द वॉचटावर द्वारे सुवार्ता घोषित करा
१ द वॉचटावर हे मासिक आपणामध्ये सुवार्ता राखून असल्यामुळे ते खरोखरी अद्वितीय असे आहे. पण जगाची मासिके पाहिली तर त्यामध्ये केवळ वाईट व अंतःकरणास निराश करणारी माहिती असते. तर मग, द वॉचटावर हे मासिक वेगळेच असून ते खरेपणाने उत्साहवर्धक संदेश राखून आहे हे आपल्याला इतरांना कसे दाखवता येईल?
२ आपण या मासिकाच्या २ऱ्या पृष्ठावरील “टेहळणी बुरुजचा उद्देश” याकडे त्यांचे लक्ष वेधवू शकतो. मासिकाचा उद्देश यहोवा देवास सार्वभौम प्रभु या नात्याने उंचावणे, पवित्र शास्त्र भविष्यवादांना पूर्ण करणाऱ्या जागतिक घटनांची नोंद घेणे, त्रासलेल्यांना सांत्वनदायक संदेश देणे, आणि तारणासाठी देवाने पुरविलेल्या तरतुदीवर विश्वास बळकट करणे हा आहे हे दर्शवा.
३ द वॉचटावरबद्दल आम्ही सादर करणारे निवेदन त्याविषयाचे खात्रीलायक पद्धतीने विचार सादर करतात का? आपण जे काही म्हणतो ते क्षणिक आस्था जागृत करणारे भडक विचार नसावेत; त्यात अर्थ असला पाहिजे व त्याने असा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे की, ज्यामुळे लोकांना अधिक शिकण्याची इच्छा वाढवता येईल.
४ तयारी जरुरीची: आम्ही मासिकाचा प्रत्येक अंक काळजीपूर्वक वाचून, आमच्या क्षेत्राला विचारात ठेवून विविध सादरतांचे पृथक्करण करण्यास हवे. देण्यात आलेली वचने काढून बघणे आमची समज अधिक वाढवते. यामुळे आम्हाला सत्याबद्दल वाटणारी कदर अधिक खोलवर जाईल व ते इतरांसोबत सहभागी होण्याची चालना आम्हाला देऊ शकेल. सत्य हेच मुळात जर आमच्या अंतःकरणात नसले तर आम्हाला बोलण्याला देखील कमी चालना मिळेल.
५ सर्वसाधारणपणे सरळ पवित्रा राखणे चांगले व शक्यतो वर्गणी सादर करावी. चांगल्या जगाची आशा धरणाऱ्या लोकांची हे मासिक मोठी गरज भरुन काढते यावर भर द्या. वर्गणीचे पैसे तेव्हा घरमालकास अपुऱ्या पैशाअभावी देता येत नाही तर सोयीस्कर वेळी परत भेट देऊन तुम्ही ती वर्गणी सादर करीन असे त्यांना सुचवा. तथापि, वर्गणी नाकारल्यास दोन मासिके व एक माहितीपत्रक ९ रुपयांना सादर करा.
६ द वॉचटावरच्या अलिकडील अंकातील लेखांचे वाचन करीत असता, पूर्वी ज्या घरमालकांसोबत हे विषय चर्चा करण्यास मनोरंजक वाटले होते त्यांचा विचार करा, आणि हा ताजा अंक सोबत घेऊन जाऊन पुढील चर्चा करण्याची योजना करा.
७ या सुवार्तेची घोषणा आणखी किती काळ व केवढ्या प्रमाणात करायची आहे हे आम्हाला ठाऊक नाही. तरीपण, जे काही साध्य करण्यात येईल त्यामध्ये द वॉचटावर आपली प्रमुख भूमिका निश्चये पूर्ण करणार याची आम्हाला खात्री राखता येईल. या तरतुदीचा वापर करून आपण “प्रभूचे [यहोवा, न्यू.व.] वचन शिकवीत व सुवार्ता गाजवीत” प्रयत्नशील राहून प्रेषितांचे अनुकरण केले पाहिजे.—प्रे. कृत्ये १५:३५.