शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
मे ६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९१ (४२)
१० मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. वर्गण्यांची हाताळणी कशी योग्यपणे करावी (एस-११) याविषयी थोडक्यात मंडळीसोबत उजळणी करा.
१५ मि: “मंडळीत आमची राज्याची सेवा पूर्ण करणे.” भाषण व चांगली तयारी केलेले एक प्रात्यक्षिक, ज्यात एक पुस्तक अभ्यास चालक एका विवाहीत जोडप्याला, भगिनी केव्हा व का आपले मस्तक आच्छादतात याविषयीची माहिती इंडेक्सच्या साहाय्याने कशी शोधता येते ते स्पष्ट करीत आहे.
२० मि: संभाषणाचा नवा विषय. संभाषणाच्या नव्या विषयाची सभागृहासोबत चर्चा करा. याचप्रमाणे अलिकडच्या द वॉचटावरमधील विविध बोलके मुद्दे विचारात घ्या. ज्यांनी आपल्या प्रकाशनांविषयी खरी आवड दाखवली आहे व ज्यांना वर्गणी करणे आवडेल अशांबद्दल विचार करण्यास बांधवांना उत्तेजन द्यावे. चांगली तयारी केलेल्या एक प्रचारकाला पुढील सादरतेचे प्रात्यक्षिक करू द्यावेः “नमस्ते. माझं नावं −−− आहे. मी सर्वांच्या भेटी घेऊन एक प्रश्न विचारीत आहे. आमच्या काळात दीर्घकालीन शांती येऊ शकेल असे आपणास वाटते का? [उत्तर देण्यास वाव द्या.] आम्ही भूतकाळावरुन अंदाज केला तर मग आशेचा काही आधार दिसत नाही. पण आमच्या काळाबद्दल लूक २१ मध्ये जे भाकित करण्यात आले होते ते लक्षात घ्या. [वचने १०, ११, २६ वाचा.] या परिस्थिती पहिल्या जागतिक युद्धापासून अस्तित्वात आहेत. पण आम्हाला आशेविना सोडलेले नाही. आज मानवास त्रस्त करणारी परिस्थितीच, देवाचे राज्य लवकरच पृथ्वीची शुद्धता करून दीर्घकालची शांती आणील याचा पुरावा देत आहे. हेच येशूने पुढे २८ व ३१ व्या वचनात म्हटले आहे. [वचने वाचा.] अशाप्रकारे आजच्या अनर्थकारी व निराशमय स्थिती, एक अद्भुत बदल लवकरच होईल असा खरोखरी पुरावा देतात. ही आनंदाची बातमी नव्हे का? [उत्तर देण्यास वाव द्या.] द वॉचटावरमधील हा लेख [योग्य परिच्छेद किंवा चित्र निवडा] लवकरच जे बदल होणार त्यापैकी काहीची माहिती देतो आणि तुम्ही व तुमचे कुटुंब याचा कसा अनुभव घेऊ शकाल ते सांगतो. याविषयीची आणखी मदत तुम्हास मिळत राहावी या उद्देशाने आम्ही आज या मासिकाची वार्षिक वर्गणी ५० रुपयांना सादर करीत आहोत. (महिन्याला एकदा निघणाऱ्या मासिकांची वर्गणी २५ रुपये.)” प्रचारकाला मासिक किती भाषांत निघते ते व आमच्या कार्याचा जगभर असलेला व्याप याविषयीही सांगता येईल. आमचे स्वयंपूर्ण काम पवित्र शास्त्राचे शिक्षण वाढीस लावते. नव्या संभाषणाच्या विषयाचा वापर करण्याचे प्रोत्साहन देऊन हा भाग संपवा.
गीत ६० (९३) व समाप्तीची प्रार्थना.
मे १३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ४३ (१०३)
५ मिः स्थानिक घोषणा व ईश्वरशासित वृत्त.
१५ मिः “सुवार्ता सादरता—ऐकून घेण्याद्वारे प्रभावीपणाने.” साहित्याची प्रश्नोत्तराने चर्चा. ४थ्या परिच्छेदाचा विचार करताना, घरमालकास व्यक्तीगत काळजी वाटणाऱ्या विषयांकडे व ते तो बोलून दाखवीत असताना त्याकडे लक्ष न दिल्यामुळे प्रचारक चांगल्या संभाषणाची संधि कशी घालवतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. त्या प्रचारकाने काय करायला हवे होते ते सभागृहास विचारा. मग, त्याच प्रचारकाला पुन्हा तेच प्रात्यक्षिक दाखवू द्या, पण या खेपेला तो घरमालकासोबत कसे चांगले संभाषण वाढवीत आहे ते दाखवू द्या.
२५ मि: “आमच्या व्यक्तीगत परिश्रमांना अनुसरून कापणी करणे.” पुरवणीत दिलेल्या लेखावर आधारीत भाषण व चर्चा. वडीलाने हाताळावे. साहित्याला स्थानिकरित्या लागू करा. वेळ आहे त्याप्रमाणे परिच्छेद व दिलेल्या शास्त्रवचनांचे वाचन करावे.
गीत १२८ (१०) व समाप्तीची प्रार्थना.
मे २० ने सुरु होणारा सप्ताह
गीत २८ (५)
१० मिः स्थानिक घोषणा व जमाखर्च अहवाल. जगव्याप्त कार्यासाठी दिल्या गेलेल्या आर्थिक साहाय्याविषयी संस्थेकडील आभाराचे पत्र समाविष्ट करा. तसेच स्थानिक मंडळीच्या गरजांसाठी दाखविलेल्या उदार पाठबळाबद्दल बांधवांची प्रशंसा करा.
१५ मि.: “द वॉचटावर याचे वाचन करण्यास इतरांना उत्तेजन द्या.” उत्साही भाषण व त्यानंतर दोन किंवा तीन प्रचारकांकडून, त्यांना द वॉचटावरबद्दल इतकी आवड का आहे व त्याचे नियमित वाचन केल्यामुळे कसा लाभ मिळाला याविषयीची वक्तव्ये सादर करा.
२० मि.: “सभा वेळेवर सुरु करा व वेळेवर संपवा.” प्रश्नोत्तराने चर्चा. सर्व परिच्छेदांचे वाचन करा.
गीत ८ (८४) व समाप्तीची प्रार्थना.
मे २७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ११८ (९९)
१० मिः स्थानिक घोषणा. राज्य सभागृहाची स्वच्छता करण्याच्या कार्यक्रमाची उजळणी करा. यहोवाचे उपासना केंद्र स्वच्छ ठेवण्याविषयी सहकार्य देण्याची किती गरज आहे त्याची आवड बांधवांठायी उभारण्यासाठी मदत द्या.—अधिक माहितीसाठी, आमची राज्य सेवा सप्टेंबर १९८९ अंकातील ७ व्या पानावरील “तुम्ही आपल्या राज्य सभागृहाचा आदर करता का?” हा विषय बघा.
१५ मि.: “आपल्या प्रकाशनांचा चांगला उपयोग करा.” प्रश्नोत्तराने साहित्याची हाताळणी.
१० मि.: सेवकाची कामे. जो बंधू सेवकाच्या कामावर देखरेख ठेवून आहे त्याची मुलाखत घ्या. त्यांची कर्तव्ये काय आहेत ते आणि मंडळी सेवकांना कशी सहकार्य करू शकते तेही सांगा. (पहा ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री, पृष्ठे ६३-४, आणि आमची राज्य सेवा, जानेवारी १९९०, पृष्ठ ६.) कधी कधी सेवक, त्रास देणाऱ्या मुलांना शांत करण्याची सूचना पालकांना करतील याचा उल्लेख करा. सेवक आमच्या सभेची सुव्यवस्था व आरामदायकता याची काळजी घेतात, उपस्थितांची संख्या मोजतात, वृद्ध तसेच अपंग जणांना आपल्या जागी बसण्यास मदत देतात आणि अशी कितीतरी कामे करतात.
१० मि: सेवाकार्यात हस्तपत्रिकांचा वापर करणे. उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या हस्तपत्रिका बांधवांना दाखवा, आणि अशांचा वापर कोणकोणत्या पद्धतीने करता येईल ते सांगा. हस्तपत्रिकांचा वापर कसा करतात हे सभागृहाला सांगू द्या, किंवा याविषयीचे अनुभव कळवू द्या. फेब्रुवारी महिन्यात, हस्तपत्रिकांचा वापर करून पवित्र शास्त्र अभ्यास कसा सुरु करता येतो ते आम्ही चर्चिले होते. याविषयी काही परिणाम प्राप्त झाले असतील तर ते अनुभव कळवा. इतर अनुभवांसाठी इंडेक्समधील “ट्रॅक्टस्” हे सदर बघा.
गीत १८१ (१०) व समाप्तीची प्रार्थना.
जून ३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २२१ (७३)
५ मिः स्थानिक घोषणा.
१५ मि: फावल्या वेळेचा समतोल वापर. फावल्या वेळेविषयी पुष्कळ युवकांची मुलाखत घ्या. यंग पीपल आस्क पुस्तकातील ३५ ते ३७ अध्यायातील माहितीचा उपयोग करा. मुलाखती हाताळणाऱ्या बंधूला विचारता येईलः तुम्ही जे काही वाचता त्यामध्ये निवडक का असले पाहिजे? वाचनाचे योग्य साहित्य तुम्ही कसे निवडू शकता? दूरदर्शन बघत राहण्याचे संभाव्य धोके कोणते व त्यावर कसे नियंत्रण ठेवता येऊ शकेल? जगातील युवकांचे अनुकरण करीत नाही म्हणून काही हरवल्यासारखे तुम्हाला का वाटत नाही? त्यांचे अनुकरण करणे का धोक्याचे ठरेल? हितकारक मनोरंजनाचा आनंद घेण्याचे कोणते मार्ग तुम्हाला आढळले आहेत? यामध्ये आम्ही समतोल का असले पाहिजे?
१५ मि: घरोघर प्रचार करा. ऑर्गनायझ्ड टू अकम्प्लीश आवर मिनिस्ट्री पुस्तकातील पृष्ठ ८४-७ वरील साहित्यावर उत्स्फुर्त व उत्तेजनात्मक भाषण. स्थानिक परिस्थितीला लागू करा, मंडळीने घरोघरच्या कार्यासाठी जी गटाची योजना आखली आहे त्याकडे लक्ष वेधवा. घरोघरच्या सेवाकार्यात प्रभावी बनण्यासाठी नव्या प्रचारकांना तालीम देण्याचे महत्त्व दाखवून द्या.
१० मि: स्थानिक गरजा, किंवा “परफेक्ट गवर्नमेंट ॲट लास्ट!” हे अवेक! मासिकाच्या डिसेंबर २२, १९९० मधील पृष्ठे २०-४ वरील लेखावर भाषण. (प्रादेशिक भाषेतः “जगाचे स्वामित्व बदलत आहे!” टेहळणी बुरुज, मार्च १, १९९०.)
गीत १२ (२४) व समाप्तीची प्रार्थना.