क्षेर्त्रकार्यात असताना दुसऱ्यांची मदत करणे
१ अगदी सुरवातीपासूनच ख्रिस्ती मंडळी ही सुवार्तिकांची संघटना होती. येशूने स्वतःच आपल्या शिष्यांना व्यक्तीगतपणे प्रचार कार्याची तालीम दिली आणि त्याने “त्यांना दोघे दोघे असे” पाठविले. (मार्क ६:७; लूक ८:१) फिलिप्पैच्या मंडळीतील आपल्या ‘सहकाऱ्यां’चा पौलाने उल्लेख केला व म्हटले की, त्यांनी त्याजबरोबर “सुवार्तेच्या कामी . . . श्रम केले” होते. (फिलिप्पै ४:३) क्षेत्रसेवेत नेहमीच सोबती असण्याची तितकी गरज नसली तरी आपण कोणाबरोबर कार्य करावे असे आपल्याला वाटत असते. (उप. ४:९) तर मग, प्रचार करताना आपण एकमेकांना कसे उत्तेजनात्मक व साहाय्यक कसे होऊ शकतो?
२ नव्या तसेच कमी अनुभव असणाऱ्या प्रचारकांना साहाय्य देणे हा क्षेत्रकार्याच्या सभेमागील उद्देश असतो. (ओएम पृ. ७७, ९७) नव्यानेच नियुक्त करण्यात आलेल्या पायनियरांना अधिक अनुभवी प्रचारक किंवा कोणा वडील वा उपाध्य सेवकांसोबत काम करण्याची इच्छा असते. तर ही, ‘उभयतांना उत्तेजन देण्याची’ किती चांगली संधी आहे बरे!—रोम. १:१२.
३ काही क्षेत्रामध्ये प्रचारकांनी एकत्र राहून कार्य करावे हे सुरक्षिततेचे आहे. किंवा कधी कधी आपल्या पूर्वीच्या योजनेत बदल करून प्रचारास आलेल्या व प्रचाराच्या सभेला उपस्थित असलेल्या कोणा कमअनुभवी प्रचारकाला आपल्यासोबत नेण्याची गरज पडते. आम्हाला ही मदत देण्याचे सांगण्यात आले तर कोणा विशिष्ट सोबत्याबरोबर काम करण्याचा आमचा प्रघात असला तरीही “दुर्बळांना साहाय्य करण्याचे” उद्दिष्ट राखून ती करणे खरोखरीच कृपायुक्त असणार.—प्रे. कृत्ये २०:३५.
सुसंघटीतपणे काम करा
४ क्षेत्रामध्ये इतरांसोबत असताना आम्ही आपली सुसंघटीत मांडणी करावी. (पडताळा १ करिंथकर ३:६, ९.) एकेका घरात एकेकाने बोलून दोघाही जणांना साक्ष देण्यात सहभागी होता येईल. आमच्या जोडीला असणारा आमचा बांधव दरवाज्यावर बोलत असता आम्ही आदराने व लक्ष देऊन ऐकणे हा चांगला शिष्टाचार ठरतो.
५ आमचा सोबती बोलत असताना चर्चेत सहभागी होणे हे कधी कधी चांगले दिसत असले तरी याला योग्य न्याय हवा असतो. घरमालक जेव्हा चांगला परिणाम मनात राखून आपली बाजू मांडत असतो त्यावेळी मध्येच बोलणे बरे दिसणार नाही. अर्थातच, कमअनुभवी प्रचारकाला एखादा आक्षेप हाताळण्यात त्रास होत असल्याचे दिसत आहे तेव्हा तो चांगले मार्गदर्शन घेण्याची निश्चितच आवड राखणार.—उप. ४:१२.
६ दोन घरांमधील अंतर जात असताना आपण तो वेळ आमची सादरता कशाप्रकाराने अधिक सुधारीत करता येईल याविषयी बोलू शकतो. कदाचित, रिझनिंग पुस्तकातील एखादी प्रस्तावना किंवा आमची राज्य सेवा यात दाखविलेला प्रस्ताव अधिक सुधारणा करू शकेल. दोघे मिळून एकत्र काम केल्यामुळे एकमेकांची चांगली ओळख करून घेण्यात तसेच आमच्या ख्रिस्ती बंधुत्वाचे बंध अधिक बळकट करण्यात हातभार मिळतो.
७ आमची सेवा हा खराच बहुमोल ठेवा आहे. (२ करिंथ ४:१, ७) क्षेत्रकार्यात इतरांबरोबर मिळून कार्य करण्याची संधी मिळाल्यावर आपल्या पवित्र कार्याविषयीची खोल रसिकता उभारण्यात एकमेकांना साहाय्य देता येईल. याचा परिणाम वाढता आनंद, साक्षी देण्यात अधिक प्रभावीपणा, आणि आमच्या बंधुभगिनींच्या ऐक्याची समाधानकारक भावना यामध्ये दिसतो.—स्तोत्र. १३३:१.