प्रश्न पेटी
● ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत विद्यार्थ्याला बहुधा केव्हा नेमणूका मिळाल्या पाहिजेत?
ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेचा प्रमुख उद्देश हा आहे की, जाहीर वक्त्यांची वाढ करावी. यासाठीच ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेतील आराखड्यात बहुतेक भाषणे बंधूंनाच नेमून दिली जातात.
तथापि, शाळेचा आणखी एक महत्त्वपूर्ण उद्देश असा की, यहोवाच्या सर्व लोकांना ख्रिस्ती सेवकपणाकरता प्रभावी प्रचारक व शिक्षक असे तयार करावे. या कारणास्तव भगिनींनी देखील या शाळेत आपले नाव दाखल करावे हे योग्यच आहे.
शाळेचा पूर्णपणे लाभ मिळविण्यासाठी, ज्यांचे नाव दाखल झाले आहे अशांना नियमित रुपाने विद्यार्थी भाषणाची नेमणूक मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर तीन महिन्यातून एकदा तरी ही नेमणूक मिळावी असे सुचविले जाते. स्थानिक परिस्थिती मुभा देत असल्यास बंधूंना अधिक नेमणूका दिल्या जाऊ शकतात. नियमित रुपाने बोधप्रद भाषण देणाऱ्या आणि पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्दे मांडणाऱ्या वडीलांना विद्यार्थी भाषणाची नेमणूक देणे जरुरीचे नाही.
जवळ जवळ गेल्या अर्ध शतकात ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेने लाखो लोकांना आध्यात्मिक प्रगति करण्यामध्ये आणि राज्याचा संदेश सादर करताना स्वतःचे वक्तव्य केवढ्या चांगल्या प्रकाराने करावे याची तालीम दिली आहे. यहोवा देवाकडील या अद्भुत तरतुदीचा सर्वांनी पूर्ण रुपाचा लाभ घ्यावा याचे सर्वांना उत्तेजन दिले जात आहे. आमचे ध्येय हे असावे की, आम्ही देवाच्या पसंतीस उतरलेले, ‘लाज वाटण्यास कसलेही कारण नसणारे व सत्याचे वचन नीट सांगणारे’ कामकरी असे स्वतःला सादर करावे.—२ तीमथ्य २:१५.