शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
ऑगस्ट ५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७३ (४५)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. या शनिवारच्या मासिक कार्यामध्ये वापरता येतील अशा अलिकडच्या मासिकतील लेख दाखवा.
१५ मि: “व्हिजिटिंग ए पेशन्ट—हाव टू हेल्प.” अवेक! मासिकाच्या मार्च ८, १९९१ च्या अंकातील साहित्यावर भाषण. वयोवृद्ध, अपंग तसेच घरी असलेल्यांना भेट देण्यासंबंधाने मंडळीने जी योजना आखली आहे त्याविषयीची माहिती द्या. पृष्ठ ११ वरील ४थ्या परिच्छेदात सुव्यवस्थित पेहरावाविषयी जी माहिती आहे त्यावर जोर द्या. (प्रादेशिक: रा.से.१२/८८ पृ. १)
२० मि: “आपल्या सेवकपणात धीर दाखवा व पारंगत असा.” लेखाची प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. जेथे वारंवार क्षेत्र उरकले जाते अशा ठिकाणी धीर दाखविण्याविषयी जोर द्या. सहाव्या परिच्छेदाच्या चर्चेनंतर, “पाहा!” माहितीपत्रक सादर करताना संभाषणाचा विषय कसा सांगावा याविषयी एका प्रचारकाला प्रात्यक्षिक करू द्या.
गीत १५६ (१०) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६२ (८९)
१० मिः स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. ईश्वरशासित वृत्त. मंडळीला सप्ताहाच्या शेवटाला योजलेल्या क्षेत्रकार्याची माहिती द्या.
१५ मिः “पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा—भाग १.” सेवा देखरेख्यांद्वारे प्रश्नोत्तरे. प्रमुख शास्त्रवचने वाचण्यासाठी आधीच नेमून द्या आणि त्यांचा स्थानिक व्यावहारिक अवलंब स्पष्ट करा. पाच भागाच्या मालिकेविषयी आस्था जागृत करा.
२० मिः पूर्ण वेळेची सेवा—देवासमागमे चालण्याची उत्तम संधि. (मीखा ६:८) प्रशिक्षित वडील किंवा शक्यतो पूर्ण वेळेची सेवा करणारा उपाध्य सेवक उबदार व उत्तेजन देणारे भाषण देतो. (पहा मे १५, १९८९ वॉचटावर, पृष्ठे २१-३.) (प्रादेशिक: रा.से.८/८९ पृ. १-२; ११/८९ पृ. १-२) मंडळीतील प्रचारकांना आपल्या परिस्थितीनुसार पूर्ण वेळेचे कार्य हाती घेण्याचा गंभीरपणे विचार करता यावा यासाठी व्यावहारिक प्रस्ताव सादर करा. दोन किंवा तीन पायनियरांची मुलाखत घ्या व पूर्ण वेळेच्या कार्याद्वारे मिळणारे पुष्कळ लाभ सांगा. नवे कार्य वर्ष, सुरवात करण्यासाठी चांगली वेळ आहे. जे सप्टेंबर १, १९९१ पासून सुरवात करतील अशांना पुढल्या पायनियर सर्विस स्कूलला जाण्याचे पात्र ठरता येईल.
गीत २०४ (१०९) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ३२ (८१)
१० मिः स्थानिक घोषणा. मंडळीच्या अलिकडील क्षेत्र कार्याच्या अहवालातील ठळक गोष्टींची चर्चा करा. क्षेत्रात जे साध्य करण्यात आले आहे त्याविषयी प्रचारकांची प्रशंसा करा.
२० मिः “सुवार्ता सादरता—सूक्ष्मदृष्टीने.” प्रश्नोत्तराद्वारे हाताळणी. ५ व्या परिच्छेदातील मुद्यांचे प्रात्यक्षिक दाखवा. एका कुशल प्रचारकाला हे दाखवू द्या की, आरंभाला वाद घालणाऱ्या घरमालकाला चतुरपणे प्रश्न विचारून व त्या विषयावर पवित्र शास्त्र काय म्हणते ते दाखवून विषयाची हाताळणी कशी करता येते. या प्रात्यक्षिकाची चांगली तयारी व्हावी.
१५ मिः मला कसे सत्य मिळाले. अनुभव. वडील दोघा किंवा तिघांची मुलाखत घेतात. देवाचे वचन व संस्था याजमुळे ते कसे समर्पण व बाप्तिस्म्यापर्यंत गेले यावर लक्ष केंद्रित करा. सत्यात असण्यामुळे त्यांना जे लाभ अनुभवण्यास मिळत आहेत त्यावर जोर द्या.
गीत ६७ (३८) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २१० (३१)
१५ मिः वडील किंवा उपाध्य सेवक स्थानिक घोषणांची हाताळणी करतात. उपलब्ध असलेल्या माहितीपत्रकातून कोणते बोलके मुद्दे सांगता येतात ते सभागृहाला सांगू द्या. संभाषणाच्या विषयाला जुळणारे, तसेच घरमालकाला माहितीपत्रकाचे वाचन करण्याची उत्कंठा वाढविणारे मुद्दे निवडून घ्या. माहितीपत्रकाची सादरता करण्याकडे कसे जाता येते व कोणता बोलका मुद्दा सांगता येतो त्याचे छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.
१८ मिः “मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था—भाग १.” अनुभवी वडील मंडळीचे पुस्तक अभ्यास चालक असणाऱ्या दुसऱ्या दोघा वडील किंवा उपाध्य सेवकांशी चर्चा करतात. स्थानिक मंडळीची जी गरज असेल त्याप्रमाणे, जसे की, स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, आणि शिकलेल्या गोष्टींचा व्यावहारिक अवलंब करणे यासारख्या दोन-तीन गोष्टींवर भर द्या.
१२ मिः स्थानिक गरजा. मंडळीला ज्याविषयी साहाय्य देण्याची गरज आहे असे वडीलांना वाटते त्यांचा विचार करा. गेल्या विभागीय देखरेख्यांच्या भेटीत जे मुद्दे लक्षात आणले गेले होते त्याच्या शास्त्रवचनीय कारणांविषयी विचार व्हावा.
गीत ४२ (१८) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ५६ (३७)
१५ मिः स्थानिक घोषणा आणि प्रश्न पेटीची हाताळणी. माहितीपत्रके वितरीत करणे व पवित्र शास्त्र अभ्यास मिळविण्याविषयीचे अनुभव विचारा.
१५ मिः “पुनर्भेटीकडे लक्ष देणे.” गेल्या सहा महिन्यात मंडळीने पुनर्भेटीविषयी काय काम केले त्याबद्दल सेवा देखरेखे परिक्षण करतात. आस्थेवाईक लोकांकडे जाऊन पुन्हा भेट देण्याबद्दलच्या काय नियमित योजना आहेत? या महत्त्वपूर्ण कार्यहालचालीसंबंधाने आणखी काही सुधारणा कशा करता येणे शक्य आहेत?
१५ मिः “प्रिव्हेंटिंग द रिटर्न ऑफ बॅड हॅबीट्स्.” अवेक! च्या एप्रिल ८, १९९१ मधील लेखाची चर्चा. (प्रादेशिक: “नैतिक शुद्धता ही युवकांचे रुपसौंदर्य आहे.” मे १, १९९० टेहळणी बुरुज.)
गीत १३२ (७०) व समाप्तीची प्रार्थना.