क्षेत्र सेवेत पवित्र शास्त्राचा उपयोग करा
१ पवित्र शास्त्रातील प्रेरित वचने लोकांवर प्रभावशाली परिणाम घडवून आणू शकतात. या कारणास्तव, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी सुवार्तेची घोषणा करताना शास्त्रवचनांचा उपयोग केला. पौलाने शास्त्रवचनातून ‘विवाद करून’ आपले मुद्दे संदर्भाने स्पष्ट व सिद्ध केले. (प्रे. कृत्ये १७:२, ३) अपुल्लोसने यहुद्यांना साक्ष देताना “येशू हाच ख्रिस्त आहे असे त्याने शास्त्रावरून” स्पष्ट केले.—प्रे. कृत्ये १८:२४-२८.
२ यहोवाचे साक्षीदार या उदाहरणाचे अनुकरण करतात. मार्च १, १९८६ च्या वॉचटावरमध्ये पृष्ठ २६वर सांगितल्याप्रमाणेः “जाहीर सेवाकार्यात सहभागी असताना आपला संदेश हा स्वतःचा नसून देवाच्या स्वतःच्या वचनाचा आहे हे लोकांनी जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा असते. या कारणास्तव ते पवित्र शास्त्राचा थेटपणे उपयोग करतात आणि जेथे कोठे शक्य आहे तेथे त्यामधून वाचन करतात.” तुम्हीही आपल्या सेवेत पवित्र शास्त्राचा पूर्ण उपयोग करीत आहात का? आपल्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते तिची एक पवित्र शास्त्र प्रत सोबत नेऊन त्याचा शक्य आहे तेथे वापर करण्याची का खात्री करू नये?
प्रभावी का?
३ पवित्र शास्त्र इतके का प्रभावी आहे? कारण ते देवाचे वचन असून ते “अंतःकरणाच्या भावना व कल्पना यांचे परिक्षक आहे.” (इब्री ४:१२) शास्त्रवचनीय सत्ये उघड केल्यावर मग त्या माणसाचे खरे हेतू प्रकट होतात. प्रामाणिक अंतःकरणाचे लोक त्याकडे आकर्षित होतात. उदाहरणार्थ, एका तरुण जोडप्याला, त्यांनी सुवार्तेविषयी इतका जलद का प्रतिसाद दिला असे विचारले तेव्हा ते म्हणाले की, “ते पवित्र शास्त्र होते.” त्यांची भेट घेणाऱ्या प्रचारकाने त्यांचे लक्ष पवित्र शास्त्राकडे वळविले तेव्हा त्यांनी “उत्तम मेंढपाळ” याची वाणी ऐकली.—योहान १०:१४; वॉ. ७८ ६/१ पृ. २२-३.
४ क्षेत्रसेवेत पवित्र शास्त्राचा उपयोग करण्यामध्ये अपुरे आहोत असे कधी आपल्याला वाटले होते का? व्यक्तीगत अभ्यासाचा चांगला कार्यक्रम, ज्यात मंडळीच्या सभांची पूर्वतयारी व उपस्थिती देखील समाविष्ट आहे, ते तुम्हाला चांगल्या कामासाठी तयार करतील व अधिक आत्मविश्वास देतील. (२ तीम. ३:१६, १७) क्षेत्रसेवेत एकमेकांसोबत काम करणारे जोडीदार तसेच कौटुंबिक सदस्य एकमेकांबरोबर संभाषणाच्या विषयाची तालीम करू शकतात. तसेच, रिझनिंग पुस्तकातील पृष्ठे ९-१५ वर दिलेल्या प्रस्तावनाही संभाषणाच्या सुरवातीला एखादे शास्त्रवचन वाचण्याचे सांगत असतात. यापैकी काहींचा का सराव करू नये? जे व्यवहार्य आहे व जे तुमच्या क्षेत्रात लोकांची आस्था आकर्षून घेतील ते उपयोगात आणा.
चांगले तारतम्य वापरा
५ आम्हाला घरमालकाला त्याचे पवित्र शास्त्र मागून त्यातून आम्हासोबत पवित्र शास्त्राची वचने बघा हे आमंत्रण देण्याचे सुयोग असतात. पण या परिस्थितीत चांगले तारतम्य वापरा. (पहा, रिझनिंग पुस्तक, पृष्ठ ६७, परिच्छेद ३, पृष्ठ २७९, परिच्छेद २.) जेव्हा त्रोटकपणाची गरज असते तेव्हा संभाषणाच्या विषयातील केवळ एकच शास्त्रवचन वाचण्याचे ठरवता येईल. किंवा घरमालक जर खराच कामात असेल तर एखादे शास्त्रवचन नुसते अवतरीत करता येईल व ते पवित्र शास्त्रातून आहे हे घरमालकाला सांगता येईल. येशू तसेच प्रेषितांपाशी आपणासोबत प्रचाराला नेण्याकरता इब्री शास्त्रवचनांच्या प्रती नव्हत्या. तरी त्यांनी त्यामधून भरपूर उतारे उद्धृत केले. आपण देखील शास्त्रवचने स्मरणात ठेवण्याचा सराव करावा म्हणजे ती आपल्या सेवेत उपयोगात आणता येतील.
६ ‘सत्याचे वचन नीट सांगावे’ अशी पौलाने तीमथ्याला सूचना केली. (२ तीमथ्य २:१५) हीच सूचना आज आपल्याला लागू होते. आपल्या क्षेत्रसेवेत पवित्र शास्त्राचा भरपूर उपयोग करून येशू व प्रेषितांचे अनुकरण करण्याची आपण इच्छा धरावी. जेथे शक्य आहे तेथे ती वाचून दाखवा, पण जर गरज भासते तर ती आपल्या स्मरणातून सांगा. हे प्रभावीपणे केल्यामुळे आम्ही देवाचे सेवक आहोत आणि आमचा संदेश हा अगदी पूर्णपणे त्याच्या वचनावर आधारलेला आहे हे स्पष्ट होईल.