सुवार्ता सादरता
थेट पवित्रा घेऊन अभ्यास सुरु करणे
१ येशूने आम्हाला “शिष्य करा” अशी आज्ञा दिली. (मत्तय २८:१९) हे पूर्ण करण्यासाठी आस्थेवाईक लोकांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करणे आवश्यक आहे. घरोघरच्या सेवकपणात आपण पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी थेट पवित्रा घेऊन हे जलदपणे साध्य करू शकतो. यामुळे भेट घेण्यामागील आमचा प्रमुख उद्देश तो काय, हे लोकांना कळून येते.
२ पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी थेट पवित्रा घेताना आपण काय म्हणू शकतो? अगदी साधा पवित्रा सर्वोत्तम ठरू शकेल. आपल्याला असे म्हणता येईलः “लोकांना पवित्र शास्त्राची समज देण्यामध्ये मदत करण्यासाठी आम्ही आस्थेवाईक आहोत. तेव्हा तुम्ही व तुमच्या कौटुंबिक सदस्यांबरोबर हा अभ्यास कोणतेही मूल्य न घेता तसेच बंधन न टाकता घेण्यास आम्हाला नक्कीच आवडेल. आपल्याला तुमचे पवित्र शास्त्र वापरता येईल. तुम्हापाशी नसल्यास मी तुमच्यासाठी एक आणून देऊ शकेन.”
३ दुसरा एक पवित्र असा ठरू शकेलः “आज आमचा भेट देण्यामागील उद्देश घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचे प्रोत्साहन देणे असा आहे. यामुळे तुम्हाला, हे जग कोठे चालले आहे व देवाने आम्हासाठी काय राखून ठेवले आहे याची समज मिळू शकेल. तुमच्या पवित्र शास्त्रातून अधिक ते कसे संपादन करता येईल ते मला तुम्हाला दाखवण्यास आवडेल. यासाठी तुम्हाला कोणतेही मूल्य द्यावे लागणार नाही की, कोणतेही बंधन राहणार नाही.” घरमालकाने कबुली दर्शविल्यास तुम्हाला शांतीदायक नवीन जगातील जीवन ही हस्तपत्रिका किंवा क्रिएशन पुस्तकातील पृष्ठ २३४ मधील ६व्या परिच्छेदाचा वापर करून त्यांना प्रात्यक्षिक दाखवता येईल. त्या अध्यायातील पहिले परिच्छेद यहोवाने नंदनवनाची पुनर्स्थापना करण्यासाठी दिलेल्या अभिवचनांना ठळकपणे मांडतात.
४ पवित्र शास्त्रीय हस्तपत्रिकांचा उपयोग कराः थेट पवित्रा घेण्यामध्ये हस्तपत्रिका खूप साहाय्यक ठरतात असे पुष्कळांना आढळले आहे. घरमालकाने दार उघडल्यावर त्याला शांतीदायक नवीन जगातील जीवन ही हस्तपत्रिका उघडी करून हातात द्या म्हणजे ते संपूर्ण चित्र पाहू शकतील. हस्तपत्रिकेची दुसरी प्रत आपल्या हाती घेऊन पहिल्या दोन परिच्छेदात जे प्रश्न दिले आहेत ते वाचा किंवा त्याचा गोषवारा सांगा. त्यांच्या उत्तरांची चर्चा करा व त्याला पाठबळ देणारी एक किंवा दोन शास्त्रवचने काढून वाचा. मग, तुम्हाला या चर्चेचा आनंद वाटला असे सांगा व परत भेट घेण्याची व्यवस्था आखा. आमचा मोफत पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याचा कार्यक्रम त्याला थोडक्यात सांगा. दुसऱ्या वेळी परत येऊन हस्तपत्रिकेतील पुढच्या मुद्यांची चर्चा करणार हे सांगा.
५ परत येत आहोत हे सांगताना, तुम्हाला घरमालकाला कोणती गोष्ट मनोरंजक वाटेल असे वाटते त्याचा उल्लेख करणे चांगले असेल. हे कदाचित प्रश्नरुपात सादर केले जाऊ शकते. यामुळे घरमालक पुढील भेटीत जेव्हा तो प्रश्न हाताळला जाईल त्याची वाट पाहात राहील.
६ क्रिएशन पुस्तक हे कित्येक बाबतीत अपूर्व आहे. ते देवाच्या अस्तित्वाबद्दल सबळ पुरावा दाखविते. उत्क्रांती का खरी असू शकत नाही, हेही ते दाखविते. आम्ही पवित्र शास्त्रावर देवाचे वचन या अर्थी का भाव ठेवू शकतो हे सुद्धा ते दाखवते. १८ व १९ अध्यायातील चित्रे प्रामाणिक अंतःकरणी घरमालकाचे लक्ष आकर्षून घेतील, त्यांची पवित्र शास्त्र आणि देवाचे उद्देश यावर आस्था जागृत करतील. यास्तव, आपण अभ्यास सुरु करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेऊन “शिष्य करा” या आज्ञेत सहभागी होऊ या.—मत्तय २४:१४; २८:१९, २०; मार्क १३:१०.