वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९१ पृ. ३
  • जबाबदारीचा आमचा भार स्वतः वाहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जबाबदारीचा आमचा भार स्वतः वाहणे
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • देवाचे वचन स्वीकारणे, त्याचा अवलंब करणे व लाभ मिळवून घेणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९७
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ११/९१ पृ. ३

जबाबदारीचा आमचा भार स्वतः वाहणे

१ जबाबदारी म्हटली की आज लोकांना मोठा भार वाटतो. त्यामुळे बरेच लोक आपले अंग काढून घेतात. याचा परिणाम हा दिसतो की, पती पत्नींचा त्याग करतात, आई आपल्या मुलांना सोडून देते, युवक शाळा सोडतात आणि नागरिक कर चुकवतात. अशा प्रकारे बेजबाबदार कृत्यांची ही यादी वाढतच जाते. तथापि, जबाबदार माणूस हा भरवसापात्र असतो व तो आपल्या वागणूकीबद्दल जाब देण्यास इच्छुक राहतो. या कारणामुळे देवाचे वचन ख्रिस्ती लोकांबद्दल स्पष्टपणे सांगते की, “प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे.” (गल. ६:५) तर मग, १९९२ सेवा वर्षातील विभागीय संमेलनाचे शीर्षक “जबाबदारीचा आमचा भार स्वतः वाहणे” किती योग्य आहे! ही मालिका जानेवारी १९९२ पासून सुरु होईल. आम्ही सर्वांनी उपस्थित राहण्याची निश्‍चित तयारी केली पाहिजे.

२ भाषणे, अभिनय, प्रात्यक्षिके, अनुभव व मुलाखती याद्वारे विभागीय संमेलनाचा सुंदर कार्यक्रम, ख्रिस्ती या नात्याने आम्हावर ज्या विविध जबाबदाऱ्‍या आहेत त्या स्पष्ट रुपात दाखवील. शनिवार दुपारच्या कार्यक्रमात चार भागाचा एक परिसंवाद आहे, ज्यात आम्हाला आपल्या जबाबदाऱ्‍यांपासून कसा आनंद मिळू शकेल व त्यांची कशी काळजी घेता येईल हे स्पष्ट केले जाईल. आमच्या तरुणांवर देखील जबाबदारी आहे आणि शनिवार दुपारच्या कार्यक्रमातील विभागीय देखरेख्यांचे भाषण हे खासपणे त्यांना उद्देशून असेल. याशिवाय नव्यानेच समर्पित झालेल्यांचा बाप्तिस्मा देखील शनिवारीच होईल. जे या विभागीय संमेलनात बाप्तिस्मा घेण्याची योजना आखीत आहेत अशांनी आपल्या अध्यक्षीय देखरेख्यांना हे आधी कळवावे म्हणजे आवश्‍यक ती तयारी पूर्ण करता येईल.

३ रविवारी सकाळच्या कार्यक्रमात आणखी एक चार भागांचा परिसंवाद आहे व तो आमच्या प्रचार करण्याच्या ख्रिस्ती जबाबदारीस अनुलक्षून आहे. रविवारी दुपारी, “देवाचे नवे जग—त्यामध्ये जाण्यास कोण लायक आहे?” हे जाहीर भाषण प्रांतिय देखरेखे देतील. नवीन आस्थेवाईक लोकांना हे भाषण ऐकण्याकरता येण्याचे निमंत्रण आधीच देऊन ठेवा.

४ आम्ही आपापल्या योजना आखून या दोन दिवसांच्या भरपूर कार्यक्रमास उपस्थित राहून त्याचा पूर्णपणे लाभ घेऊ या. तुमच्या मंडळीसाठी हे विभागीय संमेलन कोठे व केव्हा होईल त्याची माहिती तुमचे विभागीय देखरेखे तुम्हाला कळवतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा