तुम्ही अनौपचारिक साक्षीकार्यात सहभाग घेणार का?
१ आमच्या दैनंदिन जीवनातील नित्याच्या प्रघातात विशिष्ठ वेळी लोकांना यहोवाबद्दल बोलण्याचे सामावून आहे. आम्ही घरोघरचे कार्यात औपचारिकपणे बोलण्यासाठी, पुनर्भेट देण्यात आणि पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यात आपला वेळ राखून ठेवीत असतो. तरीपण आपण लोकांशी सत्याबद्दल बोलणी करू शकतो असे काही कमी स्वरुपाचे औपचारिक प्रसंग देखील आहेत. अशा प्रचाराला आपण अनौपचारिक साक्षीकार्य म्हणतो.
२ काही प्रचारकांना या प्रकारच्या सेवकपणात सहभागी होण्याच्या पुष्कळ सुसंधि मिळतात. आपण अधिवेशनाला जाताना व परत येताना, रजेवर असताना, आणि नातेवाईकांना भेटी देताना अशा प्रसंगाबाबतीत जागृत राहू शकतो. तर मग, अनौपचारिक साक्षीकार्य करण्याच्या या संधिचा तुम्ही फायदा उचलणार का?
३ अगोदर योजना आखा: तयारी व पूर्वविचार या गोष्टी आम्हाला अनौपचारिक साक्षीकार्य प्रभावीपणे करण्यासाठी समर्थ करतील. हे साध्य करण्यासाठी आम्ही विविध साहित्यानिशी सज्ज झालेलो आहोत. द वॉचटावर आणि अवेक! या मासिकांव्यतिरिक्त आस्था चेतविणारी विचारप्रर्वतक शिर्षके असणाऱ्या विविध हस्तपत्रिका आपणापाशी आहेत. याचप्रमाणे विविध पार्श्वभूमि व धर्माच्या लोकांना अपील करणारी माहितीपत्रके देखील आपणापाशी आहेत. तसेच सध्याच्या आस्थेला अनुलक्षून असणारी विविध विषयांची हाताळणी करणारी लहान आकाराची पुस्तकेही आम्हाजवळ आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकाशनाचा वापर मोकळेपणाने करता येतो? याबद्दल कुटुंब मिळून विचार करा. तेव्हा सुयोग्य वेळ आल्यास तुम्ही काय बोलाल याबद्दल तालीम करा.
४ रजेवर असतानाः अनौपचारिक साक्ष देण्याचा उत्तम प्रसंग रजेवर असताना मिळतो. तुम्ही अलिकडेच विमान, गाडी किंवा बसने प्रवास करण्याची योजना केली आहे का? तर आपणासोबत पवित्र शास्त्र व वर नमूद केलेले एखादे प्रकाशन घ्या. प्रवासात प्रकाशनांचे वाचन करणे हे सहसा संभाषणाला उद्युक्त करते. तुम्ही मोटारीने प्रवास करीत असाल तर मोटारीत इंधन भरण्यास थांबलेले असताना किंवा उपहार गृहात असताना किंवा हॉटेलवर राहात असताना लोकांशी काय बोलू शकाल याचा आधीच विचार करून ठेवा. अशा प्रसंगी आस्थेवाईक लोकांना देता यावा म्हणून हस्तपत्रिकांचा लहानसा साठा आपणापाशी बाळगू शकता. किंवा तुम्ही एखाद्या मार्गावर नयनरम्य सृष्टीच्या परिसरात विश्रांतीसाठी थांबला असाल तर तुम्ही आपले साक्षीकार्य एखाद्याला असे विचारून करू शकताः “जर सबंध पृथ्वी असे स्थळ झाली तर ते चांगले नसेल का?” याचप्रमाणे तुम्ही सुंदर सरोवर किंवा उद्यानात असल्यास याचप्रकारे प्रस्तावना करून बोलणे सुरु करू शकला.
५ प्रांतिय अधिवेशनाच्या वेळी: आपल्या प्रांतिय अधिवेशनाच्या वेळी देखील आपण अनौपचारिक साक्ष देण्याचे काही प्रसंग बघू शकतो. पुष्कळांना उपहारगृहातील किंवा राहण्याच्या जागेतील कर्मचाऱ्यांसोबत बोलणी करण्यात तसेच रस्त्यावरील आणि बस थांब्यावरील लोकांसोबत बोलण्यात यश मिळाले आहे. अधिवेशन काळादरम्यान आपले बॅज लावण्याची खात्री राहू द्या. तुम्ही उपहारगृह किंवा बाजारात एक फेरी टाकून बघा, लोक लगेच तुमच्या बॅजकडे बघून विचारतील की, हे काय आहे. यामुळे तुम्हाला सुंदर साक्ष देता येईल.
६ पुढे येणारे महिने आपय्लाला उत्साहवर्धकता व विरंगुळा देतील; पण आपल्याला अनौपचारिक साक्ष देण्याच्या ज्या संधि आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष होऊ देऊ नये. प्रचार कार्य करण्याची ही पद्धत देखील फलदायी आहे, आणि यहोवाच्या सेवकांनी यात सहभागी झाले पाहिजे. येशूप्रमाणेच आम्हीही सहमानवाबद्दल आपले प्रेम मिळालेल्या हरएक संधिला बोलण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करो!—मत्तय ५:१४-१६.