सध्याच्या घटनांच्या अभूतपूर्वतेची आवड धरणे
१ “या जगाचे दृश्य बदलत आहे.” (१ करिंथ. ७:३१, न्यू.व.) हेच सध्या जलद गतीने घडणाऱ्या घटनांमध्ये दिसून येते. पण, यहोवाच्या संस्थेमध्ये जे सर्व घडते आहे त्याचा तुम्हासाठी व्यक्तीशः काय अर्थ होतो?—लूक २१:२८.
२ या २०व्या शतकात पवित्र शास्त्र भविष्यवादांची होणारी पूर्णता, हे सबंध दुष्ट व्यवस्थीकरण आपल्या शेवटल्या दिवसात जगत आहे याची पुष्टी देते. (मत्तय २४:३-१४; लूक २१:७-११) येशूने म्हटलेः “सर्व गोष्टी पूर्ण होत तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.” (लूक २१:३२) तर मग, तुमच्या क्षेत्रात ज्या लोकांनी यहोवाच्या बाजूला अजून आपली भूमिका ग्रहण केली नाही अशांसाठी याचा काय अर्थ होतो याची तुम्ही कधी कदर केली का? केलीच तर याद्वारे तुमच्या क्षेत्र कार्यावर कोणता परिणाम झाल्याचे दिसून येईल?—लूक २१:३४-३६.
३ वेळ आहे तोपर्यंत इतरांना मदत देत राहा: अनुकूल परिस्थितीचा लाभ सुवार्ता कळविण्यासाठी करावा असे येशूने त्याच्या शिष्यांना आर्जविले. (योहान ९:४) प्रेषित पौलाने जेव्हा कलस्सैतील मंडळीतील बांधवांना आर्जविले तेव्हा देखील त्याच्या बोलण्यात हाच सूर होता. तो म्हणालाः “बाहेरच्या लोकांबरोबर सूज्ञतेने वागा. संधि साधून घ्या.”—कलस्सै. ४:५.
४ काहींनी, संधि साधावी या प्रेषिताच्या सल्ल्याकडे कान देऊन नियमित पायनियरींग स्वीकारली. अद्याप शाळेत असताना काही युवकांनीही नियमित पायनियरींग सुरु केली व त्यांना यात चांगले यश मिळाले आहे. शाळेतील युवक संधि साधून आपल्या वर्गमित्रांना आज जे घडत आहे त्याची अर्थसूचकता तसेच पुढे, देवाच्या राज्यामध्ये जी भविष्याची तेजोमय आशा आहे त्याबद्दल सांगून मदत करू शकतात.—उप. १२:१.
५ नोव्हेंबर महिन्यात क्षेत्र कार्य करीत असता आपण प्रत्येक संधिला अवेक! मासिक सादर करण्याचा प्रयत्न करू. हे प्रकाशन सध्याच्या घडामोडींबद्दल चांगली अंतर्दृष्टी देते. घरोघरचे कार्य करीत असता ते सर्वांना सादर करा. तसेच तुमच्या वर्गमित्रांना आणि जेथे तुम्ही काम करता तेथेही सादर करण्यात पुढाकार घ्या. तुम्हाला माहीत असलेल्या लोकांना जो विषय आस्थेचा वाटेल असे वाटते तो त्यांच्यापुढे ठळकपणे मांडा. उदाहरणार्थ, अवेक! मासिकाच्या ऑक्टोबर ८, १९९१ अंकात मुलांना जी वाईट वागणूक दिली जाते त्याबद्दल चर्चा आहे. हा विषय पुष्कळ लोकांना चिंतेचा वाटतो.
६ सध्याच्या संभाषणाच्या विषयाचा कसा उपयोग करता येईल? आपली ओळख दिल्यावर तुम्हाला घरमालकाला हे विचारता येईलः “आज आपल्याला एवढ्या त्रस्त परिस्थितीचा सामना का द्यावा लागत आहे बरे?” त्यांनी आपला प्रतिसाद व्यक्त केल्यावर तुम्ही पुढे म्हणू शकताः “पवित्र शास्त्र दाखवते की, पुष्कळांच्या बाबतीत जीवन हे निराशमय बनले आहे. पहा, येथे उपदेशक २:१७ मध्ये काय म्हटले आहे. [वाचा.] तुम्ही याजशी सहमत आहात का? [प्रतिसादास वाव द्या.] ज्यांना कित्येक समस्यांचा सामना करावा लागत आहे अशांना कोणती गोष्ट समाधान देऊ शकेल असे तुम्हास वाटते? [विवेचनास वाव द्या.] तर हे दुसरे शास्त्रवचन आहे जे आम्हाला जीवनाचा सकारात्मक दृष्टीकोण देते. [वाचा स्तोत्रसंहिता ३७:३९, ४०.] याच कारणास्तव यहोवाचे साक्षीदार लोकांना पवित्र शास्त्र अभ्यास करण्याचे प्रोत्साहन देतात. उदाहरणार्थ, आमच्या या अवेक!च्या अलिकडच्या अंकात कोणत्या विषयाचा विचार केलेला आहे ते बघा.” मग, त्यांना वार्षिक वर्गणी सादर करा. वर्गणी नाकारल्यास दोन मासिके देण्याचा प्रयत्न करा.
७ हा यहोवाची सेवा करण्याचा थरारक काळ आहे यात काही संशय नाही. या गोष्टीमुळे आपल्याला या महिन्यात मिळणाऱ्या सुसंधींचा चांगला उपयोग करण्याचे व त्याद्वारे अधिकाधिक प्रांजळ लोकांना सध्याच्या घटनांचा खरा अर्थ समजाविण्याची मदत करण्याची चालना आम्हाला मिळो.