स्मारकविधीनंतर मागोवा घ्या
१ “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावयास आला.” (मत्तय २०:२८) येशू ख्रिस्ताने मानवजातीसाठी जे केले ते पृथ्वीवर हयात राहिलेला कोणताही माणूस करून दाखवू शकला नाही. त्याचे जीवनाक्रमण व नंतर ओघाओघाने वधस्तंभावर आलेले मरण याद्वारे आम्हाला, कोणास मिळवता येईल असे सर्वात मोठे बक्षिस, सार्वकालिक जीवन, मिळविण्याकडे निरवले गेले. तरीपण, येशूने जे केले त्याबद्दल बहुतेक लोकांना तितकी कदर वाटत नाही.
२ येशूला दहा कुष्ठरोग्यांचा जो संपर्क आला तो प्रसंग जरा आठवा. त्यांनी येशूला येताना पाहिले तेव्हा ते मोठ्याने ओरडलेः “अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा.” (लूक १७:१३) त्याने त्यांच्यावर दया दाखवली, आणि नियमशास्त्रानुरुप याजकांकडे जाऊन स्वतःला दाखवण्यास लावले. वाटेत असता, ते दहाही महारोगी बरे झाले.
३ पण यापैकीचा केवळ एकजण येशूचे आभार मानण्यासाठी परतला. आणि बाकीचे नऊ? ते आपल्या मार्गावर पुढे जातच राहिले, यांना आपली मदत करणाऱ्याचे आभार मानण्याचा विचार देखील सुचला नाही. (लूक १७:१५-१७) तेव्हा आमची कोणासोबत तुलना होते? जो माणूस परत आला त्यासारखे आपण झाले पाहिजे. त्याच्याठायी खरी कदर होती. आम्हाला देखील ख्रिस्ताच्या मृत्युबद्दल असेच वाटते का?
४ आमची कदर दाखवणे: स्मारकतिथीच्या आधी एक आठवडाभर विशिष्ट पवित्र शास्त्रातील वचनांचे वाचन आपण करावे असे संस्था आपल्याला दरवर्षी सुचवीत आली आहे. या वर्षी जी शास्त्रवचने वाचावयाची आहेत ती, यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९२च्या कॅलेंडरमध्ये एप्रिल १२-१७ या तारखांना नमूद करण्यात आली आहेत. येशूच्या मृत्युआधी त्याच्या जीवनात ज्या घटना घडल्या त्याची माहिती देणाऱ्या या वचनांचे वाचन व मनन करून तुम्ही ती कदर व्यक्त केली होती का?
५ स्मारकदिनाबद्दल आम्हास वाटणाऱ्या रसिकतेचा आमच्या क्षेत्रकार्य हालचालीसोबत चांगला संबंध आहे. वडीलांनी चांगली संघटित स्वरुपाची योजना आखली असावी की, ज्यामुळे पायनियरांना व प्रचारकांना एप्रिलदरम्यान आपले क्षेत्रकार्य वाढवता आले असेल व ते मे मध्ये देखील पुढे चालू असेल. या दोन महिन्यात बहुतेक जण साहाय्यक पायनियरींगचा अनुभव घेतात. मागील वर्षी एप्रिलमध्ये ८७७ तर मे मध्ये १,०५२ जणांनी ती केली. आता या वर्षाबद्दल काय? तुम्हाला ते कार्य मे महिन्यात करता येईल का? समजा, करता आले नाही तर तुमची परिस्थिती मुभा देईल तितका प्रचारातील कार्यहालचालीमध्ये तुमचा सहभाग वाढवण्याचा यत्न करा.
६ दुसऱ्यांठायी कदर वाढवा: दर वर्षी स्मारकविधी प्रसंगी पुष्कळ आस्थेवाईक लोक आम्हासोबत एकत्र येत असतात. उदाहरणार्थ, गेल्या एप्रिलमध्ये जगभर १,०६,५०,१५८ जण स्मारकविधीला उपस्थित होते. यात ६३,७०,००० पेक्षा अधिक आस्थेवाईक लोक होते. हे संस्थेमध्ये मोठी वाढ होण्याची संभाव्यता दाखवते.
७ स्मारकविधी संपल्यावर त्याचा मागोवा घेण्याबद्दल आपण काय करावे? त्यावेळी पुष्कळ नव्या लोकांनी आपणासोबत सहवास राखला. ही आस्थेची ज्योत मावळू देऊ नका. त्यांची लवकर भेट घ्या. या आस्थेवाईकांसाठी जी अद्भूत आशा आहे ती दाखवण्यासाठी प्रकटीकरण ७:९, १४ या वचनांचा कदाचित वापर करता येईल. जे या जुन्या जगाच्या नाशातून बचावणार आहेत अशांच्या बाबतीत कोणती अपेक्षा करण्यात येते? प्रकटीकरण ७:१० कडे वळा आणि हे समजावून सांगा की, वर्षातून एकदा ख्रिस्ताच्या स्मरणदिनास उपस्थित राहण्यासोबत ‘विश्वास राखण्याची’ गरज आहे.—योहान ३:१६.
८ ख्रिस्ताच्या मृत्युचा दर वर्षी येणारा स्मरण दिन निसंशये खास प्रसंग असतो. त्याची कसून तयारी केल्यामुळे आपण, यहोवा व ख्रिस्त यांनी आमच्याबद्दल जे जे केले आहे त्याबद्दल आपली कदर दाखवीत असतो. ही कदर आपल्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्यांमध्ये तसेच इतर आस्थेवाईकांमध्ये वाढवीत राहा; कारण यामुळेच त्यांना, यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे केलेल्या खंडणीच्या तरतुदीवरील आपला विश्वास वाढविण्याची मदत मिळू शकेल.