१९९२ करिता ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेचा आराखडा
सूचना
१९९२ मध्ये ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा पुढील व्यवस्थेनुरुप चालविली जाईल.
क्रमिक पुस्तके: पवित्र शास्त्र, “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” (१९८३ ची आवृत्ती) [si], थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबूक [sg], द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड् [gt], बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन [td], आणि युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट [yy] ही प्रकाशने साहित्याच्या नेमणूका देण्यासाठी वापरली जातील.
शाळेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने सुरु होईल. त्यानंतर तो पुढील प्रकारे चालविला जाईलः
नेमणूक क्रमांक १: १५ मिनिटे. ही वडील किंवा प्रशिक्षित उपाध्य सेवकांकरवी हाताळली जावी. ही नेमणूक “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” किंवा थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबूक यावर आधारलेली असेल. ही नेमणूक १० ते १२ मिनिटाकरिता बोधप्रद भाषण या अर्थी सादर करावी व नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील प्रश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. या मागील ध्येय केवळ साहित्य उरकावे हे नसावे तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीतील व्यावहारिक मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे व मंडळीस अत्यंत साहाय्यक ठरणारे मुद्दे ठळकपणे सामोरे मांडावे हे असावे. गरज आहे तेथे या साहित्याचे शिर्षक निवडावे. सर्वांना या साहित्याची काळजीपूर्वक पूर्वतयारी करण्याचे प्रोत्साहन दिले जाते की ज्याकरवी साहित्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकेल.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवाने वेळेमध्ये आपले भाषण संपविण्याची दक्षता घ्यावी. जरुरी भासल्यास या बांधवास खाजगी सूचना द्याव्या.
पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग शाळा देखरेख्यांकरवी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या लायक वडीलांनी किंवा उपाध्य सेवकांनी हाताळावा. नेमून दिलेल्या वाचनाचा तो सारांश नसावा. नेमलेल्या अध्यायातील एकंदर त्रोटक दृष्टीकोण सांगितल्यावर त्यातील माहिती आम्हास का व कशी महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी सभागृहाला साहाय्य करावे. साहित्यातील ठळक मुद्यांसाठी टेहळणी बुरुज यातील साहित्याचा परामर्श घ्यावा. यानंतर शाळा देखरेखे विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवितील.
भाषण क्रमांक २: ५ मिनिटे. एका बंधूला नेमून दिलेल्या पवित्र शास्त्र भागाचे हे वाचन आहे. हे शाळेच्या मुख्य वर्गास तसेच उप वर्गास सुध्दा लागू आहे. सुरुवातीला त्रोटक विवेचन, समाप्तीचे विचार व मध्यंतरात काही मुद्दे विवेचीत करता येतील एवढी पुरेशी ही वाचनाची नेमणूक आहे. यात ऐतिहासिक पार्श्वभूमि, भविष्यवादित किंवा तात्विक विषयाची अर्थसूचकता व त्यांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व शास्त्रवचने वाचली जावीत.
भाषण क्रमांक ३: ५ मिनिटे. हे भाषण भगिनींना नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड् या पुस्तकातून राहील. नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थिनीस वाचता आले पाहिजे. भाषण सादर करताना ही विद्यार्थिनी बसू शकते वा उभी राहू शकते. एक मदतनीस शाळा देखरेखे नेमून देतील पण अधिक मदतनीस वापरता येतील. भाषणातील दृश्य रचना क्षेत्र कार्य किंवा अनौपचारिक साक्षीकार्य याजशी संबंधित असावी. ही दृश्य रचना भाषण देणाऱ्याकरवी वा तिच्या मदतनीसाकरवी प्रस्तुत करता येईल. दृश्य रचना नव्हे तर साहित्याला प्राधान्य दिले जावे. विद्यार्थिनीने आराखड्यात दिलेल्या शिर्षकाचा वापर करावा.
भाषण क्रमांक ४: ५ मिनिटे. बंधूला किंवा भगिनीला नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन आणि युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट यावर अदलीबदली होत राहील. युथ पुस्तकावरील विषय प्रामुख्यत्वे तरुण किंवा नव्या विद्यार्थ्यांना नेमून देण्यात येईल. नेमणूक मिळालेल्या विद्यार्थ्याला वाचता आले पाहिजे. जेव्हा बंधूला नेमणूक देण्यात येईल तेव्हा त्याने सबंध सभागृहाला ते भाषण सादर करावे. राज्य सभागृहातील उपस्थितांना विचारात घेऊन त्या बांधवाने भाषणाची तयारी करावी हे बरे, म्हणजे जे ते ऐकतील ते त्यांना माहितीयुक्त व लाभदायक ठरेल. तथापि, एका दुसऱ्या व्यावहारिक व सभागृहास अनुलक्षून असणाऱ्या योग्य रचनेकडे साहित्याचा कल असेल तर तो बंधू त्या पध्दतीने त्या भाषणाची तयारी करू शकेल. विद्यार्थ्याने, नेमून दिलेल्या शिर्षकाप्रमाणे तयारी करावी.
हे भाषण भगिनीला नेमून दिल्यास ते तिने भाषण क्रमांक ३ च्या पध्दतीने सादर करावे.
सल्ला व शेरा: प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर शाळा देखरेखे विशिष्ट प्रकारातील सल्ला देतील. याकरता कौन्सिल स्लीपवरील प्रगतिशील सूचनासंबंधाने दाखविण्यात आलेला अनुक्रम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात प्रगति करण्याची गरज आहे त्याकडे त्यांनी लक्ष देण्यास हवे. विद्यार्थी वक्ता “जी” या शेऱ्यास पात्र आहे व स्पीच कौन्सिलवर इतर कोणत्याहि गुणावर “आय” किंवा “डब्ल्यू” असा निर्देश नाही तर ज्या गुणावर पुढील भाषणाबाबत विद्यार्थ्याने तयारी करावी असे शाळा देखरेख्यास वाटते तेथील चौकोनावर त्याने आळे करावे. ही माहिती ते त्या विद्यार्थ्याला त्या सायंकाळी देतीलच व त्यासोबत पुढल्या वेळी विद्यार्थ्याला थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल असायन्मेंट स्लीप (एस–८९) वर जी नेमणूक ते देतील त्यावेळीही हाच गुण तयारीकरता दर्शवितील. भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली बैठक पहिल्या रांगेत घ्यावी. याद्वारे एकतर वेळ वाचेल व शाळा देखरेख्यांनाही त्यांना थेट सूचना देण्याचे सोईचे होईल. तोंडी सूचना देऊन झाल्यावर वेळ मुभा देईल त्याप्रमाणे सल्लागारास, विद्यार्थ्याने आपल्या भाषणात साहित्याच्या ज्या माहितीयुक्त व व्यावहारिक मुद्यांचा समावेश केला नव्हता त्यावर विवेचन मांडता येईल. प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर सल्ला व शेरा देण्यासाठी शाळा देखरेख्यांनी केवळ दोनच मिनिटे वापरण्याची दक्षता घ्यावी. पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्यात काही विशिष्ट असे सांगायचे राहून गेले असल्यास याविषयीची सूचना त्या बंधूस खाजगी रितीने देण्यात यावी.
भाषणाची तयारी: नेमणूक क्रमांक १ लाभलेल्या बांधवाने शक्य आहे तेथे एक विषय निवडावा. दुसरे भाषण मिळालेल्या विद्यार्थ्याने असा विषय निवडावा की ज्याकरवी नेमलेल्या साहित्याचा एकंदर उरक त्यामध्ये येऊ शकेल. तिसऱ्या व चवथ्या भाषणाची नेमणूक मिळालेल्या विद्यार्थ्याने दाखविलेल्या विषयाचा वापर करावा. भाषण देण्याआधी विद्यार्थ्याने, तो ज्या भाषणशैलीच्या गुणावर काम करीत आहे त्याविषयी स्कूल गाईड पुस्तकामध्ये असलेले साहित्य वाचलेले असावयास हवे.
वेळ: कोणतेही भाषण वेळेबाहेर जाऊ देऊ नये. तसेच सल्लागाराने दिलेला सल्ला व शेराही वेळेच्या आत असावा. भाषण क्रमांक २ ते ४ ची वेळ झाली म्हणजे ते कुशलतेने थांबवावे. ज्या बांधवाला “थांबण्याचा संकेत” करण्यासाठी नेमले आहे त्यानेहि तो तत्परतेने करावा. नेमणूक क्रमांक १ चे बांधव वेळेबाहेर गेल्यास त्यांना खाजगी सूचना देण्यात यावी. सर्वांनी वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सबंध कार्यक्रम, गीत व प्रार्थना वगळता ४५ मिनिटांचा आहे.
लेखी चाचणी: वेळोवेळी लेखी चाचणी घेण्यात येईल. याच्या तयारीसाठी नेमिलेल्या साहित्याची व नियुक्त केलेल्या पवित्र शास्त्र वाचन विभागाची उजळणी करावी. २५ मिनिटांच्या चाचणीत फक्त पवित्र शास्त्र वापरता येईल. राहिलेल्या वेळात प्रश्नोत्तराच्या रुपाने चर्चा होईल. प्रत्येक विद्यार्थी आपली उत्तर पत्रिका तपासील. शाळा देखरेखे सर्व उत्तरे वाचून दाखवतील. यात कठीण प्रश्नावर अधिक लक्ष देऊन त्यांची उत्तरे सर्वांना स्पष्टपणे समजावून देण्याचे सहाय्य करतील. स्थानिक परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळे ही लेखी चाचणी नियुक्त केलेल्या तारखेच्या एका आठवड्यानंतर घेता येईल.
मोठ्या व लहान मंडळ्या: ज्या मंडळीतील शाळेत ५० वा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पटावर असतील तेथे नियोजित भाषणे देण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करता येईल व त्यांची भाषणे दुसऱ्या सल्लागारांच्या समक्ष ऐकविता येतील. अर्थातच, समर्पण न झालेल्या पण ख्रिस्ती तत्त्वानुरूप जीवन व्यतित करणाऱ्यांना शाळेत आपले नाव दाखल करून नेमणूका प्राप्त करता येतील.
अनुपस्थितीः दर आठवडी शाळेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आपणाला दिलेल्या नेमणूकांची चांगली तयारी करून आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांनी ह्या शाळेबद्दल रसिकता दाखवावी. सर्व विद्यार्थी, आपणास मिळालेल्या नेमणूका जाणीवपूर्वकतेने पूर्ण करतील अशी आम्ही आशा करतो. नेमलेला विद्यार्थी गैरहजर असल्यास एखादा स्वयंसेवक ती नेमणूक आपल्या परीने जे करता येईल त्याद्वारे हाताळील. किंवा शाळा देखरेखे त्या साहित्याची चर्चा सभागृहासोबत करू शकतील.
आराखडा
मार्च २ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय १ ते ४
गीत क्र. ४६ (२०)
नं. १: लेवीय पुस्तकाची प्रस्तावना—भाग १ (si पृ. २५-६ परि. १-५)
नं. २: लेवीय १:१-१३
नं. ३: अद्यापपर्यंत जिवंत राहिलेल्या सर्वथोर मनुष्याची ओळख पटविणे (gt प्रस्तावना परि. १-४)
नं. ४: तुम्ही शिस्तीविषयी कोणती प्रतिक्रिया दर्शवाल? (yy अध्याय १३ परि. १०-१७)
मार्च ९ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय ५ ते ७
गीत क्र. २०५ (११८)
नं. १: लेवीय पुस्तकाची प्रस्तावना—भाग २ (si पृ. २६ परि. ६-१०)
नं. २: लेवीय ५:१-१३
नं. ३: येशू खराच जिवंत होता का? (gt प्रस्तावना परि. ५-११)
नं. ४: देवाचा पवित्र आत्मा ही त्याची क्रियाशील शक्ती आहे (td ५८ई)
मार्च १६ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय ८ ते १०
गीत क्र. १११ (१०४)
नं. १: sg पृ. ५-७ परि. १-९
नं. २: लेवीय १०:१-११
नं. ३: येशू खरेपणाने कोण होता? (gt प्रस्तावना परि. १२-१५)
नं. ४: मद्य व ते लोकांवर परिणाम कसा करते (yy अध्याय १४ परि. १-११)
मार्च २३ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय ११ ते १३
गीत क्र. २२४ (१०६)
नं. १: sg पृ. ७-९ परि. १०-१६
नं. २: लेवीय ११:१-१२, ४६, ४७
नं. ३: येशू कशामुळे सर्वथोर माणूस बनला (gt प्रस्तावना परि. १६-१९)
नं. ४: जगाच्या त्रासापासून मुक्ती—कशी? (td ५९ए)
मार्च ३० पवित्र शास्त्र वाचन: लेवीय १४ व १५
गीत क्र. १०५ (४६)
नं. १: sg पृ. ९-११ परि. १-१२
नं. २: लेवीय १४:१-१३
नं. ३: येशूबद्दल का शिकावे व ते आम्हास कसे शिकता येईल (gt प्रस्तावना परि. २०-२३)
नं. ४: तुम्ही मद्याची पेये प्राशन करावीत का? (yy अध्याय १४ परि. १२-२४)
एप्रिल ६ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय १६ ते १८
गीत क्र. १८० (१००)
नं. १: sg पृ. १२-१३ परि. १३-२०
नं. २: लेवीय १६:१-१४
नं. ३: गाब्रिएल जखर्या व मरीयेला दर्शन देतो (gt अध्याय १)
नं. ४: जगातील त्रासाची अर्थसूचकता काय आहे? (td ५९बी)
एप्रिल १३ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय १९ ते २१
गीत क्र. १७० (९५)
नं. १: sg पृ. १४-१७ परि. १-१०
नं. २: लेवीय १९:१-१५
नं. ३: येशूचा जन्माआधी सन्मान होतो (gt अध्याय २)
नं. ४: मादक औषधे—त्यांचे काही स्थान आहे का? (yy अध्याय १५ परि. १-१२)
एप्रिल २० पवित्र शास्त्र वाचन: लेवीय २२ ते २४
गीत क्र. ६४ (३५)
नं. १: लेवीय—लाभदायक का?—भाग १ (si पृ. २९ परि. २८-३५)
नं. २: लेवीय २३:१-१४
नं. ३: योहानाचा जन्म (gt अध्याय ३)
नं. ४: जगातील त्रासाबद्दल कोण जबाबदार आहे? (td ५९सी)
एप्रिल २७ पवित्र शास्त्र वाचन: लेवीय २५ ते २७
गीत क्र. ७ (३१)
नं. १: लेवीय—लाभदायक का?—भाग २ (si पृ. २९-३० परि. ३६-३९)
नं. २: लेवीय २५:१-१२
नं. ३: योसेफ गर्भवती मरीयेशी लग्न करतो (gt अध्याय ४)
नं. ४: तुम्हाला मादक औषधांबद्दल काय माहीत असावयास हवे? (yy अध्याय १५ परि. १३-१७)
मे ४ पवित्र शास्त्र वाचन: गणना १ ते ३
गीत क्र. १७२ (९२)
नं. १: गणना पुस्तकाची प्रस्तावना—भाग १ (si पृ. ३०-१ परि. १-६)
नं. २: गणना ३:३८-५१
नं. ३: येशूचा जन्म—कोठे व केव्हा? (gt अध्याय ५)
नं. ४: देव दुष्टाईला का परवानगी देतो? (td ५९डी)
मे ११ पवित्र शास्त्र वाचन: गणना ४ ते ६
गीत क्र. १२८ (५८)
नं. १: गणना पुस्तकाची प्रस्तावना—भाग २ (si पृ. ३१ परि. ७-१०)
नं. २: गणना ६:१-१२
नं. ३: वचन देण्यात आलेले मूल (gt अध्याय ६)
नं. ४: तंबाखू व मारीजुआना वापरण्याबद्दल काय? (yy अध्याय १५ परि. १८-२५)
मे १८ पवित्र शास्त्र वाचन: गणना ७ ते ९
गीत क्र. १०६ (५५)
नं. १: sg पृ. १७-१९ परि. ११-१७
नं. २: गणना ८:१४-२६
नं. ३: येशू व ज्योतिष लोक (gt अध्याय ७)
नं. ४: लांबविण्यात आलेला समाप्तीचा काळ ही दयावंत तरतूद आहे (td ५९ई)
मे २५ पवित्र शास्त्र वाचन: गणना १० ते १२
गीत क्र. ४५ (७७)
नं. १: sg पृ. १९-२१ परि. १-९
नं. २: गणना १२:१-१६
नं. ३: जुलमी अधिपतीपासून सुटका (gt अध्याय ८)
नं. ४: खेळ व मनोरंजन याबद्दलचा समतोल दृष्टीकोण कोणता आहे? (yy अध्याय १६ परि. १-८, १७-१९)
जून १ पवित्र शास्त्र वाचन: गणना १३ ते १५
गीत क्र. १२४ (७५)
नं. १: sg पृ. २१-४ परि. १०-२०
नं. २: गणना १४:१-१२
नं. ३: येशूचे आरंभीचे कौटुंबिक जीवन (gt अध्याय ९)
नं. ४: जगाच्या विपत्तीचा पर्याय मानवापासून नाही (td ५९एफ)
जून ८ पवित्र शास्त्र वाचन: गणना १६ ते १९
गीत क्र. १५१ (२५)
नं. १: sg पृ. २४-६ परि. १-११
नं. २: गणना १७:१-१३
नं. ३: १२ वर्षांचा असताना यरुशलेमात (gt अध्याय १०)
नं. ४: चित्रपट व दूरदर्शवरील कार्यक्रम पाहताना तुम्ही का निवडक असावे? (yy अध्याय १६ परि. ९-१६)
जून १५ पवित्र शास्त्र वाचन: गणना २० ते २२
गीत क्र. १३८ (७१)
नं. १: sg पृ. २७-९ परि. १२-२०
नं. २: गणना २०:१-१३
नं. ३: योहान येशूसाठी मार्ग तयार करतो (gt अध्याय ११)
नं. ४: दुष्टांचा उत्कर्ष तात्कालिक असतो (td ५९जी)
जून २२ लेखी चाचणी. संपूर्ण लेवीय १ ते गणना २२
गीत क्र. २१७ (४९)
जून २९ पवित्र शास्त्र वाचन: गणना २३ ते २६
गीत क्र. ११२ (५९)
नं. १: sg पृ. २९-३१ परि. १-७
नं. २: गणना २५:१-१३
नं. ३: येशूचा बाप्तिस्मा होताना काय घडते (gt अध्याय १२)
नं. ४: संगीत व नृत्याची निवड करताना निवडक असण्याची काळजी का घ्यावी (yy अध्याय १७ परि. १-१६)
जुलै ६ पवित्र शास्त्र वाचन: गणना २७ ते ३०
गीत क्र. १३२ (७०)
नं. १: sg पृ. ३१-३ परि. ८-१५
नं. २: गणना ३०:१-१६
नं. ३: येशूच्या परिक्षांपासून धडा शिकणे (gt अध्याय १३)
नं. ४: परिपूर्ण विश्वासमध्ये दुष्टतेचा आरंभ कसा झाला (td ५९एच)
जुलै १३ पवित्र शास्त्र वाचन: गणना ३१ व ३२
गीत क्र. २२२ (११९)
नं. १: गणना—लाभदायक का?—भाग १ (si पृ. ३४-५ परि. ३२-३४)
नं. २: गणना ३१:१-१२
नं. ३: येशूचे पहिले शिष्य (gt अध्याय १४)
नं. ४: नृत्य व संगीताची तुमची निवड तुम्हाबद्दल काय सांगते (yy अध्याय १७ परि. १७-२५)
जुलै २९ पवित्र शास्त्र वाचन: गणना ३३ ते ३६
गीत क्र. १६० (७२)
नं. १: गणना—लाभदायक का?—भाग २ (si पृ. ३५ परि. ३५-३८)
नं. २: गणना ३५:९-२५
नं. ३: येशूचा पहिला चमत्कार (gt अध्याय १५)
नं. ४: तुम्ही आता निर्णय घेतला पाहिजे (td ५९आय)
जुलै २७ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद १ ते ३
गीत क्र. १८७ (९३)
नं. १: अनुवाद पुस्तकाची प्रस्तावना—भाग १ (si पृ. ३६ परि. १-६)
नं. २: अनुवाद १:२९-४६
नं. ३: यहोवाच्या भक्तीबद्दलचा आवेश (gt अध्याय १६)
नं. ४: लैंगिक बाबतीत शुद्धाचरणी असण्यामुळे तुमचा कसा फायदा होतो (yy अध्याय १८ परि. १-११)
ऑगस्ट ३ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद ४ ते ६
गीत क्र. ९१ (९१)
नं. १: अनुवाद पुस्तकाची प्रस्तावना—भाग २ (si पृ. ३७ परि. ७-९)
नं. २: अनुवाद ५:६-२२
नं. ३: निकदेमाला शिकवणे (gt अध्याय १७)
नं. ४: सर्व ख्रिश्चनांनी सुवार्ता सांगितली पाहिजे (td ६०ए)
ऑगस्ट १० पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद ७ ते १०
गीत क्र. १६२ (८९)
नं. १: sg पृ. ३३-५ परि. १-९
नं. २: अनुवाद ७:१-११
नं. ३: योहानाचा लय होतो, येशूची वृद्धी होते (gt अध्याय १८)
नं. ४: लैंगिक शुद्धाचरणी जीवन का अर्थवादी आहे (yy अध्याय १८ परि. १२-२१)
ऑगस्ट १७ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद ११ ते १४
गीत क्र. २०६ (१११)
नं. १: sg पृ. ३६-८ परि. १०-१७
नं. २: अनुवाद १३:१-११
नं. ३: शमरोनी स्त्रीला शिक्षण देणे (gt अध्याय १९ परि. १-१४)
नं. ४: साक्ष पुनःपुन्हा दिली पाहिजे (td ६०बी)
ऑगस्ट २४ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद १५ ते १९
गीत क्र. १५० (८३)
नं. १: sg पृ. ३९-४१ परि. १-११
नं. २: अनुवाद १८:९-२२
नं. ३: पुष्कळ शमरोनी लोकांनी का विश्वास धरला (gt अध्याय १९ परि. १५-२१)
नं. ४: लैंगिक शुद्धाचरणी मार्गास दृढ धरून राहा (yy अध्याय १८ परि. २२-२६)
ऑगस्ट ३१ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद २० ते २३
गीत क्र. ७९ (१०४)
नं. १: sg पृ. ४१-३ परि. १२-१८
नं. २: अनुवाद २३:९-२५
नं. ३: काना गावी असताना दुसरा चमत्कार (gt अध्याय २०)
नं. ४: रविवारचे शब्बाथ साक्षीकार्य योग्य आहे (td ६०सी)
सप्टें. ७ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद २४ ते २७
गीत क्र. ५९ (३१)
नं. १: sg पृ. ४४-६ परि. १-८
नं. २: अनुवाद २४:१०-२२
नं. ३: येशू आपल्या गावी प्रचार करतो (gt अध्याय २१)
नं. ४: भेटीगाठी घेण्यामागील समस्या (yy अध्याय १९ परि. १-१३)
सप्टें. १४ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद २८ ते ३०
गीत क्र. १७५ (८८)
नं. १: sg पृ. ४६-८ परि. ९-२०
नं. २: अनुवाद ३०:८-२०
नं. ३: चार शिष्यांना पाचारण केले जाते (gt अध्याय २२)
नं. ४: प्रचारकार्याला स्वेच्छापूर्ण अनुदानाकरवी अर्थ सहाय्य मिळते (td ६०डी)
सप्टें. २१ पवित्र शास्त्र वाचन: अनुवाद ३१ ते ३४
गीत क्र. ४१ (२२)
नं. १: अनुवाद—लाभदायक का? (si पृ. ४०-१ परि. ३०-३४)
नं. २: अनुवाद ३२:१-१४
नं. ३: कफर्णहूमात अधिक चमत्कार (gt अध्याय २३)
नं. ४: विवाहासाठी योग्य तयारी करणे महत्त्वपूर्ण आहे (yy अध्याय १९ परि. १४-२२)
सप्टें. २८ पवित्र शास्त्र वाचन: यहोशवा १ ते ५
गीत क्र. ४० (१५)
नं. १: यहोशवा पुस्तकाची प्रस्तावना (si पृ. ४२-३ परि. १-५)
नं. २: यहोशवा १:१-११
नं. ३: येशू पृथ्वीवर का आला (gt अध्याय २४)
नं. ४: स्त्रिया व मुले यांनाही साक्षीकार्य करण्याचा हक्क आहे (td ६०ई)
ऑक्टो. ५ पवित्र शास्त्र वाचन: यहोशवा ६ ते ९
गीत क्र. १८ (११५)
नं. १: sg पृ. ४९-५१ परि. १-८
नं. २: यहोशवा ६:१२-२७
नं. ३: एका कुष्ठरोग्यास दाखविलेली सहानुभूति (gt अध्याय २५)
नं. ४: प्रणयाराधनेत कोणती वागणूक सन्माननीय ठरते? (yy अध्याय १९ परि. २३-३२)
ऑक्टो. १२ पवित्र शास्त्र वाचन: यहोशवा १० ते १३
गीत क्र. २१३ (९७)
नं. १: sg पृ. ५१-३ परि. ९-१८
नं. २: यहोशवा १०:१-१४
नं. ३: येशू पापांची क्षमा करतो व बरे करतो (gt अध्याय २६)
नं. ४: सर्व प्रकारच्या लोकांना साक्ष दिली पाहिजे (td ६०एफ)
ऑक्टो १९ पवित्र शास्त्र वाचन: यहोशवा १४ ते १७
गीत क्र. ५० (२३)
नं. १: sg पृ. ५४-६ परि. १-८
नं. २: यहोशवा १४:१-१४
नं. ३: मत्तयाचे पाचारण व मेजवानी (gt अध्याय २७)
नं. ४: विवाहाचा पूर्णानंद कसा घ्यावा (yy अध्याय २० परि. १-१८)
ऑक्टो २६ लेखी चाचणी. संपूर्ण गणना २३ ते यहोशवा १७
गीत क्र. ४२ (७)
नोव्हें. २ पवित्र शास्त्र वाचन: यहोशवा १८ ते २०
गीत क्र. २०४ (१०९)
नं. १: sg पृ. ५६-८ परि. ९-१६
नं. २: यहोशवा २०:१-९
नं. ३: उपवासाविषयी प्रश्न विचारला जातो (gt अध्याय २८)
नं. ४: साक्षीकार्य एखाद्यास रक्तदोषापासून मुक्त करते (td ६०जी)
नोव्हें ९ पवित्र शास्त्र वाचन: यहोशवा २१ ते २४
गीत क्र. १३१ (७७)
नं. १: यहोशवा—लाभदायक का? (si पृ. ४५-६ परि. २१-२४)
नं. २: यहोशवा २४:१-१५
नं. ३: शब्बाथ दिवशी चांगली कामे करणे (gt अध्याय २९)
नं. ४: तुम्हाला विवाहात कशी यशप्राप्ती मिळू शकेल (yy अध्याय २० परि. १९-२४)
नोव्हें. १६ पवित्र शास्त्र वाचन: शास्ते १ ते ४
गीत क्र. २६ (९)
नं. १: शास्ते पुस्तकाची प्रस्तावना (si पृ. ४६-७ परि. १-८)
नं. २: शास्ते २:८-२३
नं. ३: येशू आपणावर दोष लावणाऱ्यांचे खंडण करतो (gt अध्याय ३०)
नं. ४: पूर्वजांची भक्ती करणे व्यर्थ आहे (td १ए)
नोव्हें. २३ पवित्र शास्त्र वाचन: शास्ते ५ ते ७
गीत क्र. १५० (८३)
नं. १: sg पृ. ५८-६१ परि. १-१२
नं. २: शास्ते ७:७-२२
नं. ३: शब्बाथ दिवशी धान्य मोडून खाणे कायदेशीर आहे का? (gt अध्याय ३१)
नं. ४: भौतिक मालमत्तेपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असणाऱ्या गोष्टी (yy अध्याय २१ परि. १-९)
नोव्हें. ३० पवित्र शास्त्र वाचन: शास्ते ८ ते १०
गीत क्र. २०७ (११२)
नं. १: sg पृ. ६१-३ परि. १३-१८
नं. २: शास्ते ८:१३-२८
नं. ३: शब्बाथ दिवशी काय करणे कायदेशीर आहे? (gt अध्याय ३२)
नं. ४: मानवास आदर दिला जाऊ शकतो परंतु भक्ती मात्र देवाची (td १बी)
डिसें. ७ पवित्र शास्त्र वाचन: शास्ते ११ ते १४
गीत क्र. १४४ (७८)
नं. १: sg पृ. ६३-६ परि. १-१०
नं. २: शास्ते ११:२८-४०
नं. ३: यशयाचा भविष्यवाद पूर्ण करणे (gt अध्याय ३३)
नं. ४: अधिक मोलाच्या गोष्टींचा पाठलाग करणे (yy अध्याय २१ परि. १०-१५)
डिसें. १४ पवित्र शास्त्र वाचन: शास्ते १५ ते १८
गीत क्र. १९१ (८२)
नं. १: sg पृ. ६६-९ परि. ११-२२
नं. २: शास्ते १६:१८-३१
नं. ३: प्रेषितांची निवड (gt अध्याय ३४)
नं. ४: दुष्टाईचा अंत करणारे देवाचे युद्ध (td २ए)
डिसें. २१ पवित्र शास्त्र वाचन: शास्ते १९ ते २१
गीत क्र. ११ (१२)
नं. १: शास्ते—लाभदायक का? (si पृ. ५० परि. २७-२९)
नं. २: शास्ते २१:८-२५
नं. ३: अद्यापपर्यंत देण्यात आलेले प्रसिद्ध प्रवचन (gt अध्याय ३५ परि. १-६)
नं. ४: अप्रामाणिक असण्यामुळे मिळणारे दुष्परिणाम (yy अध्याय २२ परि. १-१३)
डिसें. २८ पवित्र शास्त्र वाचन: रुथ १ ते ४
गीत क्र. ५७ (२९)
नं. १: रुथ: प्रस्तावना व लाभदायक का? (si पृ. ५१-३ परि. १-३, ९, १०)
नं. २: रुथ १:७-२२
नं. ३: कोण खरे धन्य आहेत? (gt अध्याय ३५ परि. ७-१७)
नं. ४: देवाच्या अंतिम युद्धात ख्रिश्चनांची भूमिका (td २बी)
जाने. ४ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल १ ते ३
गीत क्र. १२७ (६४)
नं. १: १ शमुवेल पुस्तकाची प्रस्तावना (si पृ. ५३-४ परि. १-६)
नं. २: १ शमुवेल ३:२-१८
नं. ३: आपल्या अनुयायांसाठी उच्च दर्जा (gt अध्याय ३५ परि. १८-२७)
नं. ४: तुम्ही का प्रामाणिक असावे (yy अध्याय २२ परि. १४-२२)
जाने. ११ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल ४ ते ७
गीत क्र. ४५ (८७)
नं. १: sg पृ. ६९-७१ परि. १-८
नं. २: १ शमुवेल ७:१-१४
नं. ३: प्रार्थना व देवावर भाव (gt अध्याय ३५ परि. २८-३७)
नं. ४: दुष्ट लोकांचा नाश देवाच्या प्रेमाचा भंग करीत नाही (td २सी)
जाने. १८ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल ८ ते ११
गीत क्र. २२२ (११९)
नं. १: sg पृ. ७२-३ परि. ९-१३
नं. २: १ शमुवेल ११:१-१५
नं. ३: जीवनी मार्ग (gt अध्याय ३५ परि. ३८-४९)
नं. ४: जीवनातून सर्वोत्तम ते कसे मिळवावे (yy अध्याय २३ परि. १-११)
जाने. २५ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल १२ ते १४
गीत क्र. १५६ (१०)
नं. १: sg पृ. ७३-५ परि. १-८
नं. २: १ शमुवेल १३:१-१४
नं. ३: लष्करी अधिकाऱ्याचा मोठा विश्वास (gt अध्याय ३६)
नं. ४: बाप्तिस्मा ही एक ख्रिस्ती गरज आहे (td ३ए)
फेब्रु. १ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल १५ ते १७
गीत क्र. ८६ (४५)
नं. १: sg पृ. ७५-८ परि. ९-१७
नं. २: १ शमुवेल १५:५-२३
नं. ३: येशू एका विधवेचे दुःख दूर करतो अध्याय ३७)
नं. ४: देवास आपला मित्र बनविण्यामागील महत्त्व (yy अध्याय २३ परि. १२-२१)
फेब्रु. ८ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल १८ ते २०
गीत क्र. १४० (२४)
नं. १: sg पृ. ७८-८० परि. १-१०
नं. २: १ शमुवेल १८:१-१६
नं. ३: योहानाठायी विश्वासाची उणीव होती का? (gt अध्याय ३८)
नं. ४: बाप्तिस्मा पातके पुसून टाकीत नाही (td ३बी)
फेब्रु. १५ पवित्र शास्त्र वाचन: १ शमुवेल २१ ते २४
गीत क्र. १३८ (७१)
नं. १: sg पृ. ८०-४ परि. ११-२४
नं. २: १ शमुवेल २३:१३-२९
नं. ३: गर्विष्ठ व नम्र (gt अध्याय ३९)
नं. ४: देवाने तयार केलेल्या अद्भूत भविष्याचा कसा आनंद घ्यावा (yy अध्याय २४)
फेब्रु. २२ लेखी चाचणी. संपूर्ण यहोशवा १८ ते १ शमुवेल २४
गीत क्र. १५५ (११७)