मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ५: सेवा देखरेख्यांची भेट
१ सेवा देखरेख्याने सुवार्तिक व शिक्षक असावे. सुवार्तेचा प्रचार व शिक्षण मंडळीच्या क्षेत्रात करता यावा म्हणून तिला मदत देण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे. (मार्क १३:१०) त्यांनी आपली जबाबदारी गंभीरपणे पार पाडल्यास आणि त्यांना सर्वांनी सहकार्य दिल्यास प्रचारकांना सुवार्तेची सादरता करण्यामध्ये अधिक निपुणता मिळू शकेल व क्षेत्राचा अधिक कसून उरक होऊ शकेल.
२ क्षेत्रावर अधिक कार्य व्हावे म्हणून उत्तेजन देण्याची सेवा देखरेख्यांची जबाबदारी असते. हे प्रामुख्यत्वे मंडळीच्या पुस्तक अभ्यासाद्वारे साध्य केले जाते. सेवा देखरेख्यांना एखादा पुस्तक अभ्यास चालविण्याची नेमणूक असते, पण वस्तुतः दर महिन्याच्या एका आठवडी जेव्हा ते दुसऱ्या गटाला भेट देतात तेव्हा त्यांचे मदतनीस तो अभ्यास चालवू शकतील.—रा.से. ११/८१ पृ. १, ७.
३ भेटीची तयारी: या भेटीच्या आठवड्याआधी सेवा देखरेख्यांनी त्या विशिष्ठ गटाशी संबंधित असणाऱ्या मंडळीच्या प्रचारकांच्या कार्डांची तपासणी करावी. त्यांनी पुस्तक अभ्यास चालकांना भेटून गटातील प्रचारकांसंबंधाने कोणत्या कार्यहालचालींची योजना करण्यात आली आहे त्याबद्दल उजळणी करावी. चालक सेवा देखरेख्यांना कार्याच्या अनुषंगाने असणाऱ्या काही समस्यांची किंवा अहवाल कार्डात दिसून न येणाऱ्या विशिष्ट गरजांची पूर्वकल्पना देऊ शकेल. अभ्यास चालकाला याचे स्मरण राहावे की सेवा देखरेख्यांच्या भेटीदरम्यान पुस्तक अभ्यास केवळ ४५ मिनिटांचा असतो व बाकीची १५ मिनिटे सेवा देखरेख्यांच्या सेवा भाषणासाठी असतात.
४ ते भाषण सर्वांनी कार्याबद्दल अधिक रसिकता वाढवावी या अनुषंगाने असेल. प्रचारकांना सेवेच्या विशिष्ट प्रकाराबद्दल साहाय्य हवे आहे हे दिसत असल्यास सेवा देखरेखे सुधारणेसाठी व्यावहारिक प्रस्ताव मांडतील. त्यांचे विवेचन सरळ व उत्तेजनात्मक असावे; ते, ज्यामुळे काहींना विचलीत झाल्यासारखे वाटू लागेल असे नकारार्थी नसावे. तसे झाल्यास त्यांच्या भेटीचा उद्देश साध्य होऊ शकणार नाही. त्यांच्या भाषणाने सर्वांना सुधारणा करण्याचे उत्तेजन मिळाले पाहिजे.
५ सेवा देखरेखे आपल्या कार्यक्रमानुसार होता होईल तितक्या अधिक बंधू भगिनींना वैयक्तीक लक्ष देण्याचा प्रयत्न करतील. ते विविध लोकांसोबत क्षेत्रकार्य करण्याची नेमणूक देऊ शकतील. प्रचारकांसोबत मिळून घरोघरचे कार्य करीत असता त्यांना आपली सादरता सुधारता यावी याबद्दल एक किंवा दोन प्रस्ताव देता येतील. हे टिकात्मक धोरणाने नव्हे, तर साहाय्य करण्याच्या प्रेमळ इच्छेने करावे. त्यांना प्रचारकांबरोबर पुनर्भेटी व पवित्र शास्त्राभ्यासाला देखील जाता येईल. गटातील कोणाला व्यक्तीगत सहाय्याची गरज आहे तर ते त्या आठवड्यात त्यांना मेंढपाळकत्वाची भेट देतील व मदत करतील. मग, ते पुस्तक अभ्यास चालकाला जे प्रस्ताव या प्रचारकाला दिले ते सांगू शकतील. अशाप्रकारचे उबदार व व्यक्तीगत लक्ष क्षेत्रकार्यात मंदावलेल्यांना उभारणीकारक ठरले आहे.
६ सेवाकार्यासाठी भेटणे: त्या आठवडी क्षेत्रकार्याची सभा सेवा देखरेख्यांनी घ्यावी. जरी या सभेला थोडे उपस्थित राहिले तरी ती वेळेवर सुरु करावी. ती १० ते १५ मिनिटांपेक्षा अधिक असू नये. दैनंदिन वचनाचा विचारविनिमय करणे हे ऐच्छिक आहे. गटाचे विभाजन होण्याआधी प्रत्येकाला, तो कोणासोबत व कोठे कार्य करील ते माहीत झाले पाहिजे. (१ करिंथ. १४:३३, ४०) सेवा देखरेख्यांनी सर्वांना विलंब न लावता क्षेत्रकार्य सुरु करण्याचे उत्तेजन द्यावे.
७ मंडळीतील पुस्तक अभ्यास गटांना सेवा देखरेख्यांनी दिलेल्या नियमित भेटी मंडळीसाठी खरा आशीर्वाद ठरतो. ते भेट देतील तेव्हा आपण प्रत्येकाने त्यांना सहकार्य केल्यामुळे आमचे सेवकपण व्यवस्थित व प्रभावशाली होऊ शकेल. यामुळे त्यांनाही आपल्या कामात आनंद मिळू शकेल. (इब्री १३:१७) मेंढरासमान लोकांचे एकत्रीकरण होईल; आणि मग, जे ऐकतात अशा सर्वांना प्रचार करण्याची आपली नेमणूक पूर्ण करू शकलो याची धन्यता आपल्याला राहील.—यशया ६१:१, २; यहे. ९:११; योहान १७:२६.