जुलैसाठी सेवा सभा
जुलै ६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ८० (१८)
५ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा.
१० मि: “१९९२ चे ‘ज्योती-वाहक’ प्रांतिय अधिवेशन”—भाग १. सभागृहासोबत परिच्छेद १-११ वर चर्चा. सर्वांना अधिवेशनातील माहिती व्यक्तिगतपणे तसेच क्षेत्रकार्यावर उपयोगात आणण्याच्या हेतूने कार्यक्रम लक्ष देऊन ऐकण्याचे प्रोत्साहन द्या. प्रचारकांना देखील अधिवेशनाला उपस्थित राहण्याची इच्छा करणाऱ्या त्यांच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांसोबत योग्य मुद्यांची चर्चा करू द्या. काही दक्षता मनात असू द्या. अधिवेशन काळादरम्यान कोणीही रात्री उशीरापर्यंत मनोरंजनात गढून जाऊ नये; आपण सर्वांनी पुरेशी विश्रांती घेतलीच पाहिजे. अधिवेशनाबद्दल उत्साह निर्माण करा.
१५ मि: “देवाच्या वचनावर विश्वास उभारा.” प्रश्नोत्तरे. या महिन्यातील आमच्या क्षेत्रकार्याबद्दल उत्साह वाढवा. आपली प्रकाशने तुमच्या क्षेत्रातील लोकांना पवित्र शास्त्रावर विश्वास उभारण्यास कशी मदत करू शकतात हे दाखवा.
१५ मि: “या महिन्याच्या सादरतेस प्रस्तुत करणे.” लेखातील काही प्रस्तावांची चर्चा व प्रात्यक्षिके सादर करा. एका प्रात्यक्षिकात अभ्यास थेटपणे कसा सुरु करता येतो ते दाखवा. तसेच सर्व पुरावे पवित्र शास्त्राच्या प्रेरणेकडे कसे निदर्शित करतात ते दाखवा.
गीत २२६ (४४) व समारोपाची प्रार्थना.
जुलै १३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४५ (११५)
१० मि: घोषणा. स्थानिक क्षेत्रावर काम करताना ज्या प्रस्तावना प्रभावी वाटल्या त्याबद्दलचे अभिप्राय देण्यासाठी दोन नियमित किंवा साहाय्यक पायनियरांना आधीच तयारीची नेमणूक द्या.
२० मि: “१९९२ चे ‘ज्योती-वाहक’ प्रांतिय अधिवेशन”—भाग २. सभागृहासोबत परिच्छेद १२-२१ वर चर्चा व वेळ मिळेल त्याप्रमाणे “प्रांतिय अधिवेशन स्मरणिका” याची त्रोटक उजळणी. अधिवेशनाला उपस्थित राहण्याआधी कुटुंबांना जून १५, १९८९ च्या द वॉचटावरमधील पृष्ठे १०-२०वरील मुद्यांची उजळणी करण्याचे प्रोत्साहन द्या. प्रचारकांनी प्रवासाच्या योजनेची तशीच राहण्याच्या जागेच्या व्यवस्थेबद्दल व्यवस्था पूर्ण केलेली असल्याची शेवटची खात्री करून घेण्याचे स्मरण द्या. सर्वांना अधिवेशनाचे बॅजेस् लावण्याचे आणि प्रवासात, उपहारगृहात, राहण्याच्या स्थळी असताना साक्ष देण्याचे उत्तेजन द्या.
१५ मि: मेडिकल डिरेक्टिव्ह/रिलिज् कार्ड याबद्दल संस्थेने ऑक्टोबर १५, १९९१ रोजी पाठवलेल्या पत्राचे वाचन व चर्चा करा. हे नवे कार्ड अद्याप ज्यांच्यापाशी नाही अशांनी ते लगेच प्रकाशन खात्यातून घेऊन सर्व माहिती पूर्णपणे भरुन त्यावर दोन कायदेशीर साक्षीदारांची सही घ्यावी. वेळ आहे तर जून १५, १९९१ च्या द वॉचटावर अंकातील पृष्ठे १५-१८ मधील “वॉक ॲज् इन्स्ट्रक्टेड बाय जेहोवा” या लेखाची उजळणी करा.
गीत ६१ (५९) व समारोपाची प्रार्थना.
जुलै २० ने सुरु होणारा सप्ताह
गीत ३४ (८)
१० मि: घोषणा. मार्चच्या क्षेत्रसेवेची ठळक वैशिष्ट्ये सांगा. मार्चच्या अहवालात मंडळीने कोणता कार्यभाग पूर्ण केला आहे ते दाखवा. जमाखर्च अहवाल सादर करा. क्षेत्रावर उरकलेल्या कामासाठी तसेच उदारपणे आर्थिक साहाय्य दिल्याबद्दल मंडळीची प्रशंसा करा.
२० मि: “तुम्ही अनौपचारिक साक्षीकार्यात सहभाग घेणार का?” लेखाची चर्चा व मुद्यांचे प्रात्यक्षिक. आपण सर्ववेळी यहोवाचे साक्षीदार आहोत, त्यामुळे आपण साक्ष देण्याची संधि शोधण्यास हवी या वस्तुस्थितीवर जोर द्या. जेथे अनौपचारिक साक्षीकार्यात सहभागी झाल्यामुळे चांगले परिणाम मिळाले त्यांचे किंवा अनौपचारिक साक्ष देण्याच्या परिणामामुळे मंडळीतील कोणी सत्यात आस्थेवाईक बनला अशांचे दोन त्रोटक अनुभव आधीच तयार करून ठेवा.
१५ मि: २ तीमथ्यी ३:१६ व स्तोत्र ११९:१५९, १६० चा उपयोग करून पवित्र शास्त्र चर्चा व द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? याची सादरता. नवीन तसेच युवक लोकांना केवळ २ तीमथ्यी ३:१६ चा वापर करून कशी साधी प्रस्तुति करता येते ते दाखवा. प्रात्यक्षिकात या गोष्टीची स्पष्टता करा की, आपण प्रकाशन वितरीत करताना जे अनुदान स्वीकारतो ते छपाईखर्चासाठी आहे व हा व्यापार नाही. घरमालकाला सांगितले जाऊ शकते की, जे जागतिक स्वरुपाचे शैक्षणिक कार्य असून ते स्वेच्छापूर्ण अनुदानाकरवी चालविले जाते. प्रकाशनाचे लवकरात लवकर वाचन करण्याचे प्रोत्साहन घरमालकास द्या आणि पुनर्भेटीसाठी पाया घाला.
गीत १५४ (७२) व समारोपाची प्रार्थना.
जुलै २७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७३ (५)
५ मि: घोषणा. ईश्वरशासित वृत्त. हे हाताळताना सध्याचा अहवालाची तुलना १९८७ वार्षिक अहवाल पुस्तक यात १९८६ च्या कार्य वर्षाबद्दल शाखा दप्तराचा जो अहवाल आहे त्याच्याशी पडताळून बघा.
२० मि: “पायनियरींग—प्रेमाचे वक्तव्य.” प्रश्नोत्तरे. परिच्छेद ३ व ४ विचारात घेतल्यावर तीन नियमित पायनियर्स (किंवा नियमितरित्या वा अधूनमधून साहाय्यक पायनियर करणारे प्रचारक) यांची व शक्य असल्यास सोबत शालेय शिक्षणानंतर लागलेच नियमित पायनियरींगला सुरवात केलेल्या एका तरुण बांधवाची मुलाखत घ्या. पायनियरींगसाठी त्यांनी कोणता आराखडा रचला, त्यांना ती करण्यासाठी कशामुळे चालना मिळाली, यासाठी त्यांना कोणते भौतिक त्याग पत्करावे लागले, आणि नियमित पायनियरच्या रुपात कार्य केल्यामुळे कोणकोणत्या आशीर्वादांचा लाभ झाला याबद्दलची विचारणा करा.
२० मि: “पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याच्या इराद्याने परतणे.” चर्चा व प्रात्यक्षिके. परिच्छेद ३ मध्ये सुचविलेल्या पवित्र शास्त्राच्या चर्चेचे प्रात्यक्षिक करून दाखवा. यासाठी द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? पुस्तकातील पृष्ठे १७०-२ वरील २३-२६ परिच्छेदांचा, पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी आधार म्हणून उपयोग करा.
गीत १३५ (७२) व समारोपाची प्रार्थना.
ऑगस्ट ३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९० (४२)
१० मि: घोषणा. या सप्ताहाच्या शेवटाला मासिके सादर करताना शास्त्रवचनीय चर्चा कशी केली जाऊ शकते याची दोन छोटी प्रात्यक्षिके दाखवा.
१५ मि: “प्रेषितीय वारसा.” सेवा देखरेखे हे एका पायनियरसोबत एका व्यक्तिची पुनर्भेट घेत आहेत, ज्याने हा प्रश्न विचारला होता की, “पोप हे प्रेषित पेत्राचे वारस नाहीत का?” ही चर्चा रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ ३७ ते पृष्ठ ३९च्या पहिल्या शिर्षकापर्यंत आधारलेली असावी.
२० मि: “हॅव अ सेल्फ सॅक्रिफायझिंग स्पिरिट!” फेब्रुवारी १, १९९२ च्या वॉचटावरमध्ये पृष्ठ २५-८ वरील लेखावर भाषण. (हा लेख प्रादेशिक भाषांच्या पंधरवड्या आवृत्तीत मे १, १९९२ च्या अंकात पृष्ठे २५-८ वर आहे.) हा स्वार्थत्यागी स्वरुपाचा आत्मा वैकल्पिक नाही तर ही एक ख्रिस्ती गरज आहे. राज्य आस्थेचा प्रथम मागोवा घेण्यासाठी आपण भौतिक गोष्टी तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम यांचा त्याग केल्यास आपले काही नुकसान होणार नाही. (ज्या मंडळीत मासिक आवृत्ती वापरली जाते अशांनी टेहळणी बुरुज जून १, १९९२ च्या अंकात पृष्ठ २९ वर दिलेला लेख “नम्रतेचे लेणे का परिधान करावे?” हा लेख हाताळावा.)
गीत १६७ (११०) व समारोपाची प्रार्थना.