पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
भाग १: यहोवाविषयी आवड बाळगण्याचे मोल
१ यहोवाबद्दल व त्याने केलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला गाढ आवड असली म्हणजे यातून पूर्ण जिवाचे क्षेत्र कार्य होते. (२ शमु. २२:२, ३) देवापासून दूर गेलेल्या मानवजातीची दयनीय स्थिती बघून आम्हाला आमच्या सेवेत झटून काम करण्याचे उत्तेजन मिळाले पाहिजे. (मत्तय ९:३६; २ करिंथ. ५:१४, १५) यहोवाला आपण जितकी अधिक निष्ठा दाखवू, लोकांविषयी जितकी अधिक तळमळ राखू, तितक्या अधिकपणे आम्हाला क्षेत्र सेवेत अधिक उत्साहाने सहभागी होण्याचे स्फुरण मिळेल. (मत्तय २२:३७-३९) मग, आमचे सेवकपण एका मोलवान खजिन्यासारखे होईल. (२ करिंथ. ४:७) पण, सेवेविषयीची ही आवड आम्हाला कशी निर्माण करता येईल?
आवड वाढविण्याचे मार्ग
२ व्यक्तीगत तसेच मंडळीचा पवित्र शास्त्र अभ्यास व शिवाय प्रार्थनापूर्वकतेने केलेले मनन यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध उभारण्यात आमची मदत करते. आम्हास त्याच्याठायी असणारे गुण तसेच त्याचे व्यक्तीमत्व यामागील सुंदरता जाणवू लागते. तुम्ही पवित्र शास्त्र वाचनाचा साप्ताहिक आराखडा अनुसरीत आहात का? संस्थेच्या प्रकाशनांचे वाचन करण्यासाठी तुम्ही नियमितपणे वेळ देत आहात का? तुम्ही मंडळीच्या सर्व सभांची तयारी करून, त्यांना उपस्थित राहून त्यामध्ये भाग घेता का? (इब्री. १०:२४, २५) व्यक्तीगत अभ्यासात व तो झाल्यानंतर दर वेळी केलेले उद्देशपूर्ण चिंतन आमच्या उबदार-अंतःकरणी देवाबद्दल व त्याने खऱ्या भक्तीविषयी केलेल्या व्यवस्थेविषयी आमची अंतःकरणाची आवड उभारील.—स्तोत्र. २७:४.
३ देवाच्या इतर पूर्णजिवी सेवकांचे उदाहरण जवळून विचारात घेतल्यावर देखील आमच्या आवडीचे परिमाण वाढू शकते. यिर्मया संदेष्ट्याला जे काम सोपविण्यात आले होते त्याच्या दाहकतेमध्ये तो भारावून निघाला. (यिर्मया २०:९) येशूनेही आवड व्यक्त करणारा आत्मा तसेच आवेश यांचे प्रदर्शन केले. (योहान ४:३४) प्रेषित पौलाने सेवकपणात परिश्रमाने काम करून त्याला दाखविण्यात आलेल्या ईश्वरी दयेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. (१ तीम. १:१२, १३, १७) या तसेच आधुनिक काळच्या उदाहरणांचा आपण विचार करू तेव्हा आपल्यामध्ये देखील आवड उभारली जाईल व तिजमुळे आपले सेवकपण पूर्ण जिवाचे होईल.
४ आपल्याला यहोवाच्या वैभवाचा दैदिप्यमानपणा शिकायला मिळेल व त्याच्या महत्कृत्यांविषयी मनन करू तेव्हा त्याची थोरवी घोषित करण्यास व त्याची स्तुति आनंदाने करण्यास चालना येईल. (स्तोत्र. १४५:५-७) राज्य संदेशाला प्रसारीत करण्याचे विविध मार्ग उत्साहाने शोधत राहून आम्ही ईश्वरी नामाची साक्ष देण्याच्या कामाला किती मोलवान समजतो ते दाखवून देता येईल.—लूक ६:४५.
५ पण, या सेवकपणात पूर्ण जिवानिशी सहभागी होण्यासाठी चालना देऊ शकणारे आणखी काही आहे का? जर आहे, तर ते काय आहे? याबाबतीत वडील, उपाध्य सेवक, पायनियर्स, आणि इतर अनुभवी प्रचारकांना कशी मदत देता येईल? उत्साह वाढविण्यात ध्येये कोणता कार्यभाग पूर्ण करतात? कोणत्या लाभांची अपेक्षा धरता येईल? ह्या तसेच इतर प्रश्नांची उत्तरे या पाच भागांच्या लेखमालिकेत येणाऱ्या आमची राज्य सेवा याच्या अंकातून दिली जातील.