वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९२ पृ. २
  • मे महिन्यासाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे महिन्यासाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • उपशिर्षक
  • मे ११ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे १८ ने सुरु होणारा सप्ताह
  • मे २५ ने सुरु होणारा सप्ताह
  • जून १ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९२
km ५/९२ पृ. २

मे महिन्यासाठी सेवा सभा

मे ११ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १८६ (१०१)

१२ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. “मे महिना तुम्हासाठी खास महिना असणार का?” साहाय्यक पायनियरींगकरता लगेच अर्ज देण्याच्या मुद्यावर भर द्या. तसेच सायंकाळच्या साक्षीकार्याबद्दल प्रोत्साहन पुरवा, आणि ज्या स्थानिक योजना याबद्दल आखण्यात आल्या आहेत त्या कळवा.

१५ मि: “द वॉचटावरद्वारे सुवार्ता घोषित करा.” लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. जे लोक प्रकाशनाबद्दल खरी आस्था व्यक्‍त करतात व जे कदाचित वर्गणी स्वीकारण्याची संभावना आहे अशांबद्दलचा काळजीपूर्वक विचार राखण्याकडे लक्ष देण्यास बंधूंना उत्तेजन द्या.

१८ मि: “स्मारकविधीनंतर मागोवा घ्या.” भाषण व प्रात्यक्षिक. परिच्छेद ७चा विचार केल्यावर, स्मारकविधीला पहिल्यांदाच आलेल्या कोणा नव्या व्यक्‍तीची प्रचारकाला कशी पुनर्भेट घेता येईल त्याचे प्रात्यक्षिक सादर करा.

गीत २०८ (६) व समाप्तीची प्रार्थना.

मे १८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०९ (८४)

१० मिः स्थानिक घोषणा. प्रश्‍न पेटी.

१५ मिः “आरंभीच्या प्रभावशाली भेटी.” प्रश्‍नोत्तराने हाताळणी. परिच्छेद ६ ची चर्चा झाल्यावर एखादा प्रचारक लाइफ इन ए पीसफूल न्यू वर्ल्ड या हस्तपत्रिकेचा उपयोग करून घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासाची सादरता व त्याचे प्रात्यक्षिक कसे सादर करतो याचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मिः घरोघरी द वॉचटावर देणे. “आरंभीच्या प्रभावशाली भेटी” या लेखातील परिच्छेद २ मध्ये सुचविलेल्या प्रस्तावाला अनुसरुन एक लायक प्रचारक घरमालकासोबत संभाषण करतो. (प्रादेशिक भाषेतील अलिकडील मासिकांना वापरताना ती सादरता त्यातील साहित्याला अनुरुप अशी जुळवून घ्या.) घरमालक म्हणतो की, त्याने तर आधीच इतर मासिकांना वर्गणी दिलेली आहे, त्यामुळे आता आणखी नको. प्रचारक म्हणतो की, ठीक आहे व तो एक हस्तपत्रिका त्याला देऊन परत भेट घेण्याचे अभिवचन देतो व पुढील भेटीत अधिक चर्चा करील असे म्हणून जातो. प्रात्यक्षिकानंतर अध्यक्ष सभागृहाला विचारतात की, आणखी कशामुळे ही हाताळणी चांगल्या पद्धतीने करता आली असती. हे सांगा की, या समस्येला हे सांगून हाताळता आले असते की, सध्याच्या काळी कुटुंबास अत्यंत हितावह ठरेल अशा प्रकाशनांपुरतेच मर्यादित राहण्याची गरज आहे. मासिकातील मुद्दे दाखवा व ही मासिके घरी येण्यामुळे जे चिरकालिक फायदे मिळू शकतात त्यावर भर द्या. जेव्हा वर्गणी नाकारली जाते तेव्हा दोन मासिके व एक माहितीपत्रक देणे चांगले. आणि हेही नाकारले तरच आपण हस्तपत्रिका द्यावी.

गीत ८७ (४७) व समाप्तीची प्रार्थना.

मे २५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १९५ (१०५)

१० मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल. संस्थेला व मंडळीला दिलेल्या अनुदानाबद्दल प्रशंसा करा.

१५ मिः रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठे ३२-३ वरील “अँटीख्राइस्ट” या साहित्यावर चर्चा. “ख्रिस्तविरोधी” याची व्याख्या कोणती? हा एकच आहे की आणखी आहेत? हा ख्रिस्तविरोधी केव्हा दिसला, व कोणाची ओळख तशी मिळते? चर्चला जात असलेल्या आणि यहोवाच्या साक्षीदारांबद्दल इशारा दिलेल्या एका माणसाला प्रचारक भेट देत असल्याचे त्रोटक प्रात्यक्षिक.

२० मिः “आध्यात्मिकरित्या बलवान व्हा आणि यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध असा.” पुरवणीतील लेखाची प्रश्‍नोत्तराने हाताळणी. हा भाग हाताळणाऱ्‍या वडीलाने साहित्याचा अवलंब स्पष्ट करण्यासाठी पूरक प्रश्‍न तयार करावेत. परिच्छेद ७ मध्ये दाखविल्याप्रमाणे आध्यात्मिकदृष्ट्या बलवान राहण्यासाठी थोडीफार ध्येये ठेवावीत यावर जोर द्या.

गीत १९७ (२२)  व समाप्तीची प्रार्थना.

जून १ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६९ (३२)

१० मिः स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त. स्मारकविधीची ठळक वैशिष्ट्ये द्या. किती उपस्थिती होती? नव्या लोकांसोबत पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याच्या केवढ्या संभाव्यता आहेत? ज्यांचा सध्या अभ्यास नाही अशा स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या लोकांना पुनर्भेटी देण्याची आयोजना सेवा देखरेख्यांनी संघटित करावी.

२० मिः “पुनर्भेटीमध्ये रिझनिंग पुस्तकाचा उपयोग करा.” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद ३ व ४वर चांगली तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके सादर करा.

१५ मिः एप्रिल व मे महिन्यात साहाय्यक पायनियरींग केलेल्या बांधवांकडील अनुभव. त्यांनी कोणते आत्मत्याग केले व यहोवाने त्यांना आशीर्वादित केले आहे असे कसे त्यांना वाटते? या महिन्यात आपल्या वाढीव कार्यामुळे काही नवीन पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करता आले का? अनुभवांची व्यवस्था आधीच करण्यास हवी. सर्वांना येणाऱ्‍या महिन्यांत साहाय्यक पायनियरींग करण्याचा विचार राखण्यास सांगा.

गीत ९३ (४८) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा