वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९२ पृ. ४
  • जूनमध्ये द वॉचटावर सादर करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जूनमध्ये द वॉचटावर सादर करणे
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • घरोघरी आपल्या मासिकांचा वापर करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • इतरांना देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताबद्दल शिकण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • आमच्या सादरतेला अनुलक्षून आमची प्रस्तावना जोडणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • प्रात्येक प्रासंगी वर्गण्या सादर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ६/९२ पृ. ४

जूनमध्ये द वॉचटावर सादर करणे

१ द वॉचटावर या मासिकाचा उद्देश दर अंकाला २ऱ्‍या पानावर वर सविस्तरपणे दिला जातो. अशा या घोषित उद्देशानुरुप शक्य त्या अनेक लोकांना मदत करण्यासाठी आपण काय करु शकतो? आपण जूनमध्ये, राज्य संदेशाबद्दल आस्था राखणाऱ्‍या सर्वांना द वॉचटावर मासिक नियमित रुपाने वाचण्याचे उत्तेजन देण्याचा खास प्रयत्न करणार आहोत.

२ ख्रिस्ती आहोत असे म्हणणाऱ्‍यांना आपण असे म्हणू शकतो:

▪ “आम्ही आपल्या शेजाऱ्‍यांसोबत एका प्रश्‍नाची विचारणा करीत आहोत व याबद्दल आपलेही मत जाणून घेण्यास आम्हाला आवडेल. येशूने आपल्याला देवाचे राज्य यावे व त्याची इच्छा स्वर्गात पूर्ण होते तशी या पृथ्वीवर साकार व्हावी अशी प्रार्थना म्हणण्यास शिकवले आहे तर तुम्हाला वाटते का की, देवाची इच्छा या पृथ्वीवर खरीच पूर्ण होणार?” उत्तर देण्यासाठी वाव द्या व मग यशया ५५:१०, ११ कडे वळा आणि देवाची सर्व अभिवचने कशी पूर्ण होतील ते घरमालकाला लक्षात घेण्यासाठी आमंत्रित करा.—रिझ. पृ. १२, “किंग्डम” या सदराखालील दुसरी प्रस्तावना.

३ घरमालकाने आस्था दाखविल्यास तुम्हाला पुढे असे म्हणता येईल:

▪ “या वॉचटावर मासिकाचा एक उद्देश लोकांचे लक्ष पवित्र शास्त्रीय भविष्यवादांच्या पूर्णतेकडे वळवणे हा आहे. हा लेख बघा.” यानंतर वॉचटावरच्या मे १ अंकातील पहिला लेख, “१९१४—द इयर दॅट शॉक्ड्‌ द वर्ल्ड” दाखवा व म्हणाः “तुम्हाला कदाचित वाटेल की, ‘१९१४बद्दल इतका रस का घ्यावा?’ हा दुसरा परिच्छेद १९१४ व द वॉचटावरबद्दल काय म्हणतो ते पहा.” मग परिच्छेद वाचा.

४ तुम्हाला अजूनही चर्चा वाढवायची असेल तर याच सादरतेत रिझनिंग पुस्तकात दर्शविल्याप्रमाणे प्रकटीकरण २१:३-५ चे वाचन व स्पष्टीकरण समाविष्ट करू शकता.

अशावेळी तुम्ही यशया ५५:१०, ११ नंतर पुढे असे म्हणू शकाल:

▪ “देवाने पृथ्वीबद्दल राखलेल्या उद्देशासंबंधाने एक सुंदर भविष्यवाद लवकरच पूर्ण होईल. तो तुमच्या व माझ्याही जीवनावर परिणाम करणारा ठरेल. तर कृपया प्रकटीकरण २१:३-५ मध्ये काय म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या.” यानंतर वचनांचे वाचन करा व देवाच्या राज्याच्या अधिपत्याखाली जे आशीर्वाद मिळतील त्यांची चर्चा करा. द वॉचटावर हे मासिक देवाच्या राज्य सरकारची कशी घोषणा करते ते दाखवा.

तुम्ही असे म्हणू शकाल:

▪ “मे १ अंकात ‘हू वील एस्केप द “टाईम ऑफ डिस्ट्रेस”?’ हा लेख दिलेला आहे. तो तुम्हाला प्रकटीकरण २१ अध्यायात दाखविलेल्या देवाच्या राज्यात नव्या नीतीमान जगामध्ये कसे जीवन व्यतित करता येऊ शकेल याची मदत देईल.”

५ जून १च्या टेहळणी बुरुजचा वापर करताना तुम्ही असे म्हणू शकाल: “आम्ही बहुतेक अधूनमधून आजारी पडत असतो. तर मग, हे जीवन असेच चालू राहणार का?” (घरमालकास बोलू द्या) मग म्हणा: “आजार व मृत्यु लवकरच राहणार नाहीत!” मासिकाच्या मुखपृष्ठावरील चित्र दाखवा. “हे असे घडू शकेल याचा तुम्हाला विश्‍वास वाटतो का?” (उत्तराची वाट बघा) चित्राबद्दल थोडा वेळ निरिक्षण झाल्यावर या लेखाचा शेवटला परिच्छेद त्यांना वाचायला द्या. वर्गणी सादर करा.

६ पवित्र शास्त्र अभ्यासाचा पाया घालण्यासाठी द वॉचटावरचा उपयोग करा: दुसऱ्‍यांनी सत्य शिकावे हे आमचे ध्येय आहे व यामुळेच ते देखील यहोवाचे सहकारी बनतील व यहोवाच्या राज्याची घोषणा करण्यात सहभागी होऊ शकतील. या कारणास्तव, आपल्याला आस्था दर्शविणारे लोक भेटतील तेव्हा त्यांची आपण नोंद घेऊ या व लवकर परत भेट घेऊ या.

७ द वॉचटावरच्या साहाय्याने आपण सत्याची सहभागिता करीत असताना आमच्या कार्यावर यहोवाच्या मार्गदर्शनासाठी सतत याचना करु या, ज्यामुळे आपल्याला मेंढरासमान लोकांना शोधता येऊन त्यांची भरवणूक करता येईल.—योहान २१:१५-१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा