मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ३: क्षेत्र कार्याचे केंद्र
१ मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचे ठिकाण गटाच्या अभ्यासासाठी स्थळ पुरविण्यासोबत क्षेत्र कार्याच्या सभेचे केंद्र म्हणून देखील उपयुक्त ठरू शकेल. अशा सभेची वेळ बहुतेक प्रचारकांना सोयीची असली पाहिजे व सभेत व्यावहारिक असे मार्गदर्शन देण्यात येऊन प्रचारकांना क्षेत्र सेवेसाठी संघटित होता आले पाहिजे.
२ अभ्यास तसेच क्षेत्रकार्यासाठी योग्य रुपात संघटित झालेले गट आध्यात्मिकता वाढवतात. आक्षेप कसे हाताळावेत, संभाषण कसे सुरु करावे, पवित्र शास्त्र अभ्यास कसा सादर करावा, किंवा पुनर्भेटीत काय बोलावे याविषयीचे प्रस्ताव व उत्तेजन मिळाल्यावर कोणाला आनंद वाटणार नाही? पुस्तक अभ्यास स्थळी जमणारे प्रचारक व पायनियर्स हीच मदत देत असतात.—गल. ६:९, १०.
३ चालकाची भूमिकाः मंडळीचे पुस्तक अभ्यास चालक नेतृत्व करतात व ते गटाच्या हालचाली संघटित करण्यासाठी जबाबदार असतात. ते स्वतः प्रचारकांसोबत क्षेत्रावर नियमित कार्य करतात. (१ पेत्र ५:२, ३) कार्यासाठी उत्तम तयारी करण्यात आलेल्या सभा, गटाला, क्षेत्रावरील कामासाठी शास्त्रवचनीय तसेच व्यावहारिक सूचना प्रदान करून तयार करतात. सर्व पुस्तक अभ्यास गटांनी एके ठिकाणी एकत्र मिळण्यापेक्षा प्रत्येक पुस्तक अभ्यास गटाने आपली क्षेत्रकार्याची स्वतंत्र सभा चालविणे साधारणपणे उपयुक्त ठरेल. तथापि, गरजेप्रमाणे दोन लहान गट एक करता येतील. क्षेत्रकार्यानंतर जर टेहळणी बुरुजचा अभ्यास असेल तर ही क्षेत्रकार्याची सभा त्रोटक असावयास हवी. यानंतर प्रत्येक अभ्यास चालक आपापल्या गटाची काळजी घेतील.
४ क्षेत्रकार्याची सुसंगत व्यवस्था सेवाकार्यात नियमित रुपाचा सहभाग घेण्याचे उत्तेजन देते. क्षेत्रकार्याच्या या सभा ठरविलेल्या वेळी व नियुक्त जागी झाल्यास प्रचारक तशा योजना आखतील, कारण आपल्याला तेथे कार्य करण्यास क्षेत्र असेल व सोबत इतरांशी मिळून कार्य करता येईल ही जाणीव त्यांना राहते. (पडताळा लूक १०:१.) अभ्यास चालकाला जरी उपस्थित राहता आले नाही, तरी ते क्षेत्राची तरतूद करतात व गटाची व्यवस्था करून देतात. (ओएम पृ. ४४-५) क्षेत्रकार्याची सभा चालविण्यासाठी पात्र असणारा कोणी बंधू उपलब्ध नसल्यास चालक कोणा भगिनीला ही नियुक्ती देऊ शकतील. (ओएम पृ. ७७-८; रा.से. ४/८८ पृ. ३) गट ठरविलेल्या वेळी व जागी कार्यासाठी भेटत असला तर गोंधळ टळतो. यात काही तात्कालिक बदल असल्यास तो शक्यतो एका आठवड्याआधी घोषित करण्यास हवा.
५ सहकार्याची गरजः क्षेत्र कार्याच्या विविध प्रकारात सर्वांनी अर्थभरीत सहभाग घेण्याचा यत्न राखावा. प्रचारकांनी पुढे येऊन एकमेकांसोबत मिळून सरावाची तालीम करावी व यात खऱ्या आक्षेपांचा आणि स्थानिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा वापर करावा.—नीती. २७:१७.
६ शिष्य बनविण्याच्या कामी अधिक कुशल व्हावे यासाठी तुम्हाला कोणा अनुभवी प्रचारकाकडून मदत मिळविण्याची इच्छा आहे का? तर तुमच्या पुस्तक अभ्यास चालकांसोबत याबद्दल बोला. ते तुम्हासाठी कोणा अनुभवी प्रचारकाला नेमणूक देऊ शकतील. मिळालेले प्रस्ताव व नियोजित भेटी यांचे पालन केले तर त्याद्वारे तुम्हाला लाभ मिळेल.
७ ज्यांना पुस्तक अभ्यास चालकांकडून मदत देण्याची नेमणूक मिळाली आहे अशांनी आपल्या अपेक्षेबद्दल व्यवहार्य व साहाय्यक असले पाहिजे. ज्यांचा क्षेत्रकार्याविषयी सरळ व समतोल दृष्टीकोण आहे व ज्यांचा पवित्रा व्यवहार्य आहे असेच बांधव इतरांना तालीम देऊ शकतील हे अनुभवाने दाखवले आहे. (रा.से. ८/७९ पृ. ३-४; रा.से. ९/७९ पृ. ३-४) प्रगति दाखवली जाते तेथे नेहमी प्रशंसा केली गेली पाहिजे. मग, दुसरे ध्येय प्रगतिसाठी देता येईल.—पडताळा लूक १९:१७-१९.
८ सुवार्तेचा प्रचार तसेच शिष्य बनविण्याच्या कामात प्रभावी होण्यासाठी आम्हाला एकमेकांना मदत केली पाहिजे. जगाची अधिक खालावत चाललेली स्थिती या कामाची निकड प्रकर्षाने दाखविते. यात जीवने गोवलेली आहेत. यहोवा एकत्रीकरणाचे काम त्वरेने करीत आहे. (यशया ६०:२२) आम्ही आम्हाला सोपवलेले सेवाकार्य ध्यानात ठेवल्यास, आमच्या पुस्तक अभ्यास चालकांशी सहकार्य करून आमची नेमणूक पूर्ण तऱ्हेने पार पाडता येईल व सोबत एकमेकांना उत्तेजन तसेच प्रोत्साहन देता येईल.—रोम. १२:६-८; २ तीम. ४:१, २, ५.