सुरवातीला केलेले निवेदन फरक घडवून आणू शकते
१ तुम्ही रिझनिंग पुस्तकातील किंवा आमची राज्य सेवा याच्या अलिकडील अंकात प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावनांचा उपयोग करीत आहात का? प्रसिद्ध झालेल्या साहित्यातील प्रास्ताविकतेचा शब्दशः वापर केल्यामुळे घरोघरच्या उपाध्यपणात खूप यश मिळत आहे असे पुष्कळ प्रचारकांनी कळवले आहे. शिवाय इतरांना आढळले आहे की, क्षेत्र कार्याची तयारी करण्यासाठी थोडासा अधिक वेळ दिल्यामुळे त्यांना छापील प्रस्तावनेवर आधारीत असलेले सुरवातीचे प्रास्ताविक बोल आपल्या स्वतःच्या शब्दात जुळवून घेता आले.
२ एक गोष्ट निश्चित की, राज्य संदेश कोणाकडे घेऊन जाण्याआधी तुमचे सुरवातीला केले जाणारे निवेदन तुमच्या चांगल्या लक्षात असले तर तुम्हाला अधिक मोकळे व अधिक आत्मविश्वास वाटू लागेल. तुमच्या बोलण्यावरुनच तुम्हाठायी सुवार्तेची सहभागिता करण्याची केवढी प्रामाणिक इच्छा आहे ते दिसून येईल. तुमची चांगली तयारी असल्यामुळे तुम्हाला क्षेत्रकार्य अधिक आनंदाचे वाटू लागेल, कारण त्यामध्ये परिणामही चांगले दिसतील. आपण आपल्या सेवेचे यज्ञार्पण जितके उत्तम सादर करतो त्याला अधिक महत्त्व राहते.—इब्री १३:१५; १ पेत्र २:५.
३ यासाठीच, तयारीला वेळ द्या. तुमच्या स्थानिक क्षेत्रात ज्या प्रकारच्या लोकांची भेट होणार असे वाटते त्यांना विचारात घ्या. त्यांना कोणकोणत्या गोष्टींची काळजी व चिंता वाटते? अलिकडील कोठल्या घडामोडींनी त्याच्या जीवनावर परिणाम झाला आहे? या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल मनन केल्यावर, रिझनिंग पुस्तकाच्या ९-१५ पृष्ठावंर आढळणाऱ्या सुरवातीच्या निवदेनांकडे पाहा, किंवा आमची राज्य सेवा यातील एक किंवा अधिक सुरवातीच्या प्रास्ताविकांची निवड करा. जे शब्द दिले आहेत ते जुळवून घेण्यास किंवा थोडा फेरफार करण्यासाठी संकोच करू नका की, ज्यामुळे तुम्हाला बोलायला मोकळे वाटेल. पुढचे पाऊल हे की तुम्ही जे सुरवातीचे निवेदन तयार केले आहे त्याची इतर प्रचारकांसोबत सरावामध्ये सहभागिता करा. यामुळे कदाचित इतरांना आपले प्रास्ताविक सुधारण्याचे किंवा जुळवून घेण्याचे उत्तेजन मिळेल. काही झाले तरी तुम्ही एकमेकांना उत्तेजन देणारे आणि चांगल्या कामासाठी एकमेकांची उभारणी करणारे ठराल.
४ तुम्ही क्षेत्र कार्याच्या सादरतांची तयारी करण्यामध्ये जो वेळ व परिश्रम खर्च करता तो प्रतिफळ देणारा ठरेल. सध्या जे उत्तेजक एकत्रीकरणाचे काम होत आहे त्यामध्ये तुम्हाला यामुळे अधिक प्रभावी सहभाग मिळण्याचा आशीर्वाद मिळू शकेल.