भेटी देतील. १९९३ सेवा वर्षात होणाऱ्‍या सव्वीस विभागीय संमेलनात एक पूर्ण वेळेचे तर एक अर्धवेळेचे प्रांतिय देखरेखे सेवा करतील. या व्यवस्थेमुळे बांधवांना लाभ होऊन मंडळ्या स्थिरावल्या जातील याची आम्ही अपेक्षा करतो.—प्रे. कृत्ये १६:५.

▪ नोव्हेंबर महिन्यात साहाय्यक पायनियरींगचे काम करू इच्छिणाऱ्‍या बांधवांनी आपले अर्ज लवकर द्यावेत. यामुळे वडीलांना प्रकाशन तसेच क्षेत्राबद्दलची योग्य आखणी व व्यवस्था करता येईल.

▪ बहिष्कृत झालेल्या किंवा स्वतःस अलिप्त करून घेतलेल्या, पण आता परत येण्याची इच्छा करणाऱ्‍यांच्या बाबतीत एप्रिल १५, १९९१ च्या वॉचटावर मध्ये पृष्ठे २१-३ वर देण्यात आलेल्या सूचनेचा वडीलांनी मागोवा घ्यावा असे त्यांना स्मरण दिले जात आहे.

▪ क्षेत्रकार्याच्या तासांची नोंद कोणकोणत्या प्रकाराबाबतीत करता येते त्याबद्दल ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री पुस्तकात पृष्ठ १०३-४ वर मार्गदर्शन दिलेले आहे. काहींना याचे आश्‍चर्य वाटले आहे की, जो प्रचारक एखाद्या वक्त्याचे भाषण अनुवादित करतो त्याने तो वेळ क्षेत्रकार्यात जमेस धरावा का. होय, वक्‍ता तसेच त्याचा अनुवादक या दोघांनाही तो वेळ क्षेत्र कार्यात खर्च केला या अर्थी समजता येईल.

▪ नोव्हेंबरपासून पुढे काही विशिष्ट महिन्यात आम्ही आमची राज्य सेवा याच्या प्रादेशिक आवृत्तीमध्ये वेगळी प्रकाशन सादरता सुचवणार आहोत. ही माहिती त्या विशिष्ट भाषेत केवढा प्रकाशन साठा उपलब्ध आहे त्यावर अवलंबून असेल. या सादरता खूप आधी सुचविण्यात येतील की ज्यामुळे मंडळ्यांना त्या मोहीमेसाठी प्रकाशनांचा साठा मागवून तो बांधवांना वेळेवर उपलब्ध करता येईल. हा प्रकाशन साठा मोहीम सुरु होण्याआधी उपलब्ध व्हावा म्हणून संबंधित प्रकाशनाची मागणी संस्थेला वेळेवर पाठवली जात आहे याकडे सेवा देखरेख्यांनी लक्ष दिले पाहिजे. प्रचारकांनी आपल्या मागण्या वैयक्‍तिक रितीने पाठवू नयेत. त्यांना जी पुस्तके हवी असतील ती त्यांनी मंडळीद्वारे मागवावीत.

▪ आमची अशी इच्छा आहे की सर्व मंडळ्यांनी आपापल्या क्षेत्राचा स्वतंत्र नकाशा तयार करून त्याचा वापर करावा. या कारणास्तव आम्ही मंडळ्यांना टेरीटोरी मॅप कार्डस्‌ (एस-१२) याचा साठा व त्यांचे प्लॅस्टिक आवरण आणि टेरीटोरी असायन्मेंट रेकॉर्ड कार्ड (एस-१३) पाठवीत आहोत. तुम्हाला अधिक साठा हवा असल्यास तो पुढे मागवू शकता. या फॉर्म्सचा कसा उपयोग करावा त्याची माहिती देणारे पत्रही आम्ही त्यासोबत पाठवत आहोत. मंडळीतील सेवा समितीने, पण खासपणे सेवा देखरेखे व क्षेत्राची काळजी घेणारा बांधव यांनी मिळून यावर लगेच काम करायला सुरवात करावी. याचे पहिले पाऊल हे की, प्रथम तुमच्या क्षेत्राच्या रस्त्यांचा उत्तम नकाशा मिळवा आणि तुमच्या क्षेत्रात जी टपाल कार्यालये आहेत त्यांची यादीही मिळवा. तुमच्या क्षेत्राची सरहद कोठपर्यंत आहे त्याची खात्री करा. याची निश्‍चिती शेजारील मंडळी किंवा मंडळ्यांच्या वडीलवर्गासोबत करता येईल. यामुळे आम्ही पुढे तुम्हाला ज्या सूचना पाठवू त्यांचे पालन करण्यास सुलभ जाईल.

▪ पुणे मराठी प्रांतिय अधिवेशनाचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुरु होईल.

▪ नवी प्रकाशने उपलब्ध:

उरीया: व्हॉट डू जेहोवाज विटनेसेस बिलिव्ह? (हस्तपत्रिका नं. १४); लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड (हस्तपत्रिका नं. १५); व्हॉट होप फॉर द डेड लव्हड्‌ वन्स? (हस्तपत्रिका नं. १६). सिंधी: आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस्‌ सॉल्व देम?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा