आमची राज्य सेवा नवा आकार घेते
या ऑक्टोबरपासून आमची राज्य सेवा नवा आकार घेत आहे. हे मासिक प्रकाशन, विविध भाषांत प्रकाशित करण्यामध्ये कामाचा उरक सुलभ करण्यात तसेच वाचकाला विशिष्ट माहिती शोधून काढण्यात ही नवी रचना साहाय्यक ठरेल.
या नव्या रचनेमुळे यातील सर्व शीर्षके आणि मजकूर संगणकाद्वारे निर्मिला जाऊ शकतो. रचनेमध्ये अधिक सुसंगतपणा राहील की, ज्यामुळे आमची राज्य सेवा हिचे एकंदर स्वरुप अधिक उजळलेले दिसेल.
वाचकांसाठी पुष्कळ सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. अक्षरांचा आकार सुसंगत ठेवण्यात आला आहे आणि मजकुरासाठी निवडलेले अक्षराचे स्वरुप, लहान आकारात देखील वाचण्यास सुवाच्य आहे. क्षेत्रकार्याचा अहवाल वाचण्यास सुलभ राहील. तसेच प्रमुख लेख साधारणपणे बाहेरील पानांवर राहतील आणि बहुतेक सर्व लेख त्याच पानावर पूर्ण करण्यात येतील. सेवा सभेचा कार्यक्रम, मंडळीच्या पुस्तक अभ्यासाचा कार्यक्रम, सेवाकार्याचा अहवाल, घोषणा, ईश्वरशासित वृत्त, क्षेत्र कार्यासाठी सभा, संभाषणाचा विषय आणि प्रश्न पेटी ही सदरे आतील पानांवर असतील.
हे महत्त्वपूर्ण साधन तुम्हाला अधिक आकर्षक वाटेल आणि सुवार्ता प्रचाराच्या व शिष्य बनविण्याच्या कामात एक प्रभावी साधन ठरेल अशी आम्ही आशा करतो.